सेल्फ डिफेन्ससाठी 21 टिप्स

18 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

तुम्हाला नेहमीच स्वतंत्र आणि सुरक्षित राहायचे असेल तर 'सेल्फ डिफेन्स' म्हणजेच ‘स्वसंरक्षण’ ही एक मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ही सर्वात चांगली गोष्ट आहे. तर, पुढे वाचा आणि स्वसंरक्षणासाठी तुम्ही नक्कीच वापरायला हवी अशी २१ सर्वोत्तम तंत्रे आणि साधने जाणून घ्या.

लैंगिक अत्याचार कितीही गंभीर असले तरी स्त्रिया, विशेषतः भारतातील स्त्रिया स्वसंरक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

तुम्ही माझ्याशी सहमत आहात का?

बरं! मी तुम्हाला एक गोष्ट सांगते,

एक बारा वर्षांची मुलगी एका आंतरराष्ट्रीय जत्रेत होती. काही मुलगे तिच्या बाजूने चालत गेले आणि त्यांनी तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला. तिने काय केले? काहीही नाही.

पण आतून तिला दुःख आणि असहायता जाणवत होती.

ही गोष्ट फक्त त्या मुलीची नाही तर या देशातील जवळपास प्रत्येक स्त्रीची आहे. रस्त्यावर किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही अनोळखी अपरिचित व्यक्तीने तुम्हाला किती वेळा छेडले आहे? किती वेळा तुम्हाला असा अनुभव आला आहे?

वाईट गोष्ट म्हणजे कोणत्याही वयाच्या मुलीसोबत/ स्त्रीसोबत हे घडते. सगळ्यात दुःखद बाब म्हणजे लाखो महिलांना अशा प्रसंगी काय करावे आणि स्वतःसाठी कसे लढावे हे देखील माहीत नाहीये.

पण त्यावर उपाय आहे! तो म्हणजे अशा वेळी स्वसंरक्षणार्थ काही शारीरिक कृती करायला शिकणे- सेल्फ डिफेन्स किंवा स्वसंरक्षण युक्त्यांद्वारे.

म्हणून आम्ही २१ सर्वोत्तम अशा स्वसंरक्षण टिप्स घेऊन आहोत ज्या तुम्हाला समाजातील अशा नराधमांपासून स्वतःचे संरक्षण करण्यात मदत करतील.

a lady practicing self defense

१. तुम्ही पुरुषांसाठी काही सीमा आखल्या पाहिजेत

स्त्रियांना हे कळत नाही की आजूबाजूच्या पुरुषांसाठी किंवा एकूणातच सर्व पुरुषांसाठीच एक सीमा निश्चित करणे आवश्यक आहे. आणि ही सीमा शाब्दिक, शारीरिक आणि मानसिक अशा प्रत्येक बाबतीत आवश्यक असते. स्त्रिया ही गोष्ट गांभीर्याने का घेत नाहीत? कारण त्यांना वाटते की पुरुष दयाळू असतात आणि त्यांना स्त्रियांशी कसे वागावे हे माहीत असेल. हो, काही पुरुष हे भान ठेवून वागत असतील पण सर्वच पुरुष तसे नसतात.

२. ग्रेसी जिऊ जित्सू (Gracie Jiu Jistu) तंत्र

ग्रेसी जिऊ जित्सू किंवा Brazilian Jiu Jistu (ब्राझिलियन जिऊ जित्सू) सेल्फ डिफेन्स हा घडणाऱ्या घटनेच्या ठिकाणीच लढा देण्यावर आधारित आहे. मी या तंत्राचा  उल्लेख का करतेय? कारण हे तंत्र आणि लढण्याची शैली गेल्या ८० वर्षांपासून मुलींना/ स्त्रियांना वाचवत आली आहे!

निःसंशयपणे, हे तंत्र तुम्ही वापरले पाहिजे कारण जेव्हा केव्हा एखादा लैंगिक आक्रमक तुमच्यावर हल्ला करणार असतो तेव्हा तो त्याआधी सुमारे ४ टप्पे ओलांडत असतो. या लैंगिक आक्रमकांना कसे रोखायचे आणि प्रत्येक वेळी स्वतःचा बचाव किंवा संरक्षण कसे करायचे याबाबतीत हे प्रशिक्षण तुम्हाला तयार करेल.

a lady wearing boxing gloves and practicing self defense

३. आपल्या अंतःप्रेरणेला कधीही कमी लेखू नका.

काहीही चुकीचे घडण्याआधी, तुम्हाला एक प्रकारची आंतरिक चाहूल लागत असते की आता काहीतरी चुकीचे घडणार आहे. पण आपण स्त्रिया या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. म्हणून, आपल्या अंतःप्रेरणेला कधीही गृहीत धरू नका आणि काहीतरी चुकीचे घडण्याआधी होत असलेल्या गोष्टीवर किंवा घटनेवर व्यक्त व्हा.

आणखी एक गोष्ट, नेहमी आपल्या सभोवतालचे भान ठेवा. हे खूपच महत्वाचे आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किंवा अनोळखी व्यक्तीच्या सान्निध्यात असता.

४. तुम्ही आक्रमक पुरुषाच्या शरीराच्या कोणत्या भागावर हल्ला करू शकता ते जाणून घ्या

तुमच्यावर जेव्हा असा लैंगिक हल्ला होत असतो तेव्हा तुम्ही भांबावून जाता, स्तब्ध होता, तुम्हाला एकप्रकारचा धक्का बसतो आणि त्यामुळे अशावेळी आपल्या बुद्धीचा वापर करू न शकण्याइतक्या तुम्ही सुन्न होता. या गोष्टी सहसा इतक्या वेगाने घडतात की प्रतिक्रिया कशी द्यायची हे तुम्ही ठरवू शकत नाही. परंतु या अवस्थेदरम्यानच त्या आक्रमक पुरुषाच्या शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही हल्ला करू शकता हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

कुठे मारायचे?

  • जांघेत (मांडीच्या सांध्यात- सर्वात महत्त्वाचे)
  • डोळे
  • नाक
  • गळा

या भागांवर हल्ला करणे हे केवळ त्या लैंगिक आक्रमक पुरुषाला तुमच्यापासून दूर करण्यासाठी नसते तर त्याने त्या आक्रमक पुरुषावर गंभीर स्वरूपाचा आघात होऊन, तो कमकुवत होऊन जे काही चुकीचे कृत्य करू धजत असेल त्यापासून तो विचलित होऊ शकतो. म्हणून, अशा प्रसंगात असा शारीरिक हल्ला करणे हा सर्वोत्तम उपाय असतो.

५. मनगटावरची पकड सोडवणे

 a lady hitting a guy in self defense

जर कोणी तुमचे मनगट घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला तर? मला माहीत आहे की यातून बाहेर पडणे वरकरणी सोपे वाटू शकते परंतु जर तुम्हाला योग्य पद्धत माहीत नसेल तर ते खूप कठीण असते.

तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे

  • तुमच्या विरुद्ध हाताने आक्रमक पुरुषाचे मनगट पकडा
  • मग मनगट पकडलेला हाताचे कोपर अगदी वरपर्यंत न्या
  • तुमच्या शरीराचा मुख्य, मधोमधचा भाग वापरून आक्रमकाचा हात पटकन खाली सरकवा.

६. मागून केलेल्या हल्ल्यातून स्वतःला सोडवणे

a lady hitting a guy with her knee in self defense

हल्लेखोर तुमच्यावर मागून हल्ला करू शकतो. मग तेव्हा काय करायचं? जर त्याने तुम्हाला मागून बळजबरीने पकडले तर ही युक्ती तुम्ही वापरू शकता .

  • स्वतःचे शरीर आतल्या बाजूला ओढा
  • तुमचे नितंब कोणत्याही दिशेने त्या पकडीतून बाहेर काढा आणि आपले शरीर उलट्या बाजूला (हल्लेखोराकडे तोंड करून) वळवा.
  • मग त्या पुरुषाच्या जांघेत/ मांडीच्या सांध्यांत जोरदार हल्ला करणे सुरू करा.
  • वळून त्या व्यक्तीची मान हातांनी घट्ट पकडा.
  • जांघेत गुडघ्यांनी लाथा मारणे चालू ठेवा.

येथे एक टीप आहे: जर त्या व्यक्तीने तुम्हाला मागून पकडले आणि तुम्हाला वर उचलले, तर मागच्या बाजूने जांघेत लाथा मारा.

  1. गळचेपीमधून सुटका

हल्लेखोराने तुमची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्यास आश्चर्य नाही. साहजिकच, तो दबाव वापरतो ज्यामुळे लगेचच तुमचा श्वास मंदावतो.

कोणी तुमच्यासोबत असे केल्यास तुम्ही हे करू शकता:

  • हात वर करा,
  • हल्लेखोराचा विरुद्ध हात खाली करा
  • हल्लेखोराचा हात धरा आणि जोरात खाली करा.
  • आपल्या कोपराने, त्याच्या चेहऱ्यावर मारा

मला माहीत आहे की हे बोलायला सोपे आणि करायला कठीण आहे. पण तुमचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काहीतरी केले पाहिजेच.

  1. स्वतःचे केस पकडीतून सोडवणे

हल्लेखोर तुम्हाला फक्त पकडू शकत नाही किंवा तुमची गळचेपीच करू शकत नाही तर तो केसांचा वापर करून तुमच्या कवटीला देखील हिसका देऊ शकतो. तुम्ही काय करू शकता:

  • तुमचे हात वर घ्या आणि हल्लेखोराचा/ चे हात पकडा.
  • स्वतःचा चेहरा वाचवण्यासाठी आपले कोपर वापरा
  • वळा आणि हल्लेखोराच्या मागच्या बाजूला या.
  • त्याचे हात मुरगळा
  • त्याच्या हाताला जोरात त्याच्या खांद्याच्या दिशेने ढकला ज्यामुळे त्याचा खांदा देखील निखळू शकतो.

practicing self defense

  1. हल्ल्याची आपली कृती खंड पडू न देता चालू ठेवा

असा एक गैरसमज आहे की जर एखाद्या स्त्रीने तिच्यावर हल्ला करणाऱ्या पुरुषाला मारले तर तो माणूस अधिक आक्रमक होऊ शकतो. असे का होते माहीत आहे का? याचे कारण असे की तुम्ही त्याला मारता आणि मग त्याच्याकडे बघता ज्यामुळे त्याला अविचार करण्यास आणि धिक आक्रमकतेने हल्ला करण्यास वेळ मिळतो.

तुम्ही ते करायचं नाहीये. म्हणून, जेव्हा तुम्ही तो पहिला फटका माराल तेव्हा तो मार चालू ठेवा आणि अजिबात थांबू नका. तो आक्रमक होण्यापूर्वीच तुम्ही त्याच्यावर हल्ला करा.

  1. प्रसंग तुमच्यासाठी सोपा करायचा प्रयत्न करा

तुमच्यावर ओढवलेला प्रसंग हाताळायला सोपा करता आला तर? हे स्वतःला हल्लेखोरांच्या स्वाधीन करण्याबद्दल नाही तर त्यांना शांत करण्याच्या बाबतीत आहे. ही एक अत्यंत चलाख युक्ती आहे.

स्वतःला शांत करा आणि समोरच्याला सुद्धा शांत करा. त्यानंतर, "बनावट सहकार्याचे" धोरण वापरा जसे की तो तुम्हाला जे काही सांगेल ते करण्याचे नाटक करत राहा. तेवढ्यातच परिस्थिती हाताळता येते का याचे विश्लेषण करा. नसल्यास, योग्य वेळ निवडा आणि हल्ला करा.

शांत व्हा, सहकार्य करत असल्याचे नाटक करा आणि मग हल्ला करा. ही अत्यंत प्रभावी युक्ती आहे.

  1. अपहरण संदर्भातली साधने

हे मान्यच करायला हवे की भारतात अपहरण ही अगदी सामान्य गोष्ट आहे. भारतात ४ लाखांहून अधिक महिलांचे अपहरण झाले आहे. म्हणून, तुम्ही काय करू शकता ते म्हणजे काहीएक प्रकारची साधने निवडा आणि ती नेहमी स्वतःकडे ठेवा. मला विचाराल तर अनेक महिलांना कामी आलेली दोन सर्वोत्तम साधने आहेत.

  • हँडकफ की (चावी) - ही तुमच्याकडे असेल तर ती कोणतीही हँडकफ उघडू शकते. ही गोष्ट अनेकांना माहीत नाही.
  • ब्लेड- ब्लेड तुमच्यासाठी धोकादायक असू शकते परंतु तुम्ही ते डक्ट टेपमध्ये गुंडाळून तुमच्याकडे ठेवू शकता. एक ब्लेड तुम्हाला दोरी, टेप किंवा इतर कोणत्याही वस्तूमधून बाहेर काढण्यासाठी अत्यंत शक्तिशाली असते.
  1. तुमचा आवाज मोठा आणि स्पष्ट करा

a lady getting angry

कधीकधी, आपल्याला शारीरिक पातळीवर उतरण्याची देखील आवश्यकता नसते. असे सहसा तेव्हा असते जेव्हा तुम्हाला हल्ल्याची पूर्ण जाणीव असते आणि तो कधी होणार आहे याची चाहूल लागलेली असते. स्वतःच्या भावना स्पष्ट करण्याची हीच योग्य वेळ आहे. मोठ्याने ओरडून त्याला तुमचा आवाज स्पष्टपणे ऐकवा. कारण, “नाहीचा अर्थ नाही असाच घेतला गेला पाहिजे”.

  1. आणखी काही निशस्त्र तंत्रे

स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला शारीरिक हल्लाच करणे आवश्यक आहे असे नाही. काही निशस्त्र चाली आहेत ज्या तुम्ही वापरून पाहू शकता. उदाहरणार्थ: जर कोणी रस्त्यावर तुमचा पाठलाग करत असेल, तर काही युक्त्या वापरून पहा जसे की तुमचा रस्ता बदला, मित्राला अचानकच भेट द्या किंवा कदाचित सार्वजनिक ठिकाणी जाऊन कॉफी प्या.

अजून काय? घाबरू नका, निर्भय राहा आणि तुमचा पाठलाग/ छुपा पाठलाग करत असलेल्या अनोळखी व्यक्तीकडे डोळे वटारून पहा. काहीवेळा, या चतुर युक्त्या तुमच्यावर हल्ला करणार असलेल्या व्यक्तीला धोक्याची सूचना देतात.

खूपच वाईट परिस्थिती असल्यास, तुम्ही नेहमी पोलिसांशी, सुरक्षा-रक्षकांशी संपर्क साधावा किंवा मदतीसाठी कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधावा.

  1. चाकू हल्ल्यापासून वाचण्यासाठी पळ काढा

चाकू हे एक साधे पण सर्वात जटिल शस्त्र आहे जे तुमचा हल्लेखोर वापरू शकतो. या हल्ल्यातून कसे बाहेर पडायचे हे शिकवणारे लाखो व्हिडिओ. पण सत्य हे आहे की, जेव्हा खरी परिस्थिती येते तेव्हा कोणतेही खोटे ज्ञान किंवा सरावाचा अभाव तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. म्हणून, चाकू हल्ल्यापासून  संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिथून पळून जाणे. होय! तुम्ही बरोबर वाचलेत. जर तुम्हाला धावता येत असेल तर तुम्ही धावले पाहिजे. परंतु तुम्ही तसे करू शकत नसल्यास, हे चाकू हल्ले कसे केले जातात हे आपण समजून घेतले पाहिजे.

  1. चाकू हल्ल्याशी लढण्याचे तंत्र

याआधीचा मुद्दा पुढे चालू ठेवत, जर सुटका करता येणार नसेल किंवा तुम्हाला इतर कोणाचे तरी संरक्षण करावे लागणार असेल, तर त्यासाठी मार्ग आहेत.

  • चाकू हल्ला रोखण्याचा / थांबवण्याचा प्रयत्न करू नका. याचे सर्वाधिक वाईट परिणाम असतात.
  • खोटे खोटे शरण जाण्याचे तंत्र खेळण्याचा प्रयत्न करा . एकदा आपण शरण गेलो आहोत अशी खात्री पटली की, त्या व्यक्तीवर हल्ला करू नका. तिथून फक्त पळ काढा.
  • गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्यास, हानी/ इजा कमी करण्याचा प्रयत्न करा कारण चाकूच्या हल्ल्यातून बाहेर येणे जवळजवळ अशक्य असते.
  1. स्वसंरक्षणासाठी सर्वात प्रभावी मार्शल आर्ट्स

a drawing of two people bowing to each other

या मार्शल आर्ट्समध्ये कोणालाही ठार मारण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी सर्वोत्तम स्वसंरक्षणाच्या हालचाली आहेत ही गोष्ट किती भन्नाट आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बरं, जगभरात याचे विस्तृत पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्ही पारंपारिक काहीतरी नक्कीच करायला हवे. जसे:

  • क्राव मेगा, एक इस्रायली स्वसंरक्षण तंत्र.
  • रोस्तामी सेल्फ डिफेन्स, एक इराणी मार्शल आर्ट्स
  • कुंग फू स्वसंरक्षण
  • रशियन स्वसंरक्षण

एका संशोधनानुसार, या कला केवळ संरक्षणापेक्षा इतर बरेच काही सुद्धा देतात. हे स्वसंरक्षण वर्ग काय करतात तर:

  • महिलांमध्ये लढण्यासाठी आत्मविश्वास वाढवतात
  • काही घातक चाली शिकवतात
  • काही गंभीर मारेकरी हल्ले रोखायला शिकवतात (चाकू आणि बंदुकीच्या गोळ्या)
  • वय, वजन आणि लिंग याची पर्वा न करता प्रत्येकासाठी योग्य.

सर्वोत्तम स्वसंरक्षण प्रशिक्षक शोधा आणि तुमचे वर्ग लवकरात लवकर सुरू करा.

  1. पार्टी दरम्यान सतर्क रहा

तुम्ही स्त्री आहेत म्हणजे तुम्ही पार्टी करणार नाही असे नाही  तसेच, हल्ला होण्याचे ते सर्वात धोकादायक ठिकाण असते. त्यामुळे, तुम्ही असे करू शकता की तुम्ही ज्या लोकांसोबत आलात त्यांच्यासोबत त्या जागेतून बाहेर पडा किंवा तुम्ही निघणार असाल तेव्हा त्यांना कळवा.

दुसरा एक मार्ग आहे: तुमच्या पेयांवर लक्ष ठेवा आणि ती नेहमी स्वतःकडेच ठेवा. शक्य असल्यास, स्वत:च स्वतःचे पेय बनवून आणि ओतून घ्या आणि कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी जे शक्य असेल ते सर्व करा.

  1. संरक्षणासाठी तुमच्या कीचेनचा नाविन्यपूर्ण वापर करा

 कीचेन म्हणजे केवळ एखादी फॅन्सी वस्तू नाही, स्व-संरक्षणासाठी त्याचा खूप उपयोग होतो. तुमच्या कीचेनला तुम्ही काही टोकदार वस्तू जोडू शकता.

आपण किचेनचा नाविन्यपूर्ण वापर कसा करू शकतो याबद्दल काही कल्पना हव्या आहेत? तुम्ही त्याचे वेगवेगळे आकार वापरून पाहू शकता जे इतर व्यक्तीला पकडण्यासाठी आणि इजा करण्यासाठी उपयोगी ठरू शकतील. त्यात सर्वात प्रभावी म्हणजे 'कुबोटन'. कुबोटन स्व-संरक्षण अंगठी तुम्हाला स्वतःजवळ ठेवायला नक्की आवडेल.

  1. अलार्मची शक्ती

बऱ्याच  शिट्ट्या, विशेषत: मोठा आवाज करणाऱ्या, धोक्याची सूचना पसरवण्यासाठी योग्य असतात. हा आवाज तुम्ही खूप मोठ्याने शिट्टी मारून वापरू शकता. Amazon सारख्या कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून ही शिट्टी मिळवणे खूपच सोपे आहे. तर, आजच स्वत:साठी एक विकत घ्या.

धोक्याच्या प्रसंगात नेहमी तुम्हाला शिट्टी वाजवण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही. अशा प्रकारे, काही सुंदर दिसणाऱ्या पण अलार्म वाजवणाऱ्या वस्तू फक्त एका बटणाच्या दाबाने कार्य करतात. ते एक अलार्म वाजवणारे शस्त्र म्हणून ओळखू येणे कठीण असते परंतु ते आपल्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते.

  1. 'पेपर स्प्रे' ला कधीही कमी लेखू नका

a pepper spray keychain

बहुतेक, कार्यालयीन किंवा महाविद्यालयीन स्व-संरक्षण प्रशिक्षणात, लोकांनी तुम्हाला 'पेपर स्प्रे' बद्दल सांगणे आवश्यक आहे. हल्लेखोरावर फवारणी केल्यावर हे आश्चर्यकारकरीत्या कार्य करतात.

तथापि, समस्या अशी आहे की, या पारंपारिक फवारण्या सर्वात प्रभावी असू शकतात, परंतु त्या वाऱ्याच्या दिशेने देखील पसरू शकतात. हे तुमच्यासाठीही हानिकारक ठरू शकते. म्हणून, तुमच्यावर हल्ला करणार्‍या व्यक्तीला मारण्यासाठी खूप शक्तिशाली प्रवाह असलेली एखादी गोष्ट निवडा.

  1. वेदनादायक स्वसंरक्षण साधने

हे जग विचित्र आहे, आणि म्हणून तुम्हाला स्वतःचे संरक्षण करावेच लागेल. संरक्षणाच्या हेतूने वापरून पाहण्यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत. परंतु आक्रमणकर्त्याला वेदना देणारे काहीतरी निवडण्याची खात्री नक्की करा. काही धारदार अंगठीसारखी वस्तू किंवा पेन वापरून पहा जे काच तोडणारे + चाकू म्हणून देखील वापरता येईल.

काही युक्त्यांसाठी, येथे क्लिक करा आणि कोणते पर्याय तुम्ही वापरून पाहू शकता ते पहा.

निष्कर्ष

तुमच्यापैकी बऱ्याच जणी विचार करत असतील की तुम्हाला स्वतंत्र जीवन जगण्यासाठी या सगळ्याची गरज का आहे ? तर असं आहे की, हे जग सहृदय, परिपूर्ण नाही गं माझ्या मैत्रिणी! म्हणूनच, दुसऱ्यावर अवलंबून न राहता, स्वतः लढवय्या राणीसारखी जग आणि स्वतःचं रक्षण कर. 

वरीलपैकी कोणते स्वसंरक्षण तंत्र तुम्हाला सर्वात जास्त आवडले?

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture