तुमच्या quick weekend getaway करिता Budget friendly "रिसॉर्ट्स"

8 minute
Read
Resorts.jpg

Highlights
तुमच्या quick weekend getaway करिता आम्ही घेऊन आलो आहे पुणे मुंबई आणि लोणावळ्या जवळचे काही अगदी Budget friendly resorts. खालील ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत काही अश्या रिसॉर्ट्स बाबत!

रोज सकाळी उठा, तयार व्हा, दोन घास पोटात टाका, कामाला जा, संध्याकाळी थकून भागून घरी या, जेवण करा आणि झोपून जा. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठा, तयार व्हा, दोन घास पोटात टाका, कामाला जा, संध्याकाळी थकून भागून घरी या, जेवण करा आणि झोपून जा. पुन्हा दुसऱ्या दिवशी... वाचूनच कंटाळा आला न, मला पण लिहितांना खूप कंटाळा आला होता. आता जरा विचार करा, जर मला लिहितांना आणि तुम्हाला वाचतानाच इतका कंटाळा आला तर हे असं आयुष्य जगून आपल्याला कसा कंटाळा येणार नाही. रोज तेच तेच आयुष्य जगल्याने माणसाला कंटाळा येणं स्वाभाविक आहे. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण तुमच्या quick weekend getaway करिता आम्ही घेऊन आलो आहे पुणे मुंबई आणि लोणावळ्या जवळचे काही अगदी Budget friendly resorts. खालील ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत काही अश्या रिसॉर्ट्स बाबत!

 

1. दी ब्लू लगून रिसॉर्ट

Source: google

लोणावळा स्थित हा दी ब्लू लगून रिसॉर्ट तुम्हाला नयनरम्य दृश्याची अनुभूती प्रदान करेल. मुंबईवरून जवळ जवळ ८०-८५ किलोमीटर आणि पुण्यावरून जवळ जवळ ६५-७० किलोमीटर असलेलं हे २ स्टार रिसॉर्ट सर्वांगानी आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. यामध्ये फ्री ब्रेकफास्ट, एअर कंडिशनर रूम्स आणि अजून बऱ्याच सोयी उपलब्ध आहे. त्या सोबतच...

 • फ्री ब्रेकफास्ट
 • रेस्टॉरंट
 • २४ तास रूम सर्विस
 • एअर कंडिशनर रूम्स
 • फुल सर्विस लॉन्ड्री
 • चाईल्ड फ्रेंडली

आणि हे सगळं साधारणतः दोघांसाठी २०००-२५०० रुपयांमध्ये एका रात्रीसाठी तुम्हाला या सगळ्या सोयी आणि खोली सुद्धा मिळून जाईल.

 

2. लेक व्ह्यू रिसॉर्ट

Source: google

२ स्टार मान्यता प्राप्त असलेलं एव्हियन हॉलिडे रिसॉर्ट तुम्हाला स्वर्गीय सुखाचा आनंद देईल. फ्री ब्रेकफास्ट पासून तर फ्री वायफाय पर्यंत तुम्हाला गरज असलेली प्रत्येक वस्तू तुम्हाला उपलब्ध करून मिळेल. हे रिसॉर्ट सुद्धा पुण्यावरून साधारणतः ६५-७० किलोमीटर दूर आहे आणि मुंबईवरून जवळ जवळ ८०-८५ किलोमीटर. या रिसॉर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला...

 • रेस्टॉरंट
 • फ्री ब्रेकफास्ट
 • २४ तास रूम सर्विस
 • आऊटडोअर पूल
 • पार्किंग अव्हेलेबल
 • चाईल्ड फ्रेंडली
 • फुल सर्विस लॉन्ड्री
 • मीटिंग रूम्स
 • बिझनेस सेन्टर
 • कार रेंटल ऑनसाईट

पण सोयी जरी इतक्या असल्या तरी मात्र फक्त २०००-२५०० रुपयांमध्ये एका रात्रीसाठी तुम्हाला इथे खोली मिळून जाईल.

 

3. हायलँड रिसॉर्ट

Source: google

हायलँड रिसॉर्ट हे सुद्धा लोणावळा स्थित एक ३ स्टार रिसॉर्ट आहे. तुमच्या डोळ्याचे पांग फेडले जातील असे दृश्य आणि स्वतःच्या घरा पेक्षा अधिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेलं हे रिसॉर्ट तुमच्या मनात कायम जागा करून जाईल. पुण्यावरून जवळपास ६५-७० किलोमीटर असलेलं आणि मुंबईवरून साधारणतः ८०-८५ किलोमीटर असलेल्या या रिसॉर्ट मध्ये विविध सुविधांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता, जसे की...

 • फ्री वायफाय
 • रेस्टॉरंट
 • फ्री ब्रेकफास्ट
 • २४ तास रूम सर्विस
 • डेली हाऊस कीपिंग
 • मीटिंग रूम्स
 • बिझनेस सेन्टर
 • आऊटडोअर पूल
 • फ्री पार्किंग
 • डॉक्टर ऑन-कॉल
 • पेट्स अलाऊड
 • कार रेंटल ऑनसाईट
 • चाईल्ड फ्रेंडली

पण सोयी जरी इतक्या असल्या तरी मात्र फक्त २०००-२५०० रुपयांमध्ये एका रात्रीसाठी तुम्हाला इथे खोली मिळून जाईल.

 

4. कृष्णाई रिसॉर्ट

Source: google

कृष्णाई रिसॉर्ट हे सुद्धा लोणावळा स्थित एक ३ स्टार रिसॉर्ट आहे. तुमच्या डोळ्याचे पांग फेडले जातील असे दृश्य आणि स्वतःच्या घरा पेक्षा अधिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेलं हे रिसॉर्ट तुमच्या मनात कायम जागा करून जाईल. पुण्यावरून जवळपास ६५-७० किलोमीटर असलेलं आणि मुंबईवरून साधारणतः ८०-८५ किलोमीटर असलेल्या या रिसॉर्ट मध्ये विविध सुविधांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता, जसे की...

 • रेस्टॉरंट
 • फ्री ब्रेकफास्ट
 • २४ तास रूम सर्विस
 • आऊटडोअर पूल
 • फुल सर्विस लॉन्ड्री
 • फ्री पार्किंग
 • चाईल्ड फ्रेंडली
 • कार रेंटल ऑनसाईट

पण सोयी जरी इतक्या असल्या तरी मात्र फक्त २०००-२५०० रुपयांमध्ये एका रात्रीसाठी तुम्हाला इथे खोली मिळून जाईल.

 

5. हॉटेल एरिस्ट्रो लोणावळा

Source: google

लोणावळा स्थित हा हॉटेल एरिस्ट्रो तुम्हाला आनंदमय आणि नयनरम्य दृश्याची आणि वातावरणाची अनुभूती प्रदान करेल. मुंबईवरून जवळ जवळ ८०-८५ किलोमीटर आणि पुण्यावरून जवळ जवळ ६५-७० किलोमीटर असलेलं हे ३ स्टार रिसॉर्ट सर्वांगानी आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. यामध्ये फ्री ब्रेकफास्ट, एअर कंडिशनर रूम्स आणि अजून बऱ्याच सोयी उपलब्ध आहे. त्या सोबतच...

 • फ्री वायफाय
 • रेस्टॉरंट
 • फ्री ब्रेकफास्ट
 • २४ तास रूम सर्विस
 • एअर कंडिशनर रूम्स
 • डेली हाऊस कीपिंग
 • आऊटडोअर पूल
 • फ्री पार्किंग
 • मीटिंग रूम्स
 • गेम्स रूम
 • कार रेंटल ऑनसाईट
 • प्रायव्हेट कार सर्विस
 • फुल सर्विस लॉन्ड्री
 • चाईल्ड फ्रेंडली

आणि हे सगळं साधारणतः दोघांसाठी २०००-२५०० रुपयांमध्ये एका रात्रीसाठी तुम्हाला या सगळ्या सोयी आणि खोली सुद्धा मिळून जाईल.

 

6. एव्हियन हॉलिडे रिसॉर्ट

Source: google

३ स्टार मान्यता प्राप्त असलेलं एव्हियन हॉलिडे रिसॉर्ट तुम्हाला स्वर्गीय सुखाचा आनंद देईल. फ्री ब्रेकफास्ट पासून तर फ्री वायफाय पर्यंत तुम्हाला गरज असलेली प्रत्येक वस्तू तुम्हाला उपलब्ध करून मिळेल. हे रिसॉर्ट सुद्धा पुण्यावरून साधारणतः ६५-७० किलोमीटर दूर आहे आणि मुंबईवरून जवळ जवळ ८०-८५ किलोमीटर. या रिसॉर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला...

 • फ्री ब्रेकफास्ट 
 • फ्री वायफाय
 • गेम्स रूम
 • रूम सर्विस
 • फुल सर्विस लॉन्ड्री
 • फ्री पार्किंग
 • एअरपोर्ट शटल
 • फुल सर्विस लॉन्ड्री
 • आऊटडोअर पूल
 • रेस्टॉरंट
 • चाईल्ड फ्रेंडली
 • कार रेंटल ऑनसाई

जवळ जवळ ३८००-४००० रुपयांमध्ये तुम्हाला इथे एका रात्रीसाठी खोली मिळून जाईल. या रिसॉर्टची किंमत जरी तुम्हाला जास्ती वाटत असली तरी इथे उपलब्ध असलेल्या सोयी आणि सुविधा आपल्याला नाकारता येणार नाही. गेम्स रूम, फ्री वायफाय, फुल सर्विस लॉन्ड्री आणि आऊटडोअर पूल सुद्धा.

 

वरील दिलेले सर्व रिसॉर्ट तुम्हाला आवडले असतील ही अशा आणि तुम्हाला तुमच्या quick weekend getaway करिता कुठल्या रिसॉर्ट जायला आवडेल हे आम्हाला खालील दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून नक्की कळवा!

image-description
report Report this post