ट्रेंडी आणि कुल लूक देणाऱ्या हेअरस्टाईलस

10 minute
Read
marathi DIY hairstyles.jpg

Highlights
प्रत्येक स्त्रीच सौंदर्य खुलविण्याचे काम हे केस करतात. त्यांची निगा राखण आणि त्यांना योग्य प्रकारे हाताळणे आपल महत्वाच काम आहे. केश रचना ज्या पद्धतीने आपण करतो आपल्याला ती आवडते तेव्हढीच ती तयार करण देखील अवघड आहे. हेअर स्टाईल हि विविध पद्धतीने लोकप्रिय ठरत असते. आपण जशी वेशभूषा करतो तशी हेअरस्टाईल करणे सध्याचा ट्रेंड झालेला आहे.

प्रत्येक स्त्री चे सौंदर्य हे तिच्या केसांवर अवलंबून असते. जेव्हा त्या व्याक्क्तीच्या सौंदर्याबद्दल बोलले जाते तेव्हा नकळत सर्वात आधी लक्ष जाते ते तिच्या केसांकडे. स्र्त्रीसाठी तिचे केस हा एक महत्वाचा अलंकार आहे. जेव्हा केश रचनेचा विषय येतो, तेव्हा ते कसे कापले गेले पाहिजे, त्याची वाढ कशी झाली पाहिजे, त्याला काय लावले पाहिजे या सर्वच बाबींचा त्यात विचार केला जातो. केस कापायला जाण्यापूर्वी  किंवा हेयर स्टाइल करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्या चेहर्याचा आकार लक्षात घेणे जास्त गरजेचे आहे. बदलत्या ऋतूनुसार हेअरस्टाइलसुद्धा बदलायला हव्यात. पेहरावाला साजेशी हेअरस्टाइल केल्यास वेगळा लूक मिळतो. लांब, मध्यम आणि खांद्यापर्यंत लांब असलेले या तिन्ही प्रकारच्या केसांना तुमच्या पेहरावानुसार लूक देऊ शकता. प्रत्येक पेहरावाला सुंदर ,आकर्षित हेअरस्टाईलची जोड मिळाल्यास तुमच सौंदर्य खुलायला अजून मदत होते.

घरातील छोटे मोठे कार्यक्रम असो, सण-समारंभ असो की ऑफिस मधील खास मिटिंग मेकअप प्रमाणेच हेयरस्टाइल तितकीच सुंदर असं खूप गरजेच असत. मात्र अडचण येते ती वेळेची. कमीत कमी वेळात आकर्षक हेयरस्टाइल कश्या होतील त्याची माहिती जाणून घेवूया. फॅशनप्रेमींचा आकर्षणाचा बिंदू म्हणजे सुंदर हेयरस्टाइल. जसा पेहराव तसा हेयरस्टाइल चा लूक, हा जणू एक ट्रेंड च निर्माण झाला आहे. आपण जशी वेशभूषा कारतो त्याला साजेशी केशरचना करणे आजकाल प्रत्येक वयोगटातील स्त्रीला आवडू लागले आहे.

प्रत्येकाची केशरचना करण्याची आवड जरी वेगवेगळी असली तरी ‘बन हेयरस्टाइल’मात्र प्रत्येकाच्या पसंतीस उतरतांना दिसते. वेळी कमी आणि कष्ट हि कमी असणाऱ्या ह्या बन हेयरस्टाइल मध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात. बन हेयरस्टाइल चे हाय- बन, मिड-बन, लो-बन असे तीन प्रकार पहायला मिळतात. बाजारात आकर्षक हेयर अॅक्सेसरिज मिळतात. ते लाऊन बन ला पारंपारिक लूक देखील देता येतो. घरातील गृहिणींपासून ते ऑफिस मधील मिटींगसाठी तयार होणाऱ्या स्त्रीसाठी हा बन वेगळा लूक देतो.

बन चे प्रकार –

टॉप नॉट :

टॉप नॉट बन म्हणजे अगदी वरती जो बन बांधला जातो आणि तो रबरबँड किंवा स्कार्फच्या सहाय्याने बांधून त्याचा लूक अजून आकर्षित केला जातो.टॉप नॉट बन बांधण्यासाठी केस आधी विंचरून घ्यावीत आणि नंतर सर्व केस कंगव्याने एकत्रित घेऊन त्याचा बन बांधावा आणि रबरबँड किंवा स्क्रर्फ ने बांधून छान टॉप नॉट बन चा लूक द्यावा.

मेस्सी बन :

तरुणींमध्ये मेस्सी बन ह्या केशरचनेची सर्वात जास्त क्रेझ पाहायला मिळते. या हेयरस्टाईल कंगाव्याची गरज भासत नाही. मेस्सीहेयर याचा अर्थ होतो विस्कटलेले केस. हि केशरचना आपल्या मनाप्रमाणे केस एकत्रित बांधून त्याचा बन केला जातो. ज्यांनी केस कलर केलेले असतील किंवा विशेषतः हायलाईटस केलेले असतील त्यांच्यावर हि हेयरस्टाईल चार चांद लावल्यासारखी दिसते.

डबल बन :

केस व्यवस्थित  विचारून घ्यावीत. त्यानंतर त्यांची दोन भागांत विभागणी करावी. दोन्ही बाजूस बन बांधावे. झाली आपली डबल बन हेयर स्टाईल तयार. लहान मुलींमध्ये आणि तरुणीमध्ये हि केशरचना प्रामुख्याने केली जाते.

फिशटेल फ्रेंच ब्रेड बन :

सर्वात आधी केस व्यवस्थित विंचरून घ्यावीत. मध्यभागी केसांची पोनी बांधावी त्यानंतर पोनीतील केसांची दोन भागांमध्ये विभागणी करून त्यांच्या स्वतंत्र्य फिशटेल ब्रेड वेण्या घालाव्या. नंतर दोन्ही फिशटेल वेण्यांना एकमेकांमध्ये एकत्र गुंडाळून त्यांचा बन बांधावा. झाली आपली फिशटेल ब्रेड बन हेयर स्टाईल तयार. 

             रोज एकाच तऱ्हेची वेणी घालूनही फार कंटाळा येतो. वेणीचे अनेक प्रकार असतात. केसांची हेअर स्टाईल नक्की कशी करायची असाही प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या मनी कार्यक्रमाला जातांना पडतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेणी कशी घालायची, वेणीला वेगळे रूप कसे द्यायचे, वेणीचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचे असते. वेणीचे प्रकार सगळ्यांनाच माहीत असतात पण त्याची स्टाईल नक्की कशी करायची हे मात्र माहीत नसतं. रशियन वेणी खजूर वेणी, केसांच्या वेण्या, सागर वेणी हेअर स्टाईल, चार पदरी वेणी असे अनेक वेणीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. 

वेणीचे प्रकार -

सागर वेणी अथवा फ्रेंच बिडिंग :

सगळ्यात सोप्पी आणि दिसायला आकर्षक अशी हि वेणीची रचना सगळ्यांच्याच पसंतीस येते. फ्रेंच बिडिंगमध्ये सहसा कधीच केस तुटत नाही. हि केश रचना शक्यतो खेळ खेळताना केली जाते. ज्यामध्ये केसांची निगा पण राखली जाते. फ्रेंच बिडिंग वेणी हि तीन पदरी वेणी सारखीच असते मात्र ती थोडी वर पासून बांधली जाते. सागराच्या लाटांसारखी दिसणारी हि वेणी सगळ्यां आवडेल अशी आहे.

रशियन वेणी :

हि अतिशय सोप्या पद्धतीची वेणीची स्टाईल आहे. हि वेळी घालण्याकरता आधी केस नीट विंचरून एकत्र करून घ्या. केस एकत्र करून वरच्या भागावर आंबाडा घालायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्याचे तीन समान भाग करून आपल्या नेहमीच्या वेणी सारखीच गुंफायची आहे. मात्र हि एकमेकांमध्ये घट्ट गुंफायला हवी. त्यानंतर खालचा भाग रबर लाऊन बंद करून घ्यायचा. हि हेअर स्टाईल फुल गुंफाल्यावर अधिकच सुंदर दिसते.

 

खजूर वेणी अथवा फिशटेल ब्रेड :

हा वेणीचा प्रकार बांधून झाल्यावर तो माशाच्या शेपटीसारखा दिसतो, म्हणून ह्या वेणीला फिशटेल ब्रेड असे म्हणतात. फिशटेल बांधताना पोनीटेल बांधून केसांचे दोन भाग करावे. उजव्या भागामधून साधारण अर्धा इंच केसांची बट घेऊन ती डाव्या बाजूच्या केसांच्या बटमध्ये व्यवस्थित गुंफून गयातली जाते. त्यानंतर डाव्या बाजूची बट घेऊन ती पुन्हा उजव्या बाजूला गुंफून घ्यावी. वेणीच्या शेवटच्या टोकापर्यंत हे करावे. फिशटेल ब्रेडिंग करताना केसांना अधिक फुगीरपणा येत जातो.  त्यामुळे केस तुमचे अधिक घनदाट नसले तरीही ही वेणी बांधता येऊ शकते. विशेषतः तुम्ही जर केसांंचे साईड पार्टिशन केले तर ही फिशटेल अधिक आकर्षक दिसते. तुम्ही जीन्स अथवा वेस्टर्न कपड्यांवरही ही हेअर स्टाईल नक्की करू शकता. फिशटेल अर्थात खजूर वेणी आपण कधीही घालू शकतो.

चार पदरी वेणी :

चार पदरी वेणीची स्टाईल करताना प्रथम मधले केस घेऊन त्याची नेहमीप्रमाणे तीन पदरी वेणी घालायला सुरुवात करावी. त्यानंतर त्यामध्ये पहिले उजव्या बाजूची बात घेऊन ती गुफुन घ्यावी, नंतर पुन्हा तसेच डाव्या बाजूची बात घेऊन ती गुंफून घ्यावी. असा करत करत बाजूचि बात घेऊन वेणी पूर्ण करावी. हि वेणी प्रामुख्याने सागर वेणी सारखीच असते मात्र दोन वेण्या एकत्र करून त्यापासून चार पदरी वेणी तयार होते. हि वेणी दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षित दिसते. ज्यांचे केस लांब सडक असतात त्यांच्यावर हि वेणी फारच सुंदर लूक देते. ह्या वेणीच्या मधल्या भागात आकर्षित फुले किंवा स्टड्स घातले तर हि वेणी खूपच खुलून दिसते. 

हेअरबेल्ट वेणी :

हि वेणी अगदी आपल्या बेल्ट सारखी दिसायला असते. केसांमध्ये जणू काही बेल्टच लावला आहे, असे भासते. हे वेणी बनवतांना केस सरळ विंचरून घ्यावीत. त्यानंतर दोन्ही बाजू कडून दोन वेण्या घालून घ्याव्यात. बेल्ट सारख्या दोघ वेण्या विरुद्ध दिशेला एकमेकांमध्ये गुंतवून घ्याव्यात. नंतर त्या पिनच्या सहाय्याने केसांमध्ये बंद करून टाकाव्यात. बेल्ट सारखे उठावदार दिसण्याकरता त्यात मणी, रंगीत टिकल्या किंवा फुल घालून ते अधिक उठावदार दिसू लागतात.

              प्रत्येक स्त्रीच सौंदर्य खुलविण्याचे काम हे केस करतात. त्यांची निगा राखण आणि त्यांना योग्य प्रकारे हाताळणे आपल महत्वाच काम आहे. केश रचना ज्या पद्धतीने आपण करतो आपल्याला ती आवडते तेव्हढीच ती तयार करण देखील अवघड आहे. हेअर स्टाईल हि विविध पद्धतीने लोकप्रिय ठरत असते. आपण जशी वेशभूषा करतो तशी हेअरस्टाईल करणे सध्याचा ट्रेंड झालेला आहे.

image-description
report Report this post