तुम्हाला माहीत असायलाच हवेत सर्दीवरील हे सामान्य उपचार!

9 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this blog in English here)

सर्दीवरील उपचार जरी जवळजवळ सर्दीसारखेच व्यापक असले तरी ते प्रभावी आहेत का? सर्दी हस्तक्षेप करून बरी करता येत नाही. पण असे काही उपचार आहेत जे तुमची लक्षणे कमी करण्यात मदत करू शकतात आणि तुम्हाला इतके भयानक वाटण्यापासून थांबवू शकतात. येथे सामान्य सर्दीसाठी विविध उपचार आणि आपल्याला त्यांच्याबद्दल काय माहीत आहे ते दिले आहे.

सामान्य सर्दीवरील उपचार

common cold

जर तुम्हाला सर्दी झाली तर तुम्ही एक ते दोन आठवडे आजारी राहाल असा अंदाज सहज लावू शकता. पण निराश होण्याची गरज नाही. तुम्ही हे उपचार आजमावून पाहिल्यास तुम्हाला बरे वाटू शकते:

  • हायड्रेटेड राहा. निर्जलीकरण टाळले पाहिजे आणि पाणी, रस, 'क्लिअर ब्रॉथ' किंवा मधासह कोमट लिंबूपाण्याच्या मदतीने चोंदलेपण मोकळे केले जाऊ शकते. अल्कोहोल, कॉफी आणि कॅफिन-युक्त सोडा पिणे टाळा कारण ते डिहायड्रेशन वाढवू शकतात.
  • आराम करा. बरे होण्यासाठी तुमच्या शरीराला झोपेची आवश्यकता असते.
  • दुखरा घसा बरा करा. अर्धा कोमट ग्लास पाण्यात 1/4 ते 1/2 चमचे मीठ टाकून, खाजणारा किंवा दुखणारा घसा तात्पुरता बरा करण्यासाठी गुळण्या करता येतात. सहा वर्षांखालील मुले प्रभावीपणे गुळण्या करू शकतील असे नाही. आइस चिप्स, थ्रोट स्प्रे, लोझेंजेस किंवा हार्ड कँडीज वापरून पहा. हार्ड कँडीज किंवा लोझेंज मुलांच्या घशात अडकू शकतात म्हणून त्यांना त्या खायला देताना काळजी घ्या. सहा वर्षांखालील मुलांना कडक मिठाई किंवा लोझेंज देऊ नका.
  • चोंदलेले नाक मोकळे करा. सलाईन नेझल ड्रॉप आणि ओव्हर-द-काउंटर स्प्रेमुळे चोंदलेपणा आणि बंदीस्तपणा कमी होण्यास मदत होते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, बल्ब सिरिंज वापरून हळुवारपणे 'सक्शन' करण्यापूर्वी लहान बाळांच्या एका नाकपुडीत अनेक सलाईन ड्रॉप टाकले पाहिजेत. हे करण्यासाठी, बल्ब पिळून घ्या, नाकपुडीमध्ये साधारणपणे 6 ते 12 मिलीमीटर (सुमारे 1/4 ते 1/2 इंच) सिरिंजची टीप हळूवारपणे ठेवा आणि नंतर हळूहळू बल्ब सोडा. मोठी मुले सलाईन नेझल स्प्रे वापरू शकतात.
  • nasal drops and sprays
  • वेदना कमी करा: सहा महिन्यांपेक्षा कमी बाळांना आणि लहान मुलांना फक्त अॅसिटामिनोफेन द्या. 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना अॅसिटामिनोफेन किंवा आयबुप्रोफेन द्या. तुमच्या मुलाचे वय आणि वजन याना अनुसरून योग्य डोससाठी, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • अॅसिटामिनोफेन (टायलेनॉल इतर औषधांप्रमाणेच), आयबुप्रोफेन (अ‍ॅडव्हिल, मोट्रिन आयबी इतर औषधांप्रमाणेच), किंवा अॅस्पिरिन प्रौढ व्यक्ती घेऊ शकतात.
  • मुलांना किंवा किशोरवयीन मुलांना अॅस्पिरिन देताना सावधगिरी बाळगा. अॅस्पिरिन तीन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी वापरण्यास सुरक्षित असली तरी ती ‘चिकनपॉक्स’ किंवा ‘फ्लू’ची लक्षणे अनुभवत असलेल्या मुलांना किंवा किशोरांना कधीही देऊ नये. कारण ते ‘रेय सिंड्रोम’ या, ह्या वयाच्या मुलांमधील एका असामान्य परंतु संभाव्य प्राणघातक आजाराशी जोडलेले आहे.
  • गरम पेय प्या. चिकन सूप, चहा किंवा सफरचंदाचा कोमट रस यासारख्या उबदार द्रवपदार्थांचे सेवन केल्याने दिलासा मिळू शकतो आणि श्लेष्माची हालचाल वाढून दाटलेपणा कमी होऊ शकतो. हा सर्दीवरील एक सामान्य उपचार आहे.
  • मधाचा वापर करून बघा. प्रौढ आणि एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना खोकला झाल्यास  मधाच्या सेवनाने आराम पडू  शकतो. गरम चहात मध टाकून पिऊन पहा.
  • हवेतील आर्द्रता वाढवा. कूल-मिस्ट व्हेपरायझर किंवा ह्युमिडिफायरने तुमच्या घरात आर्द्रता आणल्याने चोंदलेपणापासून आराम मिळू शकतो. त्यातले पाणी दररोज बदला आणि उत्पादक कंपनीच्या निर्देशानुसार उपकरण स्वच्छ करा.
  • cold among kids
  • सर्दी आणि खोकला यावर 'ओव्हर-द-काउंटर' (OTC) उपाय वापरण्याचा विचार करा. ओटीसी डिकंजेस्टंट्स, अँटीहिस्टामाइन्स आणि वेदनाशामक औषधे प्रौढ आणि 5 आणि त्याहून अधिक वर्षे वयाच्या मुलांसाठी काही लक्षणे कमी करू शकतात. त्यांचे काही प्रतिकूल परिणाम आहेत, आणि ती सर्दी थांबवणार किंवा तिचा कालावधी कमी करणार नाहीत. तज्ञ याच्याशी सहमत आहेत की लहान मुलांना ही औषधे देऊ नये. जर तुम्ही त्यांचा गैरवापर करत असाल किंवा त्यांचा अति प्रमाणात वापर केला तर ही औषधे तुम्हाला गंभीरपणे हानी पोहोचवू शकतात. आपल्या मुलाला कोणतीही औषधे देण्यापूर्वी, त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • फक्त लिहून दिल्याप्रमाणेच औषधे घ्या. तुम्ही कोणत्याही प्रिस्क्रिप्शनपेक्षा जास्त प्रमाणात औषध घेत नसल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या सर्दीच्या औषधांची लेबले वाचा. सर्दीच्या काही उपायांमध्ये विविध घटक असतात, जसे की 'डिकंजेस्टंट' आणि वेदना कमी करणारे 'पेन रिलिव्हर'.

सर्दीवरील उपचार, जे कुचकामी असू शकतात

 Antibiotics

  • सर्दीवर असंख्य निरुपयोगी उपचार आहेत. प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) अधिक लोकप्रिय आहेत पण ती काम करत नाहीत. ती जीवाणूना लक्ष्य करतात, परंतु ती सर्दीच्या विषाणूंपासून क्वचितच संरक्षण देतात. तुमच्याकडे असलेली कालबाह्य औषधे वापरू नका किंवा तुमच्या डॉक्टरांकडे सर्दीसाठी अँटीबायोटिक्स मागू नका. तुम्हाला त्यामुळे भरभर बरे वाटणार नाही आणि अँटिबायोटिक्स अयोग्यरीत्या वापरल्याने अँटीबायोटिक-प्रतिरोधक जंतूंच्या धोकादायक आणि विस्तारित समस्येस हातभार लागतो.
  • तरुण जे सर्दी आणि फ्लूची ओव्हर-द-काउंटर औषधे घेतात. जी मुले सर्दी आणि खोकल्याची ओव्हर-द-काउंटर औषधे घेतात त्यांना आपत्तीजनक, अगदी जीवघेणेसुद्धा, प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका असतो. आपल्या मुलाला कोणतीही औषधे देण्यापूर्वी, त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सर्दीवरील उपचारांवर विरोधाभासी संशोधन

 common cold cures

संशोधन वाढत असूनही, व्हिटॅमिन सी आणि इचिनेसिया यासारख्या काही सामान्य सर्दीच्या उपचारांबाबत अजूनही शास्त्रज्ञांमध्ये विवाद आहेत. येथे अनेक लोकप्रिय पूरक उपचारांवरील अपडेट दिला आहे:

  • 'क' जीवनसत्व. असे दिसते की सर्दी टाळण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' ('क' जीवनसत्व) घेतल्याने सामान्य व्यक्तीला तसा फारसा फायदा होणार नाही. पण, काही संशोधन असे सूचित करते की सर्दीची लक्षणे सुरू होण्यापूर्वी व्हिटॅमिन ‘सी’ चे सेवन केल्याने तुमच्या लक्षणांचा कालावधी कमी होऊ शकतो. ज्या लोकांना वारंवार सर्दीचा सामना करावा लागतो त्यांना व्हिटॅमिन ‘सी’ चा फायदा होऊ शकतो, जसे की हिवाळ्यात सामूहिक बालसंगोपन वर्गांना जाणारी मुले.
  • जस्त (झिंक). अनेक संशोधनानुसार, झिंक सप्लिमेंट्स घेतल्याने सर्दीचा कालावधी कमी केला जाऊ शकतो. पण, जस्त आणि सर्दीवरील संशोधनात परस्परविरोधी निष्कर्ष दिसून आले आहेत. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की झिंक लोझेंज किंवा सिरप सर्दीचा कालावधी सुमारे एक दिवसाने कमी करतात, विशेषत: सर्दीची पहिली चिन्हे आणि लक्षणे दिसल्यापासून 24 ते 48 तासांच्या आत घेतल्यास.

झिंकचे संभाव्य हानिकारक दुष्परिणाम देखील आहेत. सर्दी टाळण्यासाठी किंवा तिचा कालावधी कमी करण्यासाठी झिंकचा वापर करण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी बोला.

 

स्वत: ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Self-care is important.

सामान्यतः खूप गंभीर नसली तरी, सर्दी त्रासदायक ठरू शकते. सगळ्यात नवीन उपचार करून पाहण्याचा मोह झाला तरी तुम्ही स्वतःची काळजी घेणे ही सर्वात चांगली गोष्ट. विश्रांती घ्या, हायड्रेटेड राहा आणि तुमच्या सभोवतालच्या हवेत आर्द्रता राखा. आपले हात वारंवार धुण्याचे लक्षात ठेवा.

डिस्क्लेमर: कोणतेही औषध घेण्यापूर्वी नेहमी आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture