वजन कमी करण्यासाठी रात्री पाळला जाणारा सर्वोत्कृष्ट दिनक्रम!

12 minute
Read
istockphoto-892766098-170667a.jpg

Highlights
कोरोनाने आपल्या सगळ्यांना घरात बंधिस्त केलं. घरी नुसतेच बसून राहिल्यामुळे वाढलेले वजन कसे कमी करावे हा प्रश्न बऱ्याच मंडळींसमोर उपस्थित झाला. पुढील ब्लॉग मध्ये आपण बघणार आहे की रात्रीचा योग्य दिनक्रम पाळून आपण आपले वजन कसे कमी करू शकतो.

कोरोनाने आपल्या सगळ्यांना घरात बंधिस्त केलं. आधीच लॅपटॉप आणि स्मार्टफोन सारख्या तंत्रज्ञानाने आपल्याला खुर्चीत खिळवून ठेवलं होतं त्यात पुन्हा हा कोरोना! या सगळ्यांमुळे माणसाला बऱ्याच शारीरिक त्रासांना सामोरी जावे लागले. घरी नुसतेच बसून राहिल्यामुळे वाढलेले वजन कसे कमी करावे हा प्रश्न बऱ्याच मंडळींसमोर उपस्थित झाला. वैज्ञानिक संशोधनातून असे समोर आले आहे की वजन वाढण्याचे सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे रात्रीचा अव्यवस्थित दिनक्रम. पुढील ब्लॉग मध्ये आपण बघणार आहे की रात्रीचा योग्य दिनक्रम पाळून आपण आपले वजन कसे कमी करू शकतो.

Young healthy girl on home scales Young healthy girl on home scales weight loss stock pictures, royalty-free photos & images

Source: istock

ह्या ब्लॉग मधील दिनक्रम अंगिकारण्या आधी, तुम्हाला कुठलाही आजार असल्यास, काही त्रास असल्यास आधी आपल्या डॉक्टरचा सल्ला आठवणीने घ्यावा. त्या शिवाय या दिनक्रमाचे अनुकरण करू नये. चला तर मग! आता बघूया की रात्रीचा योग्य दिनक्रम पाळून काही महिन्यातच आपण आपले वजन कसे कमी करू शकतो!


  • अन्न तारी! अन्न मारी! अन्न विकारी!

Source: pixabay

आपल्या मराठीत एक म्हण आहे. "अन्न तारी", म्हणजे अन्न आपला तारणहार आहे. न जेवता आपण जास्ती काळ जिवंत राहू शकत नाही. "अन्न मारी" म्हणजे अन्नामुळेच आपले प्राण सुद्धा जाऊ शकतात. विषारी अन्न ग्रहण केल्यामुळे, जे अन्न खाण्यायोग्य नाही असे पदार्थ ग्रहण केल्यामुळे आपण आपला जीव सुद्धा गमावू शकतो. तसेच "अन्न विकारी" अयोग्य अन्न ग्रहण केल्यामुळे किंवा गरजे पेक्षा जास्ती ग्रहण केल्यामुळे शरीरात विकार सुद्धा निर्माण होतात जे शरीराला अपायकारक ठरतात. 

त्यामुळे अन्न ग्रहण करतांना, ते खाण्यायोग्य आहे की नाही हे बघायला हवे. जर ते खाण्यायोग्य आहे तर ते किती प्रमाणात खावे हे सुद्धा तितकेच महत्वाचे. पण या पेक्षा अधिक महत्वाचे आहे, ते अन्न ग्रहण करण्याची वेळ. सकाळी तुमचं किती वाजता जेवण होतं याचा जरी काही फारसा फरक पडत नसला तरी रात्री किती वाजता जेवण होतं यामुळे तुमच्या वजनावर बराच परिणाम होतो. झोपायच्या किमान ३-४ तास आधी आपलं जेवण होऊन जायला हवं. कधी पण जेवण झाल्या बरोबर झोपू नये.

जेवण होताच झोपल्याने अन्न पचनेची प्रक्रिया पूर्ण होत नाही ज्यामुळे न पचलेलं अन्न पोटाचा मेद वाढवण्यास मदतगार ठरतं आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं. त्यामुळे जेवण झाल्याबरोबर कधीच झोपू नये आणि झोपण्याच्या किमान ३-४ तास आधी आपलं जेवण होऊन जावं याची खात्री असू द्यायची. त्याच सोबत, आपण सकाळी जेवढं जेवतो त्या प्रमाणात रात्री थोडं कमी जेवायचं. हे सुद्धा वजन कमी करण्यात मदतगार ठरतं.

 

  • रात्री काय खावं?

Source: pixabay

ज्या प्रकारे रात्री किती खावं हे आवश्यक आहे त्याच प्रकारे रात्री काय खावं हे सुद्धा तितकच महत्वाचं आणि गरजेचं आहे. सकाळच्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस आपली पचन शक्ती कमी असते. त्यामुळे रात्री काय खावं  यापेक्षा काय खाऊ नये, याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. साधारणतः रात्रीच्या वेळेस भात, बटाटे, आणि पचायला जड असलेल्या गोष्टी कमी प्रमाणात खाव्या. 

बरीच मंडळी एक चूक करते, रात्री भात कमी खायला सांगितलं की ते लोक पूर्णपणेच भात खाणं सोडून देतात. आपण असं करू नये. आपल्या शरीराला सगळ्या प्रकारच्या पदार्थांची गरज असते. त्यामुळे भात, जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तो, रात्रीच्या वेळेस अगदी कमी प्रमाणात खावा. सकाळी खाल्यास काही हरकत नाही पण प्रयत्न असू द्यायचा की रात्री शक्य तेवढं साधं आणि पचायला हलकं असं अन्न ग्रहण करायचं.  • अंघोळ: एक रामबाण उपाय

Source: pixabay

रात्री झोपण्याआधी प्रत्येकाने हमखास अंघोळ करावी. दिवसभर काम करून आपण थकून घरी येतो म्हणजे बाहेरची धूळ, माती, कचरा, विषाणू आणि आताच्या काळात कोरोना, हे आपल्या अंगावर असण्याची शक्यता टाळता नाही येत. त्यामुळे आपल्या बिछान्यावर जाण्याआधी अंघोळ झालीच पाहिजे. कारण फक्त स्वच्छते व्यतिरिक्त सुद्धा शारीरिक आणि मानिसक आरोग्यासाठी सुद्धा अंघोळ भरपूर फायदेशीर ठरते.

वजन कमी करण्यासाठी माणसाची योग्य झोप होणं प्रचंड महत्वाचं आहे.  वैज्ञानिक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की वजन कमी होण्यासाठी तुमची योग्य झोप होणं गरजेची आहे. योग्य झोप म्हणजे, ९-१० तास घेतलेली झोप ही योग्य झोप नाही. कधी कधी आपण ८-९ तास झोपून उठल्यावर सुद्धा आपल्याला आळस येतो, उठण्याची इच्छा होत नाही. पण कधी कधी, अगदी ४-५ तासाची झोप देखील पुरेशी ठरते. उठल्यानंतर अगदी ताजे वाटते.

योग्य झोप होण्याकरिता अंघोळ प्रमुख भूमिका निभावते. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की अंघोळ केल्यावर झोप कशी येईल? उलट अंघोळ केल्यावर येत असलेली झोप सुद्धा उडून जाईल. अर्थात काही प्रमाणात हे खरं आहे, पण अर्ध्या तासाहून अधिक फरक पडणार नाही. म्हणजे तुम्ही जर १० वाजता झोपण्याचा बेत केला असेल तर अंघोळ केल्यामुळे १० वाजताची वेळ १०:३० वाजे पर्यंत वाढेल. पण त्यानंतर तुमहाला खात्रीशीर झोप येईल आणि योग्य झोप येईल.   • ध्यान: सर्वात विलक्षण गोष्ट

Source: pixabay

योगसाधना हा शब्द ऐकयला जितका भारदस्त वाटतो तितकाच याचा शारीरिक आणि मासिकरीत्या फायदा सुद्धा आहे. झोपण्याच्या आधी आपल्या बिछान्यावर किमान ५-१० मिनिटं तरी ध्यान करावं. ध्यान करणं म्हणजे फक्त डोळे बंद करून बसून राहणं, असं अजिबात नाही. 

या व्यतिरिक्त फक्त शारीरिक दृष्ट्या शांत न बसता मानिसक दृष्ट्या सुद्धा आपण अगदी स्थिर असावं. काही मिनिटांसाठी का होईना, काही क्षणांसाठी का होईना पण आपलं शरीर, आपलं मन, आपले विचार आणि आपली बुद्धी सगळे स्थिरावले पाहिजे आणि आपण पूर्णपणे शांततेचा अनुभव घेतला पाहिजे त्याला म्हणतात ध्यान.

बऱ्याच लोकांना हा गैरसमज आहे की ध्यान म्हंटलं म्हणजे डोळे बंद करायचे आणि मोठ्याने ओंकारला सुरुवात करायची. पण असं मुळीच नाही आहे. नामसंकीर्तन हा वेगळा मुद्दा झाला. दिवसभर काम करून थकल्या नंतर झोपण्याआधी आपल्याला ५ मिनिटाची शांतता गरजेजची असते. जेणेकरून आपल्याला अगदी शांत झोप लागेल. आणि म्हणूनच आपले वजन कमी करण्यास आपल्याला ध्यान मदतीचे ठरेल.

 

  • झोपण्यासाठी पण प्रकाश आवश्यक

Source: istock

रात्री झोपतांना  कटाक्षाने एक गोष्ट पाळली गेली पाहिजे, ती म्हणजे कधी पण पूर्णपणे अंधार करून झोपू नये. ज्या खोलीत आपण झोपतो आहे, तिथे एक तरी असा लाईट लावावा ज्याने त्या खोलीत मंद प्रकाश असेल. संपूर्ण पणे अंधार असल्यावर कोणालाच शांत झोप लागू शकत नाही.

त्यामुळे खोली अगदी झगमगून उठेल इतका जरी प्रकाश नसला तरी एक थोडा मंद प्रकाश तरी खोलीत असलाच पाहिजे. शांत झोप लागावी, जेणे करून वजन कमी होण्यात याचा फायदा होईल, या करीत खोलीत मंद प्रकाश सुद्धा महत्वाचा ठरतो. 

 

  • मद्यपान टाळा!

Source: istock

प्रत्येक सिनेमा जो आपण बघतो त्यात लिहून येतं, "कृपया मद्यपान ना करे." तीच गोष्ट इथे सुद्धा लागू होते. कारण त्यामध्ये Empty Calories असतात जे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेच्या गतीला कमी करू शकतात किंबहुना वेळ पडल्यास ती थांबवू सुद्धा शकतात. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर रात्रीच काय कधी पण मद्यपान करू नका.

 

  • खोली आणि डोकं दोन्ही थंड ठेवा!

Source: istock

आपण ज्या खोलीत झोपणार आहे, त्या खोलीचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा आणि शक्य असल्यास बाहेरच्या तापमानापेक्षा कमी असावे. खोलीचे तापमान कमी असल्या कारणाने आपल्याला शरीराचं तापमान राखण्यासाठी शरीर स्वतःला गरम ठेवतं ज्यामुळे "Fat Burning" ह्या प्रक्रियेला चालना मिळते. आणि यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळते.

अपवादात्मक परिस्थितींना सोडून, उदाहरणार्थ जर आपल्याला थंड हवेचा किंवा थंड वातावरणाचा त्रास होत असेल, जर एसी किंवा कूलर मुळे आपल्याला त्रास होत असेल तर अश्या वेळेस एकदा आपल्याला डॉक्टरचा सल्ला नक्की घ्यावा जेणेकरून एसी व कुलर मुळे आपल्याला पुढे काही त्रास होणार नाही याची आपल्यालाच खात्री पटेल.  • Apple cider vinegar - रात्री पिण्यासाठी सर्वोत्तम 

Source: istock

रात्री झोपायच्या अगोदर "Apple cider vinegar" प्यायला विसरू नका! रोज रात्री झोपायच्या एक अर्धा पाऊण तास आधी २ चमचे Apple cider vinegar घ्यायचं. वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींसोबत हे सुद्धा तुमचं वजन कमी करण्यात मदतगार ठरेल. 

किंबहुना फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर याने तुमचे केस देखील मुलायम आणि मजबूत होतील. अगदी सोप्या शब्दात सांगायचं  झालं म्हणजे, 'एक तीर में दो निशाने.' त्यामुळे वजन कमी करण्याचा Apple cider vinegar सुद्धा एक रामबाण उपाय आहे.

वजन कमी करण्या मध्ये पण गणित आहे आणि इथे सुद्धा "Tit for Tat" हा नियम लागू होतो. जितक्या इमानदारीने तुम्ही हा दिनक्रम पाळाल तितक्या लवकर तुमचं वजन कमी होईल. पण तुम्ही जर हा दिनक्रम पाळण्यामध्ये तडजोड केली तर मग तुम्हाला वजन कमी करायला वेळ पण अधिक लागेल, किंबहुना ते कमी होणार पण नाही. त्यामुळे संपूर्ण निष्ठेने आणि इमानदारीने हा दिनक्रम पाळा तुमचं वजन नक्की कमी होईल. 

या सगळ्या सोबतच व्यायाम  सुद्धा आवश्यक आहे. आता रात्रीच्या दिनक्रमात तो नाही याचा अर्थ तो करू नये असं मुळीच नाही. सकाळी उठून किंवा संध्याकाळी किमान १ तास व्यायाम हा झालाच पाहिजे. त्याने परिणाम लवकर समोर येतील. 

सध्या आपण खूप विकट परिस्थितीशी सामना करतो आहे. आणि अश्या परिस्थितीत आपण स्वतः आणि आपला परिवार हा स्वस्थ राहिला पाहिजे ही जबाबदारी आपली आहे. त्यामुळे हा दिनक्रम तुमचं वजन कमी करण्यात आणि तुमच्या परिवाराला स्वस्थ ठेवण्यात साहाय्य करेल ही आशा!
image-description
report Report this post