८ सोप्या पद्धीतच्या साहाय्याने एक उत्तम ब्लॉग लिहिणं शिका!

10 minute
Read
All you Need to Know About Content Writing

(To read another blog related to Content Writing in English, click here.)

सध्या संपूर्ण जग एका अभूतपूर्व कालावधीतून जात आहे. गेल्या १०० वर्षात आणि येणाऱ्या १०० वर्षात कदाचित अशी परिस्थिती ओढवली असेल. पण माणसाला जेव्हा-जेव्हा संकटांना सामोरी जावे लागले आहे, जेव्हा-जेव्हा त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न पडला आहे, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील त्याला त्या संकटातूनच सापडलं आहे. त्याच प्रकारे कोरोना नामक विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला असतांना, जेव्हा माणसालाच माणसाशी भेटण्याची परवानगी नव्हती अश्या परिस्थिती "Virtual" हा शब्द प्रखरतेने समोर आला.

त्याच प्रकारे सोशल मीडिया, व्हाट्सअँप, फेसबुक आणि ब्लॉग्स यांना सुद्धा लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. लोकं ब्लॉग्सच्या सहाय्याने आपले अनुभव वाटू लागले. फॅशन, फूड, ट्रॅव्हल आणि अश्या बऱ्याच संदर्भातले अनुभव, लोकं सांगू लागले. पण ब्लॉग्स लिहिणं ही सुद्धा एक कला आहे जी प्रत्येक जण शिकू शकतो. या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की, फक्त ८ सोपी टप्प्यांमध्ये एक अप्रतिम ब्लॉग कसा लिहल्या जाऊ शकतो. 

 • आयडियाची कल्पना 

कुठल्याही ब्लॉगला सुरु करण्याआधी आपल्या जवळ विषय तयार हवा, एक कल्पना हवी. कारण आपल्या कडे कल्पनाच नसेल तर मग आपण नेमकं लिहिणार काय. मग तो विषय फूड, ट्रॅव्हल, स्वतःचे वयक्तिक अनुभव, फॅशन किंवा टीकात्मक लेखन, इत्यादी असू शकतं. त्याच बरोबरीने आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात कुठून करणार आहे आणि त्याचा शेवट कुठे करणार आहे हे सुद्धा आपल्या डोक्यात अगदी निश्चित हवं. 

कारण सुरुवात कुठून करणार आहे हेच जर आपल्याला माहिती नसेल तर मुळात आपण ब्लॉग लिहायला सुरुवातच नाही करू शकणार आणि आपल्या ब्लॉगचा शेवट काय असेल हे जर आपण निश्चित नाही केलं तर ते म्हणजे "A Journey without Destination." सारखी गोष्ट होईल. कारण आपण लिहायला सुरुवात तर करू पण त्याचा शेवट कसा आणि कुठे करायचा यात बराच गोंधळ होईल. त्यामुळे सुरुवात आणि शेवट हे आपल्या ठाऊक असावं.

त्याच बरोबरीने आपण नेमकं कोणासाठी लिहितो आहे हे सुद्धा तितकाच महत्वाचं आहे. कुठलाही ब्लॉग लिहिण्या आधी आपल्याला आपले प्रेक्षक हे माहित असावेत. म्हणजे मी जर फूड वर ब्लॉग लिहिणार आहे तर तो नेमका कोणत्या वयोगटातल्या लोकांसाठी असेल, तो फक्त स्त्रियांसाठी असेल की पुरुष सुद्द्धा ते वाचू शकतील, त्यानंतर जर तो फक्त स्त्रियांसाठी असेल तर मग त्या कुठल्या स्त्रिया असतील ९-५ जॉब करणाऱ्या की घरी राहणाऱ्या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपण लिहायला सुरुवात करायला हवी.

 • संशोधन

हा शब्द जितका ऐकायला भारदस्त वाटतो त्याच प्रमाणे हा टप्पा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. संशोधन किंवा इंग्रजीत सांगायचं झालं म्हणजे "Research" हे फार जबाबदारीचं काम. आपण आपलेच अनुभव लिहीत असल्यास असं फारसं संशोधन करण्याची गरज नाही. पण जर टीकात्मक लेखन आणि ट्रॅव्हल सारख्या विषयांवर जर आपण लिहीत असू तर संशोधन हे फार मुख्य भूमिका वठवतं. 

उदाहरणार्थ: मी जर एक ब्लॉगर आहे जी वेगवेगळ्या शहरांवर वर ब्लॉग लिहिते. आता मी मुंबईत राहून, मला जर दिल्ली वर ब्लॉग लिहायचा असेल तर मला दिल्लीच्या बाबतीत सगळी माहिती गोळा करावीच लागेल. कारण दिल्ली आणि मुंबईचं वातावरण वेगळं, खानपान वेगळं, राहणीमान आणि अजून अश्या बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत.

त्यामुळे दिल्ली वर लिखाण करतांना या गोष्टींचं भान मला असावं आणि या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवूनच ब्लॉग लिहायला सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे संशीधन हा ब्लॉग लिहितांना सगळ्यात महत्वाचा टप्पा.

 • पहिला मसुदा

ब्लॉग लिहितांना हा तिसरा टप्पा. आपल्या कल्पनेवर संशोधन केल्या नंतर मग येतं त्याला प्रत्यक्षरित्या वहीवर उतरवणं. ज्याला आपण "To pen it down" म्हणतो. वहीवर किंवा स्क्रीन वर जिथे पण तुमहाला सोईस्कर जाईल तिथे, विषयाला धरून आपल्या डोक्यात जे काही विचार असतील ते लिहूनच घ्यायचे.

कुठेही चुकलो म्हणून न थांबता प्रवाहासह फक्त लिहीत राहा. शब्द संख्या, व्याकरणातील चुका किंवा अजून कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता, तो प्रवाह न तोडता फक्त लिहीत राहा. संपूर्ण लिखाण झाल्यावर आपल्याला जे मिळेल त्याला म्हणतात पहिला मसुदा म्हणजेच, "First Draft." 

बरेच ब्लॉगर्स पहिला मसुदा लिहिता लिहिताच चुका दुरुस्त करतात. ज्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की चुका दुरुस्त करण्याच्या नादात आपण काही महत्वाच्या गोष्टी विसरून जातो. त्यामुळे पहिला मसुदा म्हणजेच "first draft" लिहीत असतांना कधीच झालेल्या चुकांकडे लक्ष देऊ नका जे डोक्यात येईल ते फक्त लिहीत चला.

 • आपणच "Writers" आणि आपणच "Editors"

आता आपल्याकडे संपूर्ण ब्लॉग तयार आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण काय लिहिलं आहे. त्यामुळे आता आपण एडिटिंग सुरु करू शकतो. 

 1. वाक्यरचना
 2. व्याकरणातील चुका 
 3. शुद्धलेखनाच्या चुका (spelling mistakes)
 4. आणि मराठीत ब्लॉग लिहीत असल्यास खासकरून रस्व आणि दीर्घाच्या चुका

या सगळ्या चुकांकडे आपण लक्ष द्यायला हवं. त्याच बरोबरीने बऱ्याच वेळा लिहिणाच्या नादात आपण विषय सोडून सुद्धा इतरच गोष्टी लिहून घेतो, जे त्या क्षणाला आपल्याला विषयाशी निगडित वाटतं. पण नंतर पुन्हा तेच वाचत असतांना आपल्याला लक्षात येतं की या वाक्याचं किंवा या परिच्छेदाचं इथे काहीच काम नव्हतं. तर एडिटिंग करतांना या गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे.

सुरुवातीच्या दिवसात कोणी एडिटर हायर करून त्याच्या कडून आपला ब्लॉग एडिट करून घेणं हे आर्थिकदृष्ट्या प्रत्येकाला परवडलेच असं मुळीच नाही. जर एखाद्याला ते शक्य जरी होत असेल तरी इतक्या प्रार्थमिक टप्प्यावर त्याची गरज नाही. तुम्ही स्वतः सुद्धा एडिटिंग करू शकता. Grammarly आणि Hemingway Editor हे काही साईट्स आहेत जे एडिटिंगसाठी तुमच्या कामात पडतील.

 • Check Plagiarism

सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात plagiarism ही साहित्याची चोरी मानल्या गेली आहे किंबहुना plagiarism याचा मराठी अनुवादच हा साहित्य चोरी असा आहे. आपल्या भारतीय संविधानात देखील या गुन्ह्यासाठी शिक्षेचं प्रावधान आहे. त्यामुळे आपला ब्लॉग कुठेही प्रकाशित करण्याआधी किंवा कुठेही पोस्ट करण्याआधी आपल्या ब्लॉग मध्ये कुठेही plagiarism नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. 

आजचा तारखेला कदाचितच एखादी विषय असा सुटला असावा ज्यावर कोणी काहीच लिहिलं नाही. आज प्रत्येक विषयावर बऱ्याच लोकांनी ब्लॉग लिहिले आहेत. त्यामुळे नकळत का होईना पण कधी-कधी आपल्या ब्लॉग मधील काही ओळी आणि दुसऱ्या कोणाच्या ब्लॉगच्या काही ओळी या सारख्या राहू शकतात. त्यामुळे plagiarism तपासणे हे फार महत्वाचं आहे. 

त्यासाठी बऱ्याच वेबसाइट्स उपलब्ध आहे.

 • Facts and Figures: ब्लॉगचे २ महत्वाचे स्तंभ

बहुतांश सामाजिक, आर्थिक, राजनैतिक किंवा टीकात्मक विषयांवर ब्लॉग लिहितांना सगळ्या गोष्टी खऱ्या आहे याची खात्री करून घ्यायला हवी. म्हणजे आपण आपल्या ब्लॉग मध्ये दिलेली प्रत्येक माहितीत तथ्य आहे आणि ती शत प्रति शत खरी आहे याची खात्री असावी. कुठलीही गोष्ट आपल्याला वाटते म्हणून आणि फक्त अंदाजाच्या भरवश्यावर लिहू नये.

उदारणार्थ: तुम्ही जर स्पोर्ट्स ब्लॉगर असाल आणि आताच झालेल्या ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या नीरज चोप्रा यांच्यावर जर तुम्ही ब्लॉग लिहिणार असाल, तर त्यांची पार्श्वभूमी काय होती?, त्यांचं राहतं गाव कोणतं आहे?, ही सगळी माहिती अगदी बरोबरच हवी. आपल्याला वाटतं तो हरियाणा मध्ये कुठे तरी राहत असावा म्हणून फक्त तेवढच लिहिणं योग्य नाही.

यामुळे लोकांचा आपल्या ब्लॉग वर विश्वास राहत नाही आणि आपल्याकडे एक "Unauthentic Source" म्हणून लोक बघतात. त्यामुळे लोकांचा विश्वास जिंकायचा असले तर आपल्या ब्लॉग मध्ये सत्यता ही असायलाच हवी. 

 • फोटोज आणि व्हिडिओज: The Game Changer

इंग्रजीत एक म्हण आहे, "A photo speaks more than a 1000 words can." by Fred R. Barnard. दहा वेळा समजावून सुद्धा एखादल्या जी गोष्ट समजणार नाही ती एखादा फोटो किंवा विडिओ दाखवला तर एका क्षणात समजेल. याचाच अनुभव आपण सुद्द्धा आपल्या आयुष्यात कधी न कधी नक्कीच घेतला असेल. 

आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती काश्मीर फिरून आल्यावर आपल्या कितीही सांगेल की, "तिथे इतका मोठा पर्वत होता, इतका बर्फ होता." पण हे सगळं न सांगता त्याने आपल्याला एक फोटो जरी दाखवला तरी आपल्या लगेच कळून चुकतं की तिथलं वातावरण कसं असेल, किती थंडी असेल, इत्यादी. याच प्रकारे ब्लॉग्स मध्ये देखील फोटोज आणि व्हिडिओजचं आपलं एक महत्व आहे.

उदारणार्थ: एखादी फूड ब्लॉगर जर आपल्या ब्लॉग मध्ये मुंबईच्या सगळ्यात प्रसिद्ध पावभाजी बाबत सांगत असेल तर लोकं ते कदाचित आवडीने वाचतीलही. पण त्यासोबत जर तिने तिथल्या पावभाजीचा एक फोटो जरी टाकला, तरी लोकांच्या तोंडाला पाणी सुटेल आणि लोकं तो ब्लॉग अजून उत्साहाने वाचतील. त्यामुळे कुठल्याही ब्लॉग मध्ये फोटोज आणि व्हिडिओज हे असावे. पण ते सुद्धा गर्जे अनुसार आणि आवश्यक असेल तिथेच.

 • Last step to "ब्लॉगर"

सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे अंतिम विश्लेषण आणि पोस्ट. आपला ब्लॉग पोस्ट करण्याआधी संपूर्ण ब्लॉग एकदा वाचून घ्या. एकदा त्यावरून नजर फिरवून घ्या. काही वाक्य अजून पण जर खटकत असतील तर ते बदलवून टाका. जर एखादी फोटो किंवा विडिओची तिथे गरज नसेल वाटत तर तो तिथून काढून घ्या आणि हे सगळं आटोपलं म्हणजे तुम्ही आता पूर्णपणे तयार आहात आपला ब्लॉग पोस्ट करण्याकरिता. आता तुम्ही तुमचा ब्लॉग पोस्ट करू शकता. 

या सोपी ८ गोष्टी करून तुम्ही एक उत्तम ब्लॉग लिहू शकता. सध्याची परिस्थिती बघता ब्लॉग्स हा फक्त एक छंद नसून, ही काळाची गरज होत चालली आहे. सामाजिक, राजनैतिक आणि इतरही बऱ्याच विषयांबाबत आपल्याला ब्लॉग्सच्या माध्यमातून माहिती मिळते. त्यामुळे ब्लॉग लिहिणे हा फक्त फावल्या वेळेत केलेला एक उपक्रम नसून सामाजिक बांधिलकीचं एक माध्यम आहे याच परिभाषाने आपण सगळ्यांनीच त्याच्याकडे बघायला हवं. Blogger, Wordpress किंवा Wix या सारख्या अनेक वेबसाइट्स आहेत ज्यावर तुम्ही ब्लॉगिंग सुरु करू शकता.

हा ब्लॉग तुमहाला ब्लॉग लिहिण्यास नक्कीच मदतीचा ठरेल ही अशा!

image-description
report Report this post