Go To Forum

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह, सौख्य!

tejasvinidandgawal
tejasvinidandgawal

Asked on Oct. 29, 2021 | 0 Responses

दिवाळीचा सण माझ्या साठी नुसता एकत्र येणे असा कधीच नसतो. प्रत्येक दिवाळी ही काहीतरी स्पेशल असतेच. कधी आनंदाने भरलेली... कधी नव्या व्यक्तीच्या चाहुलाची..तर कधी यशाची गुरुकिल्ली घेऊन आलेली. सणाचा गोडवा हा मनातून निर्माण होतो. परिवार त्यांचं प्रेम खूप भरभरून पहायला मिळत. खवय्यांाठी तर नुसती चंगळच.  ऑनलाईन शॉपिंग पासून ते गावातील बाजार, इथपर्यंत न संपणाऱ्या गोष्टी घेण्याची आतुरता म्हणजे दिवाळी. प्रत्येकाला भेटणं, फराळाचा आस्वाद घेणं, भेटवस्तूंचा वर्षाव करत दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने साजरा करणं. गोड आठवणींचा हा ठेवा जपत पुढच्या दिवाळीची चाहूल मनी जपत पुन्हा नव्याने आपल्या कामाला ,दैनंदिन जीवनात रुजू होणे

 

 

image description