साडी एक सौंदर्यखणी !!

9 minute
Read

Highlights 'साडी' फक्त असे म्हटले तरी मनात एक वेगळाच आनंद होतो. साडीचे शॉपिंग हा तर प्रत्येक महिलेचा अत्यंत आवडता विषय आहे. ऑफिस वर्क करणारी असो किंवा गृहिणी साडीबद्दल प्रत्येकीच्या मनात एक वेगळीच जागा असते. साडीचा वारसा विविध प्रकारांनी पुढे जातो आहे.निर्माते, डिझाइनर आणि कलाकार हेदेखील आपल्या परीने साडीला एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे साडीला एक वेगळाच आणि आकर्षक लुक मिळून अधिकाधिक महिलांपर्यंत ती पोहचते आणि याची मागणीही वाढत चाललेली आहे दिसून येते. हँण्डलूम प्रिंटेड साडीचा ट्रेन्ड सध्या वाढलेला आहे. यासंदर्भात तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर चला वाचूया साडी एक सौंर्दयखणी.....!!

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

'साडी' प्रत्येक महिलेच्या मनातला एक हळवा कप्पा असे म्हणायला हवे. साडीमध्ये जर 'हँडलूम साडी' असेल तर मग काय विचारता तिचे सौंदर्य शब्दांच्या पलीकडे आहे असेच म्हणायला हवे. हँडलूम साडी खूप निगुतीने विणल्या जातात. हँडलूम साड्या बनवताना लागणारे कसब, वेळ आणि मेहनत बघता हँडलूम साड्या, पॉवरलूम वर विणलेल्या साड्यांपेक्षा का महाग असतात याचे उत्तर मिळते. तुम्ही जर दक्षिण भारताचा विचार केला तर कर्नाटक, केरळ, आंध्रपदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये, अनेक गावांमधून कॉटनच्या साड्या विणल्या जातात. या राज्यातल्या त्या त्या ठिकाणच्या स्थानिक विणकारांनी या साड्यांमध्ये वैविध्य आणले आहे. त्यानुसार चेट्टीनाड, कोवाई, कसावू, धारवाड, मंगलगिरी, वेंकटगिरी, गुंटूर, सनगुडी अशी असंख्य नावे त्या साड्यांना मिळाली आहेत. गावांच्या नावावरून किंवा डिझाईनच्या प्रकारा-वरून दक्षिणात्य हँडलूम साड्यांना वेगवेगळी नावे जरी पडली असली तरी एकत्रितपणे या साड्यांना ‘साऊथ कॉटन साड्या ’ असेही म्हटले जाते.सध्या 'हँडलूम साडीमध्ये प्रिंटेड' प्रकार ट्रेन्डमध्ये आहे.

इंडिगो हँण्डलूम डाबू प्रिटं साडी

इंडिगो हँण्डलूम डाबू प्रिटं साडी किंवा डाबू कोटा इंडिगो नॅचरल डाय साडी सध्या तुम्हाला विविध कार्यक्रमात अगदी ऑफिसमध्येही पहायला मिळतील. रंग निळा पण प्रिंट पांढरा रंगात असते.अनेक डिझाईन्स यामध्ये उपलब्ध असून तुम्ही ऑनलाईन सुद्धा या साड्यांचे कलेक्शन पाहिले तर नक्की कोणती साडी खरेदी करू हा प्रश्न पडतो. अगदी वाजवी दरात या साडी आपल्याला मिळतात. आता तुम्ही जर डिझायनर हा प्रकार घेतला तर थोडं जास्त खर्च करावा लागतो पण ही साडी नेसल्यावर जो काही लूक येतो तो अतिशय सुंदर असतो.

इंडिगो हँण्डलूम डाबू प्रिटं साडी

हटके प्रिंट प्रकार

पिंक रंगाची आणि फ्लोरर काईट प्रिंट असणारी ही 'सुता ब्रँण्ड'ची साडी पाहा. ही साडी वजनाला अतिशय हलकी आहे. पदारावर पंतगाच्या आकाराचे प्रिंट आणि पूर्ण साडीवर बुट्टीसारखी नक्षी यामुळे साडी फारच उठून दिसते. लाईट रंग आणि पदरावरील प्रिटं हलक्या गडद रंगात अशी रंगसंगती साडीला उठावदार बनवते. सुता ब्रँण्डमध्ये हर सागा, मर्लीन मुनरो कलेक्शन पहायला हरकत नाही. साडीच्या पदरावच प्रिंट असते पण ती प्रिंटच सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. भौमितीक रचना असणारी काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी जी पाहिल्यावर वर्तमानपत्राचा लूक आठवतो. या प्रकारची प्रिंट असणारी साडी नेसण्याचा सध्या ट्रेन्ड आहे.

हटके प्रिंट प्रकार

तांत साडी

हँण्डलूम साड्यांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा कोलकाताचे तांत साडी हमखास आठवते. पारंपरिक तांत साडीवर आकर्षक प्रिंट करून त्यांना अधिक सुंदर केलं जाते. सुंदर रंगसंगती आणि आकर्षक डिझाईन आणि प्रिंटमुळे या साड्या खूप आकर्षक दिसतात. बंगाल हँण्डलूम प्रिंटेड साडी तर ऑल टाईम फेव्हरेट या प्रकारात येते. पारंपरिक प्रिंटपासून फ्युजन प्रकार पदराला खूप आकर्षक करतात. बंगाल हँण्डलूम साडी ऑफिसपासून ते प्रत्येक समारंभात पहायला मिळतात.

तांत साडी

वारली प्रिंट हँण्डलूम साडी

वारली प्रिटं फक्त पदरावर असो वा पूर्ण साडीवर एक रीच लूक आपल्याला देते. गडद रंग आणि पांढऱ्या रंगाचे वारली पेन्टींग साडीला अधिकच आकर्षक बनवतात. वारली प्रिंट असणारी ही साडी पाहा. साडीची किनार आणि पदरावर वारली प्रिंट आपल्याला दिसेल. पूर्ण साडीवर ठराविक अंतराने प्रिंट केलेलं आहे. ग्रीन आणि वाईन रेड या रंगातही ही साडी मिळते. यावर सिल्व्हर कोटेड दागिने घातले की तुम्हाला बघून सुंदर, अप्रतिम हेच शब्द निघतील.

वारली प्रिंट हँण्डलूम साडी

टसर हँण्डब्लॉक प्रिंटेड साडी

टसर सिल्क साडी आपल्या वॉडरोबमध्ये असेलच. यामध्ये हँण्डब्लॉक प्रिंटेड टसर सिल्क साडी एकदा घेवून पाहा. पदरावर असणारी प्रिंट साडीला चार चाँद लावते. लाईट कलरमुळे या साड्या दिसायला सुंदर असतात तसेच कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही नेसू शकता.टसर सिल्कची निळ्या रंगाची ही साडी पाहा. या साडीच्या फक्त पदरावर वर्तुळाकार नक्षी केलेली आहे.लहान ते मोठे असे चार वर्तुळ असून त्यामधील लाईन्समुळे ते साडीला अधिक उठावदार बनवतात.अतिशय सिंपल दिसणारी ही साडी जेव्हा तुम्ही परीधान कराल तेव्हा एक फ्रेश लूक तुम्ही फिल कराल.

हँण्डब्लॉक प्रिंटेड साडी

खणाची साडी

महाराष्ट्रात सध्या हँण्डलूनमध्ये खणाच्या साड्यांची चलती आहे.खणाच्या साडीला नथ डिझाईन प्रमाणेच सरस्वतीची डिझाईनही शोभून दिसते. सरस्वतीचे प्रतिक हे हिंदू संस्कृतीमध्ये शुभ, मांगल्याचे आणि समृद्धीचे समजले जाते. म्हणूनच साडीला पारंपरिक आणि ऐतिहासिक लुक देण्यासाठी आजकाल खण साडीमध्ये सरस्वती पदर तयार करण्याची पद्धत आहे.संपूर्ण साडीवर चंद्रकोर आणि हळदकुंकवाचे चिन्ह यामुळे सणवाराला या साड्यांची जास्त मागणी असते.

खणाची साडी

लिनन हँण्डलूम प्रिंटेड साडी

लिनन हँण्डलूम हा प्रकारसुद्धा सध्या प्रचलित आहे. लीनन हँण्डलूम प्रिंटेड साडी एक क्लासिक लूक देतो. चौकटची प्रिंट असणारी ही लीननची साडी पाहा. नेसायला अतिशय सोपी, वजनाने हलकी आणि दिसायला अतिशय सुंदर. सौ. मयुरी स्वप्नील देशमुख अनेक वर्षांपासून कॉटन प्रिंटेड साडी नेसतात. निळा आणि लाल रंगसंगती असणारी प्रिंटेड साडी मयुरीने परिधान केलेली आहे. मयुरी सांगते, 'कॉटन साडी म्हणजे क्लासिक लूक आणि लक्ष वेधून घेणारी पर्सनॅलिटी असे समिकरण आहे. कॉटनच्या साड्यांमुळे एकप्रकारे खानदानी आणि रॉयल लूक मिळतो. त्यामुळे अशा साड्या आपल्याकडे असाव्या असे प्रत्येकीला वाटते.' मयुरीने हँण्डलूम साड्यांचे खास कलेक्शन केले असून प्रत्येक समारंभाला हँण्डलूम साड्या द बेस्ट असेच तिला वाटते.

लिनन हँण्डलूम प्रिंटेड साडी

केरळची कसावू साडी

हातमागावर विणलेली केरळची कसावू साडी म्हणजे जरीचा काठ आणि जरीचा पदर असलेली ही मोतिया रंगाची किंवा ऑफव्हाईट साडी फक्त केरळमध्येच नाही तर सगळीकडे नेसली जाते. पारंपरिक कसावू साडीत फक्त पदरावर प्रिंट असते पण आता पूर्ण साडीवर चौकट किंवा पान, बुट्टी अशी डिझाईन असते. डिझायनर कसावू साड्यांच्या पदरावर पौराणिक कथांमधल्या संदर्भांपासून ते आधुनिक चित्रकलेतल्या संदर्भांपर्यंतचा कलात्मक वापर केलेला आढळतो. लग्नात किंवा खास कार्यक्रमात, सणवाराला या साड्या आपले सौंर्दय द्विगुणीत करतात.

केरळची कसावू साडी

साडी हे स्त्रीने जगाला दिलेले सर्जनशील स्टाईल स्टेटमेंट आहे. प्रेम किंवा श्रीमंती, प्रतिभा आणि सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. त्यात जर अशा आकर्षक रंगाच्या साड्या असतील तर मग काय विचारता ! साडी कितीही साठवली तरी स्त्रीचे समाधान होऊ शकत नाही. साडीमुळे तिला उत्साही, अप्रतिम, आकर्षक असल्यासारखे वाटते. साड्या जगभरात त्यांच्या भव्यतेसाठी आणि लक्षवेधी रंगांसाठी ओळखल्या जातात. एक साडी स्त्रीला सुंदर आणि स्टायलिश बनवते आणि शैली आणि थाटामाटाच्या प्रत्येक व्याख्येत बसवते. अशा या साडीबद्दल किती लिहू असे होवून जाते पण तुम्हाला साडी बदद्ल काय वाटते खास करून हँण्डलूम प्रिंटेड साडीबदद्ल काय वाटते ते कळवायला विसरू नका.

अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture

कोणत्या 'हँडलूम प्रिंटेड साड्या ट्रेन्डमध्ये आहे?

इंडिगो हँण्डलूम डाबू प्रिटं साडी

हटके प्रिंट प्रकार

तांत साडी

वारली प्रिंट हँण्डलूम साडी

टसर हँण्डब्लॉक प्रिंटेड साडी

खणाची साडी

केरळची कसावू साडी