साबुदाणा खिचडी रेसिपी - वीकएंडचा परफेक्ट ब्रेकफास्ट!

12 minute
Read

Highlights

साबुदाणा खिचडी वरवर पाहता बनवायला अवघड वाटू शकते पण नवशिक्या व्यक्तींसाठी ती एक अत्यंत सोपी आणि उत्कृष्ट रेसिपी आहे. पोषकमूल्यांनी समृद्ध अशा या घटकापासून आपण आता एक मस्त, स्वादिष्ट पदार्थ बनवूया. पुढे वाचा आणि ही सोपी आणि चवदार खिचडी रेसिपी बनवून पाहा.

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this recipe in English here.)

जेव्हा आपण 'खिचडी' हा शब्द उच्चारतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर आजारी माणूस आणि डाळभाताचे ताट असे चित्र उभे राहते. पण खिचडी इतकी कंटाळवाणी आणि नावडती असायला हवी का? मला असे वाटत नाही. माझे खिचडीबद्दलचे मत कशाने बदलले? तर त्याचे कारण आहे ही मजेशीर, खमंग आणि अत्यंत चविष्ट अशी साबुदाणा खिचडी रेसिपी.

मला माहीत आहे की घरातली लहान मुले, युवक-युवती डायनिंग टेबलावर साधी खिचडी दिसली की नाक मुरडतात. आरोग्यदायी आहार महत्वाचा आहे हे खरेच आहे, पण त्यासाठी नेहमी चवीसोबत तडजोड करायलाच हवी का? नाही!

कुठल्याही नवशिक्या व्यक्तीला बनवता येईल अशी ही उत्तम रेसिपी आहे. मग तयार आहात ही खमंग रेसिपी शिकायला? खाली दिलेली रेसिपी वाचा आणि तुमच्या प्रियजनांसाठी बेस्टम्-बेस्ट साबुदाणा खिचडी बनवा!

साबुदाणा खिचडी

साबुदाणा काय आहे?

साबुदाणा, ज्याला इंग्रजीत 'सागो' असे नाव आहे, छोटा मोत्यासारखा दिसणारा पदार्थ असतो. त्याचा केंद्रभाग स्पंजसारखा मऊ असतो. हे मोत्यासारखे दाणे संबंधित वनस्पतीपासून काढलेले नैसर्गिकरीत्या बनलेले नसतात. किंबहुना, ताडाच्या जातीच्या झाडाच्या फांद्यांमधल्या पिष्टमय पदार्थापासून त्यांना या आकारात बनवले जाते. या फाद्यांच्या मध्यभागी असलेला पिष्टमय पदार्थ काढून घेतला जातो, त्याची पावडर केली जाते आणि मग त्यांना सुंदर मोत्यासारखा आकार दिला जातो.

साबुदाणा सागो, रागई आणि साकसाक या नावांनी बहुप्रचिरीत आहे. साबुदाण्याचे पदार्थ कोणत्या प्रदेशात खाल्ले जातात याबद्दल बोलायचे झाले तर विविध देशांमध्ये साबुदाण्याचे जे उत्पादन होते त्यापैकी दक्षिण-पूर्व देशांत साबुदाणा खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. आणि अर्थात, भारत त्यापैकी एक आहे.

साबुदाणा खिचडी का खावी?

या रेसिपीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ही उपासाला देखील खाऊ शकता. प्रत्येक उपासासाठी ही योग्य असेलच असं नाही पण नवरात्रीच्या उत्सवासाठी ही अत्यंत साजेशी रेसिपी आहे. नवरात्रीच्या उपासात बहुतांश घरांत जे सात्विक घटक वापरले जातात ते यात आहेत. नवरात्रीच्या काळात खाल्ले जाणारे पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर हा पदार्थ तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे.

नवरात्रीमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या प्रमुख पदार्थांपैकी हा एक तर आहेच, पण सकाळच्या नाश्त्यासाठी देखील साबुदाणा खिचडी हा एक उत्तम पर्याय आहे. मग तुम्ही डाएटवर असलात किंवा आरोग्यदायी असा एखादा पदार्थ झटकन बनवायचा असेल तरीही. असे का? कारण त्यात तुम्हाला ताजेतवाने करणारे असे घटक आहेत जे तुमचं पोट बराच वेळ भरलेलं ठेवतात.

ग्लूटन असलेल्या पदार्थांऐवजी पर्याय म्हणून साबुदाणा अत्यंत चांगला असतो. त्याची पावडर करून वापरल्यास अनेक घटकांना एकत्र आणून एकसंध करणारा घटक म्हणून रेसिपीजमध्ये तो वापरता येतो. फक्त खिचडीच नव्हे, तर साबुदाणा इतर अनेक रेसिपीजमध्ये वापरला जातो, उदाहरणार्थ टिक्की, पापड, पुडिंग, खीर आणि इतर अनेक पदार्थ.

त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. त्याबद्दल खाली विस्ताराने दिले आहे. ते नंतर पाहू. आता आपण रेसिपीकडे वळूया.

सर्व्हिंग - ४ जणांसाठी

वेळ - ३० मिनिटे + ४ तास साबुदाणा भिजवण्यासाठी

काठिण्य पातळी - नवशिक्यांसाठी

प्रकार – शाकाहारी

साबुदाणा खिचडी साहित्य

साहित्य:

१. १ कप साबुदाणा

२. १/४ कप शेंगदाणे

३. १ मध्यम आकाराचा बटाटा

४. २ टेबलस्पून तूप

५. ४ हिरव्या मिरच्या

६. १/२ इंच आल्याचा तुकडा

७. १ टेबलस्पून जिरे

८. ८ ते १० कडीपत्त्याची पाने

९. १ टीस्पून काळी मिरी

१०. ताजी कोथिंबीर

११. चवीनुसार मीठ

१२. लिंबाचा रस

तयारी:

• साबुदाणा भिजवण्यापासून सुरुवात करावी. ही खूप महत्वाची पायरी आहे कारण साबुदाणा व्यवस्थित शिजण्यासाठी तो आर्द्र असणं गरजेचं असतं.
• धावत्या पाण्याखाली साबुदाणा २-३ वेळा धुवून घ्या आणि तो ४ ते ५ तास भिजत ठेवा. तुमच्या लक्षात येईल की तो भिजवल्यानांतर आकाराने दुप्पट होतो.

साबुदाणा

• तुम्ही जर माझ्याप्रमाणेच ताजे शेंगदाणे वापरणार असाल तर तुम्हाला ते आधी भाजून घ्यावे लागतील.
• त्यासाठी गॅस चालू करा आणि माध्यम आचेवर शेंगदाणे थोडेसे तपकिरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. ते भाजत असताना तुम्हाला छान खमंग वास येईल.

शेंगदाणे

• शेंगदाणे खमंग भाजले की मग ते भरडून घ्या.
• मग हिरवी मिरची आणि आले बारीक चिरून घ्या.
• आता बटाटे एकसारख्या चौकोनी आकारात कापून घ्या. बटाट्याचे सर्व तुकडे समान आकाराचे असू द्या.

एवढीच तयारी करायची आहे. आता कृतीकडे वळूया. पुढे वाचा.

कृती:

• कढईत २ टेबलस्पून तूप घ्या. साबुदाणा तुपात शिजवलेला उत्तम लागतो.

• तूप वितळले की त्यात जिरे आणि कडीपत्ता घाला.
• जिरे आणि कडीपत्ता तडतडू लागला (जाळू नये), की मग मिरच्या आणि आले घाला.

• काही सेकंद हे परतून घ्या आणि मग त्यात बटाटे घाला. हे सर्व नीट हलवून, मिक्स करून घ्या आणि त्यावर झाकण ठेवा.

• मधूनमधून हे सर्व मिक्स करत राहा. बटाटे सोनेरी-तपकिरी रंगाचे व्हायला हवेत.

• बटाटे सोनेरी-तपकिरी रंगाचे झाले? आता त्यात भरडलेले शेंगदाणे घाला.

• पुन्हा हे सर्व मिक्स करा आणि त्यात मीठ आणि काळी मिरी घाला. मिक्स करा आणि काही सेकंद शिजवा.
• पुढची स्टेप आहे भिजवलेला साबुदाणा यात घालण्याची. साबुदाणा घालत असताना गॅसची आच मध्यम ठेवा.

• साबुदाणा शिजू लागला की तो जेलीसारखा बनू लागेल.
• आता या टप्प्यावर काही लोक तिखटपणा कमी करण्यासाठी साखर घालतात. पण मला साखर घातलेली आवडत नाही. तुमच्या आवडीप्रमाणे ती घालू किंवा वगळू शकता.

• झाकण ठेवा. आच अगदी मंद करा आणि ५ मिनिटे शिजवा. अर्थात, अधूनमधून ढवळत राहणे आवश्यक आहे.
• साबुदाणा अर्धपारदर्शक मोत्यांसारखा दिसू लागेल. आता या स्टेपला बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घाला.
• एवढ्या साबुदाण्यासाठी अंदाजे २ लिंबांचा रस घालू शकता. किंवा मग २ टेबलस्पून लिंबूरस.

• साबुदाणा खिचडी तयार! गरमागरमच वाढा.

तुम्ही साबुदाणा खिचडी सॅलड आणि दह्यासोबत सर्व्ह करू शकता. साबुदाणा खिचडीसोबत या साईड डिशेस छान लागतात.

लक्षात ठेवायच्या गोष्टी:

• साबुदाणा भिजवून घेणे ही खूप महत्वाची स्टेप आहे. असे का? कारण शिजवण्याआधी साबुदाणा भिजवून तयार करून घेणे गरजेचे असते नाहीतर मग तो कडक होतो. त्याचा बाहेरील भाग नरम आणि आतला भाग कडक राहतो. त्याशिवाय, तो मग चवीला मातीसारखा लागतो.
• तुम्ही उपास करत असाल तर या रेसिपीमधल्या कोणत्या गोष्टी उपासाला चालतात किंवा नाही हे तपासून घ्या. उदाहरणार्थ काहीवेळा, लोक उपासात कोथिंबीर, आले किंवा लिंबूसुद्धा खात नाहीत. म्हणून, तुमच्या उपासात या गोष्टी चालत नसतील तर तुम्ही त्या वगळू शकता.
• खूप जास्त वेळ शिजवू नका. बटाटे शिजवून घेताना असे होऊ शकते कारण तेव्हा आर्द्रता नसते आणि आले, कडीपत्ता वगैरे जळू शकतात. म्हणून कढई मध्यम आचेवर ठेवा.
• साबुदाणा खूप जास्त वेळ भिजवू नका. ४ ते ५ तास भिजवणे पुरेसे असते. तुम्ही तो पूर्ण दिवस भिजवत ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की त्याचा पोत हरवतो आणि तो खूप जास्त नरम होऊन त्याचा लगदा होतो. असे साबुदाणे शिजवले तर खिचडी खूप चिकट होते जे आपल्याला टाळायचे आहे.

साबुदाण्याची खीर

साबुदाण्याचे काही उत्कृष्ट फायदे

आधी सांगितल्याप्रमाणे, आपण साबुदाण्याचे फायदे पाहणार होतो. तर असे आहेत त्याचे फायदे. ते फक्त स्वादिष्ट जेलीसारखे दिसणारे मोती नाही आहेत तर उत्कृष्ट आरोग्यदायी फायदे असणारे जादुई गोळे आहेत जणू. काय आहेत साबुदाण्याचे फायदे?

१. साबुदाणा ग्लूटन-फ्री आहे

साबुदाणा हा एक पिष्टमय पदार्थयुक्त घटक आहे ज्यात अनेक शरीरोपयोगी खनिजे असतात. त्यात ग्लूटन नसते. त्यामुळे तुम्हाला ग्लूटनची अॅलर्जी असेल किंवा ग्लूटन इंटॉलरन्सची समस्या असेल तर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. पोटफुगी, अनपेक्षित वजनघट, जुलाब, थकवा हे सर्व टाळा आणि आरोग्यदायी सुरुवात करा.

२. ऊर्जेचा उत्तम स्रोत

साबुदाण्यात मुबलक कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स (चांगल्या प्रकारचे) असतात आणि या दोन गोष्टी तुम्हाला ऊर्जा पुरवण्यासाठी अत्यंत उत्तम असतात. म्हणून तुम्ही सकाळी ही खिचडी खाल्लीत तर तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळत राहील.

तुम्हाला याबाबत काही शंका असेल तर हे संशोधन ही गोष्ट सिद्ध करेल. यात तज्ज्ञांनी हे सिद्ध केले की साबुदाणा आणि सॉय यामुळे सायकलिंगचा व्यायाम करताना कामगिरी कशी अधिक चांगली होते.

साबुदाण्या

३. पचायला सोपा

पोट बिघडलेय, बद्धकोष्ठ किंवा अपचन झालेय? मग आता चिंता नको कारण साबुदाणा आहेच आपल्या मदतीला. का? कारण त्यातले उच्च फायबर गुणधर्म तुमची पचनक्रिया निरोगी ठेवतात.

४. रक्तदाब कमी करण्यासाठी सर्वोत्तम

साबुदाण्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. उदाहरणार्थ एक कप साबुदाण्यात १६.७ ग्राम पोटॅशियम असते. लघुकालीन पोटॅशियम-पूरक आहार हा तुमचा उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी सर्वोत्तम असतो. तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही साबुदाण्याचे पदार्थ खाल्लेच पाहिजेत कारण ते रक्तवाहिन्यांमधील दाब कमी करतात.

५. हाडे मजबूत होतात

साबुदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते जे तुमच्या हाडांसाठी चांगले असते. म्हणूनच बरेच पालक आपल्या लहान मुलांना साबुदाण्याचे पदार्थ खायला देतात. त्याशिवाय, ‘ऑस्टेओपोरॉसिस’ सारखा आजार असेल्या लोकांसाठी देखील साबुदाणा उत्तम आहे.

सारांश

आता तुम्हाला साबुदाण्याबद्दलची सर्व माहिती कळल्यावर किचनमध्ये जाऊन साबुदाण्याची एखादी मस्त रेसिपी बनवण्याची ही वेळ आहे. या वीकएंडला ही खमंग आणि हलकीफुलकी रेसिपी बनवून तुमच्या फॅमिलीला मस्त सरप्राईझ द्या.

तुम्हाला ही अत्यंत सोपी आणि स्वादिष्ट साबुदाणा खिचडी रेसिपी आवडेल अशी आशा आहे. अशा आणखी उत्तमोत्तम रेसिपीजसाठी स्टे ट्यून्ड!

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर. Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture

साबुदाणा काय आहे?
साबुदाणा, ज्याला इंग्रजीत 'सागो' असे नाव आहे, छोटा मोत्यासारखा दिसणारा पदार्थ असतो. त्याचा केंद्रभाग स्पंजसारखा मऊ असतो. हे मोत्यासारखे दाणे संबंधित वनस्पतीपासून काढलेले नैसर्गिकरीत्या बनलेले नसतात. किंबहुना, ताडाच्या जातीच्या झाडाच्या फांद्यांमधल्या पिष्टमय पदार्थापासून त्यांना या आकारात बनवले जाते. या फाद्यांच्या मध्यभागी असलेला पिष्टमय पदार्थ काढून घेतला जातो, त्याची पावडर केली जाते आणि मग त्यांना सुंदर मोत्यासारखा आकार दिला जातो.
साबुदाणा खिचडी का खावी?
या रेसिपीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ही उपासाला देखील खाऊ शकता. प्रत्येक उपासासाठी ही योग्य असेलच असं नाही पण नवरात्रीच्या उत्सवासाठी ही अत्यंत साजेशी रेसिपी आहे
साबुदाण्याची खिचडी बनवायचे साहित्य काय आहे ?

फास्टफूड टाळा

आहारात सोडियमचं प्रमाण कमी करा

मद्यपान-धुम्रपान टाळा

नियमित व्यायाम करा

तणाव कमी करा

पुरेसे पाणी प्या