पारंपरिक पेढ्यात चॉकलेट वापरून बनवा चॉकलेट पेढा!!

3 minute
Read
WhatsApp Image 2021-07-06 at 12.19.05 PM.jpeg

Highlights
प्रसाद म्हणून किंवा एखाद्या गोष्टीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी घराघरांमध्ये खाल्ली जाणारी मिठाई म्हणजे 'पेढा'. परिक्षेत पास झाला चला 'पेढे' वाटा. मुलगा झाला 'पेढे' तर हवेच. देवळात जाताय तर देवाला 'पेढ्यां'चा नैवेद्य दाखवा. सातारचे कंदी पेढे घ्या नाहीतर मथुरेचे पेढे सगळ्यांना आवडणारी ही मिठाई. हेच पेढे आपण घरी करणार आहोत आणि ते सुद्धा आपलं आवडतं चॉकलेट घालून. अगदी कमी वेळात आणि मोजक्याच साहित्यात तयार होतील चॉकलेट पेढे, चला मग कसे करायचे पाहूयात

(You can read this blog in English here)

एक गोष्ट अशी आहे जी तुमच्या चेहऱ्यावर कधीही आणि कोणत्याही क्षणी  स्मितहास्य आणते, असं काय आहे? बरोबर ते आहे 'चॉकलेट' ! तुमचा डाएट प्लॅन विस्कळीत करणारा दगाबाज पदार्थ म्हणजे 'चॉकलेट'. पण आपण चॉकलेटवर कधीच राग काढत नाही किंवा डाएट बिघडवलं म्हणून चॉकलेट खाणे बंद करत नाही. चला तर मग जागतिक चॉकलेट दिवस साजरा करूया एका छोट्या ट्विस्टसह. आम्ही तुमच्यासाठी अतिशय सोपी आणि रूचकर रेसीपी घेवून आलो आहोत ज्यामुळे 'चॉकलेट'चा आनंद तुम्ही नेहमी घेवू शकाल. असं काहीतरी जे तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्व चॉकलेटप्रेमींना खूप आवडेल ! पारंपरिक पेढा आणि यम्मी चॉकलेट यांचा अनोखा संगम अर्थात 'चॉकलेट पेढा', चला तर मग करायची सुरूवात.

साहित्य

कोको पावडर- 2 टेबलस्पून

दूधाची पावडर - 3/4 कप

गोड कंडेन्स्ड मिल्क -120 मिली

तूप- 2 टेबलस्पून

भाजलेले काजू- सजावटीसाठी

वाळलेल्या कॅनबेरी- सजावटीसाठी

कृती

1. नॉन-स्टिक पॅन मंद आचेवर छान गरम करा.

2. त्यात 1 टेबलस्पून तूप घाला.

3. त्यानंतर कंडेन्स्ड मिल्क घाला.

4. एका वेगळ्या भांड्यात कोको पावडर आणि दुधाची पावडर मिक्स करा

5. या मिश्रणात आता कंडेन्स्ड मिल्कमध्ये घाला.

6. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. त्याचा छान गोळा होईल आणि ते पॅन सोडत आहे असं आपल्याला दिसेल.

7. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.

8. हाताला तुप लावून घ्या आणि या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा (जर ते तुम्हाला खूप गरम वाटत असेल तर 2-3 मिनिटे थंड होऊ द्या! )

9. आता गोळे तळहातावर घेवून त्याला हलकसं दाबून पेढ्याचा आकार द्या.

10. काजू आणि कॅनबेरी लावून पेढ्याची सजावट करा.

तुमचे स्वादिष्ट चॉकलेट पेढे तयार आहेत. मिठाई म्हणून किंवा संध्याकाळच्या भुकेला तुम्ही यावर ताव मारू शकता. त्याचा सुंदर फोटो काढायला विसरू नका आणि आम्हाला इन्स्टाग्रामवर टॅग करा #girlsbuzzindia!

 

image-description
report Report this post