निरोगी जीवनासाठी दर रोज करा योगा!

9 minute
Read
yoga main cover page.jpeg

Highlights
योग शक्ती, लवचिकता आणि आत्मविश्वास वाढवतो. योगाचा नियमित सराव वजन कमी करण्यास, तणावातून मुक्त होण्यास, रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि निरोगी जीवनशैली राखण्यास मदत करू शकतो. भारतात आणि भारताबाहेर, बॉलिवूड मध्ये आणि हॉलिवूड मध्ये सुद्धा फिट राहण्यासाठी सेलेब्स योगा करतात.

योग हा जगण्याचा एक मार्ग आहे ज्याचा हेतू फक्त निरोगी शरीर असणेच नाही तर त्या सोबतच निरोगी मन असणे सुद्धा आहे. भारताने जगाला आज पर्यंत बऱ्याच भेटवस्तू दिलेल्या आहेत काही लौकिक अर्थाने काही अलौकिक अर्थाने पण योग साधना ही त्या सर्वोत्तम भेटवस्तूंपैकी एक. योग साधना ही युगापासून भारतीय संस्कृतीत आहे. योगा म्हणजे केवळ शरीराला वाकवणे किंवा फिरवणे आणि श्वास रोखणे नाही. 

तुम्हाला स्थितप्रज्ञ अशा स्थितीत आणण्याचे हे एक तंत्र आहे जिथे तुम्ही प्रत्यक्षात जसे आहात तसेच दिसता आणि  तसंच अनुभवता. जरी पाश्चिमात्य शैलीच्या वाढत्या प्रभावामुळे, योगाचा सराव कमी होत चालला होता परंतु गेल्या 2 दशकांमध्ये, त्याचे पुनरुज्जीवन केले गेले आहे, आणि आता हे निरोगी जीवनशैली राखण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक मानल्या गेले आहे. विशेषतः मध्यम वयोगटातील सर्व लोक, योगाला इतर सर्व प्रकारच्या निरोगी राहणाऱ्या पद्धतींपेक्षा जास्त महत्व देतात.

योगाची उत्पत्ती भारतात झाली पण मधल्या काही काळात त्याचे महत्व कमी झाले होते. परंतु 6 वर्षापूर्वी जेव्हा आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्याचे महत्त्व संपूर्ण जगाला सांगितले आणि 21 जूनची तारीख आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सुचवली. कारण हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि जगाच्या अनेक भागात याचे विशेष महत्त्व आहे. 21 जून 2015 रोजी, भारत आणि 84 देशांतील मान्यवरांसह 35,985 लोकांनी राजपथ, नवी दिल्ली येथे 35 मिनिटांसाठी 21 आसने (योग मुद्रा) केली, ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा योग वर्ग म्हणून घोषित करण्यात आला होता.

Source: DNA

योगाचा सराव केल्याने शरीर वैश्विक उर्जेसह भरून येतं आणि सुलभ होतं आणि याच सोबत:

  1. परिपूर्ण समतोल आणि सुसंवाद प्राप्त होतो
  2. मनापासून नकारात्मक अवरोध आणि शरीरातून विषारी तत्व काढून टाकतो
  3. वैयक्तिक शक्ती वाढवतो
  4. लक्ष आणि एकाग्रता वाढवण्यामध्ये मदत करतो, विशेषतः मुलांना याचा अधिक फायदा होतो.
  5. पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करून शारीरिक शरीरातील ताण आणि तणाव कमी करतो
  6. नियमित पणे योगा करण्याराला प्रत्येक काम करण्यात एक उत्साह जाणवतो. 

अशा प्रकारे, योग शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती प्रदान करतो.

 

भारतात आणि भारताबाहेर, बॉलिवूड मध्ये आणि हॉलिवूड मध्ये सुद्धा फिट राहण्यासाठी सेलेब्स योगा करतात. त्यापैकी काही उदाहरण बघायची झाली तर...

 

१. शिल्पा शेट्टी

Source: indiatoday

सुमारे 18 वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने योगा करण्यास सुरुवात केली जेव्हा तिला क्रॉनिक स्पॉन्डिलायटीसचा त्रास होऊ लागला. शिल्पाच्या म्हणण्या प्रमाणे योग हा तिच्यासाठी केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर ती एक शिस्त आहे. हे तिला लवचिक आणि निरोगी राहण्यास मदत करते आणि तिच्या मनाला शांत राहण्या सुद्धा सहाय्य करते. ती आठवड्यातून तीन वेळा योगाभ्यास करते. तिचे काही आवडते आसन म्हणजे भुजंगासन, वक्रासन, नौकासन आणि अधो मुख स्वानासन.

 

२. करीना कपूर खान

Source: hindustantimes

सिनेसृष्टीत बेबो नावाने प्रसिद्ध असलेली करीना कपूर सुद्धा योगा करते. तिचे शरीर इतकी लवचिक आहे की ती हेडस्टँड आणि चक्रसन सारख्या काही कठीण योगा पोझेस अगदी सहज करू शकते. ती विवाहित आहे आणि आता तर २ बाळांची आई सुद्धा, परंतु याचा अर्थ असा मुळीच नाही की तिने रोजच्या योग सत्रांची दिनचर्या सोडली. ती अजूनही स्वतःच्या आरोग्याविषयी ताडझोड न करता अगदी नियमित पणे योगा करते. 

 

३. मलायका अरोरा

Source: indiatimes

सेलेब्सच्या योगा विषयी बोलणं चालू आहे आणि त्यात मलायका अरोरा हे नाव नाही हे शक्यच नाही. मलायका अरोराला योगाची ओळख करीना कपूर खानने करून दिली. पायल गिडवानी तिवारीसोबत ती ट्रेनिंग घेते. धनुषासन, पद्मासन आणि सूर्यनमस्कार हे तिचे आवडते पोझ आहेत. ती योगामध्ये समाविष्ट असलेल्या श्वासोच्छवासाचा आनंद घेते. योगाला खूप लक्ष देण्याची गरज असल्याने, तिला वाटते की योगामुळे तिची एकाग्रता शक्ती सुधारण्यास मदत झाली आहे. योगाच्या फायद्याबद्दल बोलताना ती म्हणाली की सूर्यनमस्काराने तिचा चेहरा उजळण्यास तिला मदत झाली.

 

४. अक्षय कुमार

Source: twimg

मार्शल आर्टची आवड असणारी व्यक्ती म्हणून अक्षय कुमार ओळखला जातो. पण या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत आहे का?, अक्षय जो "कधीच वृद्ध आहे असं भासत नाही", नियमितपणे योगा आणि ध्यान करतो? त्यांचे योगगुरू सुवीर बलवी यांनी म्हटले आहे की अक्षय एक योगी सारखा आहे - तो शिस्तबद्ध जीवन जगतो आणि अत्यंत लक्ष केंद्रित व्यक्तिमत्व आहे. शिस्तीच्या योगिक तत्त्वांना अनुसरून हा अभिनेता दररोज पहाटे 4 वाजता उठतो आणि रात्री 9 वाजता झोपी जातो.

 

५. जेनिफर एनीस्टोन

Source: etonline

फ्रेंड्स फेम जेनिफर एनीस्टोन सुद्धा एक योगा साधक आहे, मॅंडी इंगबर यांनी जेनिफरला प्रशिक्षण दिले आहे.  त्यांनी असे म्हटले आहे की योगानेच तिला धूम्रपान सोडण्यास मदत केली. ती आठवड्यातून कमीतकमी 5 वेळा योगा करते जिथे ती सामान्य योगासनावर न थांबत उच्च पातळीवरचे काही कठीण योगा पोझेस देखील करते.

 

६. नरेंद्र मोदी

Source: indiatoday

“योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची अमूल्य देणगी आहे. हे मन आणि शरीराच्या एकतेला मूर्त रूप देते; विचार आणि कृती; संयम आणि पूर्तता; माणूस आणि निसर्ग यांच्यात सुसंवाद; आरोग्य आणि कल्याणासाठी एक समग्र दृष्टीकोन. हे व्यायामाबद्दल नाही तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकतेची भावना शोधण्यासाठी आहे. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून, ते कल्याणात मदत करू शकते. आपण आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीकारण्याच्या दिशेने काम करूया. ”

- नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र महासभा

 

अगदी भारतातच नव्हे तर जगभरात, लोक योगाचे फायदे स्वीकारत आहेत आणि त्याला त्यांच्या नियमित जीवनाचा भाग बनवत आहेत. जगभरात आता लाखो योगाभ्यास करणारे आहेत. एका टोकावर जिमिंग, एरोबिक्स, झुम्बा इत्यादी अनेक आधुनिक व्यायामाचे इतर प्रकार केवळ शारीरिक आरोग्याची हमी देतात. या व्यायामांचा आध्यात्मिक किंवा सूक्ष्म शरीराच्या सुधारणाशी फारसा संबंध नाही. 

माणूस एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्राणी आहे; भारतात आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे योग तिन्हीमध्ये संतुलन विकसित करण्यास मदत करतो. योग शक्ती, लवचिकता आणि आत्मविश्वास वाढवतो. योगाचा नियमित सराव वजन कमी करण्यास, तणावातून मुक्त होण्यास, रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि निरोगी जीवनशैली राखण्यास मदत करू शकतो. हे संपूर्ण विश्व आपलाच एक भाग आहे आणि कोणासोबत ही दुजा भाव न ठेवता आपण एक आहो हा अनुभव घेण्यास सक्षम आपल्याला योग साधना करते!

image-description
report Report this post