यादृच्छिक खरेदीसाठी महाराष्ट्रातील काही सर्वोत्तम स्ट्रीट मार्केट!

11 minute
Read

Highlights

या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध आणि नावाजलेले स्ट्रीट मार्केट जिथे तुम्ही करू शकता तुम्हाला हवी त्या गोष्टीची खरीदी!



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

मुंबई

  • कुलाबा मार्केट

Source: youthincmag

कुलाबा कॉजवे मार्केटचा दैनंदिन आनंदोत्सव हा मुंबईतील इतर कोणताच खरेदीच्या अनुभवापेक्षा कमी नाही. खासकरून पर्यटकांच्या दृष्टीने, "सब कुछ मिलेगा" (सर्व काही मिळेल) ही प्रसिद्ध भारतीय म्हण या बाजारपेठेस नक्कीच लागू होते. तुम्ही फुटपाथवरून फिरत असताना आणि स्टॉल्स बघत असतांना सतत, तुम्हाला फुगे आणि नकाशा विक्रेत्यांना चकमा द्यावा लागतो. तुम्हाला तुमचे नाव तांदळाच्या दाण्यावर लिहायचे आहे का? इथे तेही शक्य आहे. सतत खरेदी करून करून, किंवा चालून जर तुम्ही थकला असाल आणि तुम्हाला विश्रांती हवी असल्यास, लिओपोल्ड कॅफे किंवा कॅफे मोंडेगर, मुंबईतील दोन प्रसिद्ध हँगआउट्समध्ये देखील तुम्ही  जाऊ शकता, जे कुलाबा मार्केट पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत.

स्थान: कुलाबा कॉजवे, दक्षिण मुंबई.

वेळ: दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत.

 

  • झवेरी बाजार

Source: google

 

झवेरी बाजार, मुंबईची प्रसिद्ध आणि त्याच बरोबरीने भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ आहे. देशाच्या निम्म्याहून अधिक सोन्याच्या व्यापारात त्याचा वाटा आहे. झवेरी बाजारपेठेत सोन्या नाण्याचे हजारो दुकाने आहेत, त्यापैकी काही दुकाने तर शतके जुनी आहेत. बर्‍याच इमारती जीर्ण आणि जुनाट दिसत असल्या तरी पण त्या संपत्तीने भरलेल्या आहेत. परंतु तेथे जाण्यापूर्वी एक गोष्ट मात्र आवर्जून केली पाहिजे आणि ती म्हणजे भारतात सोने आणि रत्न कसे खरेदी करायचे या बद्लची माहिती वाचणे. कारण, याशिवाय जर तुम्ही सरळ तिथे खरेदी करायला जाल तर काही दुकाने बनावट वस्तू देखील विकतात याचीही जाणीव असू द्या.

स्थान: क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबादेवी मंदिरादरम्यान. क्रॉफर्ड मार्केटपासून शेख मेमन रस्त्यावरून जामा मशिदीकडे जा.

वेळ: रविवार वगळता दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत.

 

  • फॅशन स्ट्रीट

Source: google

 

मुंबईतील फॅशन स्ट्रीट म्हणजे काय? असा जर प्रश्न कोणी विचारला, तर त्याचं सरळ, साधं आणि सोपं उत्तर म्हणजे, लेटेस्ट ट्रेंड, विविध प्रकारचे कपडे आणि स्ट्रीट फूडचा स्वादिष्ट सुगंध या त्रिगुणांचा संगम म्हणजे फॅशन स्ट्रीट. मुंबईतील लोकांसाठी, विशेषत: विद्यार्थ्यांसाठी फॅशन स्ट्रीट हे एक आवडते शॉपिंग हब आहे. हे ठिकाण काही ट्रेंडी आणि अत्याधुनिक फॅशनचे कपडे प्रदान करतात. इथे सुमारे 150 दुकानांचे मांदियाळी तुम्हाला दिसेल जिथे विविध प्रकारच्या वस्तूंची आणि कपड्यांची विक्री केली वाजते.

स्थान: CST (छत्रपती शिवाजी टर्मिनस) जवळ, फॅशन स्ट्रीट स्थित आहे

उघडण्याचे तास: सकाळी 11:00 ते रात्री 8:00 पर्यंत

 

पुणे

  • तुळशीबाग मार्केट

Source: google

तुळशीबाग हे पुण्याच्या मध्यभागी आहे आणि रस्त्यावरील खरेदीचे आश्रयस्थान आहे. रेडीमेड कपड्यांसाठी सुप्रसिद्ध असलेले तुळशीबाग, केवळ पूण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ख्याती मिळवलेले आहे. तुम्हाला तुमच्या सानुकूलित फिटिंगसाठी इथे दुकानांच्या रांगा उपलब्ध आहेत. दिल्लीच्या चांदणी चौकाच्या बरोबरीने पुण्यातील खरेदीसाठी हे सर्वात जुने बाजार आहे. खरेदीचे वातावरण अलका टॉकीज चौकापासून सुरू होते आणि कॅन्टोन्मेंट परिसराजवळ संपते. जीन्स असो, ब्लाउज असो, शर्ट असो किंवा इतर कुठल्याही इतर गरजेच्या वस्तू असो, या सर्व गोष्टी तुळशीबागेत उपलब्ध आहेत.

स्थान: 93, लक्ष्मी रोड, तुळशीबाग, बुधवार पेठ

वेळ: सकाळी 09:00 ते रात्री 11:00

 

  • एफ.सी. रोड मार्केट

Source: google

 

एफ.सी. रोड वर अर्थातच फर्ग्युसन कॉलेज असल्यामुळे, कॉलेजच्या मुलांची देखील तिथे चंगळ असते. एकंदरीतच एफ.सी. रोड हे गर्दीचे ठिकाण आहे आणि कदाचितच पुण्यातील अजून कुठे असेल, असे खरेदीसाठी असलेले हे सर्वात चैतन्यशील मार्केटपैकी एक आहे. येथे असलेले कानातले आणि पिशव्या अगदी तुमचे डोळे हुरळून नेतील! तसेच, येथे उपलब्ध असलेल्या असंख्य फोन केसेससह (बॅककव्हर) तुम्ही तुमचे कपडे देखील मॅचिंग विकत घेऊ शकता. शहराच्या मध्यभागी असलेल्या, या मार्केटमध्ये ट्रेंडी फुटवेअरपासून ते आकर्षक कपड्यांपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे जे तुम्हाला नक्कीच मोहित करतील. मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास तुम्हाला इथे चांगली सूट सुद्धा मिळेल.

ठिकाण: फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे

वेळ: सकाळी 10:00 ते रात्री 10:00

 

नागपूर

  • सीताबर्डी मार्केट

Source: google

 

प्रत्येक नागपुरातील खरीदाराच्या मनात प्रथम स्थान निर्माण करणारे, नागपुरातील सगळ्यात जुने शॉपिंग मार्केट म्हणजे सीताबर्डी. अगदी फॅशन आणि ट्रेंडपासून तर सूट, साड्या आणि चप्पल जोडे देखील तुम्हाला इथे मिळतील. इथली सगळ्यात निराळी बाब म्हणजे इथल्या गजबजलेल्या गल्ल्या मोदी नंबर ने ओळखल्या जातात. (उदाहरणार्थ मोदी नंबर १, मोदी नंबर २, इत्यादी). कमीत कमी नाही तर या उलट रविवारचे खुले बाजार हे प्रत्येकाच्या साप्ताहिक आवडीचे आहेत! या सोबतच सीताबर्डी मार्केटच्या मागच्या बाजूला एक मोठे इलेक्ट्रॉनिक मार्केट देखील आहे जे शहरातील गॅझेट प्रेमींचे आवडते ठिकाण आहे.

स्थान: व्हरायटी स्क्वेअर आणि लोखंडी ब्रिज दरम्यान, कॉटन स्क्वेअर

वेळ: दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत.

 

  • महाल आणि इतवारी - पारंपारिक दुकानदारांचे मार्केट

Source: gstatic

 

सणासुदीच्या खरेदीत भिजण्यासाठी महाल-इतवारी व्यतिरिक्त आणखी चांगली जागा कोणती असू शकते? या मार्केटचे वैशिष्ट्य म्हणजे या मार्केटने अजूनही खरेदीचे जुने जागतिक आकर्षण कायम ठेवले आहे. महालच्या गल्लीबोळातील साडी आणि कपड्यांचे शोरूम, इतवारीतील अगदी निमुळत्या गल्ल्यांमधील असलेली विविध दुकाने, जे सराफा बाजार शहरातील दागिन्यांची दुकाने आणि शोरूमचे सर्वात मोठे क्लस्टर आहे. आणि त्याच सोबत स्थित 'किराणा ओळ' हे किराणामाल, सुका मेवा आणि अगरबत्तीचे केंद्र आहे.

स्थळ: महाल आणि इतवारी (हे नागपुरातील दोन भिन्न क्षेत्रे आहेत परंतु एकमेकांच्या अगदी जवळ आहेत.)

वेळ: दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत.

 

नाशिक

  • सराफ बाजार

Source: google

 

नाशिक येथे स्थित सराफ बाजार हे वर्षभर पर्यटक आणि स्थानिकांनी खचाखच भरलेले असते आणि हे नाशिकमधील खरेदीसाठी सर्वात व्यस्त बाजारपेठांपैकी एक आहे. सराफ बाजारचे वर्णन करतांना नाशिकची मंडळी नेहेमी म्हणते, की तुम्हाला तिथे दिसणार्‍या सर्व चकाकी आणि सोन्यापासून तुमचे डोळे झाकून घ्यावे लागतील, इतकी प्रकाशमय आणि तेजोमय ते मार्केट लखाकत असतं. हे शहर सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि सराफ बाजार हे सोने खरेदीसाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. बझारमध्ये दागिन्यांची इतकी दुकाने आहेत की तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू मिळवण्यात कोणतीही अडचण कधीच येणार नाही. नेकलेसपासून रिंग्जपर्यंत, तुम्हाला हवं ते आणि ते सुद्धा अगदी परवडणाऱ्या दरात. केवळ सोन्याच्या किंवा दागिनंच्या दुकाना ऐवजी तुम्ही येथे प्रसिद्ध चिवडा, द्राक्षे देखील खरेदी करू शकता आणि त्यांच्या गोड आणि आंबट चवीचा आनंद मनभरून लुटू शकता.

ठिकाण: पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र, ४२२००१

वेळ: दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत.

 

  • तिबेटी बाजार

Source: connectingtraveller

सराफ बाजाराप्रमाणेच, तिबेटी मार्केट देखील तुमच्यासाठी एक सोन्याची खाणच आहे. कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या तिबेटी मार्केटमध्ये तुम्हाला निवडण्यासाठी अनेक ट्रेंडी कपडे उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर रस्त्यावर मसालेदार शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे मिश्रण देणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा आहेत ज्याकडे तुमची नजर जाताच तुम्हाला स्वतःला आवरता येणं कठीण होईल. या मार्केटची सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे, तिथे असलेल्या वस्तूंची किंमत इतकी वाजवी आहे की नेमकं काय धरावं आणि काय सोडावं हे तुम्ही ठरवू शकणार नाही. हिवाळ्यातील कपड्यांसाठीही हा बाजार प्रसिद्ध आहे.

ठिकाण: तिबेटियन वेल्फेअर असोसिएशन मार्केट आनंदवन कॉलनी, सहजीवन कॉलनी, नाशिक, महाराष्ट्र, ४२२००५

वेळ: दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत.




Logged in user's profile picture