खास पाककृती 'होळी'साठी !

6 minute
Read

Highlights होळी म्हटलं की महाराष्ट्रात घराघरातून पुरळपोळी आणि कटाची आमटीचा बेत असतो पण यंदाच्या होळीला आपण थोडा हटके बेत करणार आहोत. जे खाद्यपदार्थ तुम्हाला सांगणार आहोत ते खान्देशात विशेष करुन होळीनिमित्त तयार होतात. चवीला मस्त, खमंग शिवाय पौष्टीक. तेव्हा यंदाच्या होळीला फुणके, चिंचेचे पन्हे आणि येळवणीची आमटी नक्की तयार करा. आता हे सगळे पदार्थ कसे तयार करायचे असा प्रश्न पडला असेल चला तर मग वाचूया संपूर्ण रेसिपी.....

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

होळी हा सण देशभरात रंगाचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात होळीला 'धुळवड' किंवा 'शिमगा' असे म्हणतात. चोहोबाजूंनी रंगांची उधळण होते त्याचबरोबर घराघरात खास होळीनिमित्त खाद्यपदार्थ तयार होतात.आता होळी म्हटलं की पुरणपोळी आपल्याला आठवते पण खान्देशात होळीच्या दिवशी खास पदार्थ केले जातात ते म्हणजे फुणके, चिंचेचे पन्हे आणि येळवणीची आमटी केली जाते. अगदी आजीच्या काळातील हे खाद्यपदार्थ आहेत. तयार करायला अतिशय सोपे तसेच पौष्टीक. होळीपासून उन्हं वाढत जातं आणि शरीराला गरज असते थंडाव्याची अशावेळी चिंचेचं पन्हं अगदी उत्तम आहे. येळवणीची आमटी म्हणजे मराठमोळा ठसका असचं म्हणायला हवं. या तीनही रेसिपी आपल्यासाठी खास तयार केल्या आहेत सौ.नंदिनी राजेंद्र जोशी यांनी

 

१. फुणके करण्यासाठी लागणारे साहित्य 

1 कप चणाडाळ
1/2 कप मुगडाळ
१ ते २ कांदे
वाटीभर कोथींबीर
1 टीस्पून जिर
1 टीस्पून ओवा
1 टीस्पून तिखट
1 टीस्पून हळद
1 टीस्पून धणेपुड
3 मिरच्या
३-४ लसुण पाकळ्या
छोटा अद्रक तुकडा
मीठ चवीनुसार

फुणके करण्यासाठी लागणारे साहित्य 

कृती

१. प्रथम चणाडाळ आणी मुग डाळ धुवून पाच ते सात तास भिजत घालावी.भिजलेल्या डाळीमध्ये कोथिंबीर आणि कांदा सोडून सर्व साहित्य घालावे आणि जाडसर वाटून घ्यावे. मिक्सरमधून काढताना शक्यतो पाणी घालू नये. फुणक्याचे मिश्रण जाडसर हवे. कांदा बारीक चिरून तयार ठेवा कारण तो या मिश्रणात घालायचा आहे. 

२. आता  वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालावी आणि मिश्रणाचे लांबट वडे करुन घ्यावेत. आपण जसे मुकटे करतो अगदी त्याप्रमाणे करावे.

मिश्रणा

3.आता गॕसवर एका पातेल्यात पाणी ठेवा आणि ते गरम झाले की त्यावर तेलाचा हात लावून चाळणी ठेवावी.आता त्या चाळणीवर आपण तयार केलेले फुणके ठेवावेत. साधारण पंधरा मिनिटात फुणके शिजतात.  

4. आता फुणके शिजुन तयार झाले की तुम्ही लगेच त्याचा आस्वाद घेवू शकता पण त्याला अधिक टेस्टी करायचे असेल तर अगदी थोड्या तेलावर फुणके शॅलो फ्राय करु शकता. डाळी असल्यामुळे अतिशय पौष्टीक तसेच वाफवल्यामुळे तेलाचा वापर अतिशय कमी मग काय तयार करणार ना खान्देशी फुणके !

2. चिंचेचे पन्हे साहित्य
1 वाटी चिंच
1 वाटी किसेलेला गुळ
छोटा अर्धा चमचा वेलची पावडर
छोटा अर्धा चमचा जीरे पावडर
स्वादानुसार काळे मीठ

कृती

1. चिंच साफ करून घ्या आणि गरम पाणी करून त्यात पंधरा ते वीस मिनीटे भिजत ठेवा. चिंच भिजली की कोळ काढणे सोपे जाते. आता भिजलेली चिंच हाताने कुस्करून घ्या.

भिजलेली चिंच

2.आता चिंच काळून झाली की त्यात वाटीभर किसलेली गुळ टाका.आता मिश्रण एकजीव झालं की स्वादानुसार काळे मीठ आणि वेलची पावडर घाला. आता यात पाणी घालून छान मिक्स करा.

3.आपले चिंचेचे पन्हे तयार आहे. अगदी झटपट होणारे हे पन्हे एकदा पिवून पाहा. पुन्हा पुन्हा प्यावसं वाटतं एव्हढं भारी लागतं. 

3.येळवणीची आमटी साहित्य

1 छोटी वाटी चण्याची डाळ ( डाळ भिजत घालून ठेवावी.)
1 टेबलस्पून चींच पेस्ट
1 टेबलस्पून गुळ
1/2 टेबलस्पून गोडा मसाला
1/2 टेबलस्पून लालतीखट
1/4 टेबलस्पून हळद
1/4 टेबलस्पून जीरे पावडर
1/4 टेबलस्पून धणे पावडर
1 टेबलस्पून तेल
1/4 टेबलस्पून मोहरी
1/4 टेबलस्पून हींग
1/4 टेबलस्पून जीरे
६-७ कडीपत्ता पाने
मुठभर कोथिंबीर
एक छोटी वाटी किसलेलं सुकं खोबर
खडे मसाले- एक वेलची, दोन लवंग , छोटा दालचिन तुकडा, एक चमचा धणे
२ लाल सुक्या मिरच्या
चिमुटभर जायफळ पूड

कृती 

१. खडे मसाले कोरडे भाजून घ्यावे. त्यानंतर सुके खोबरे एक चमचा तेल घालून भाजून घ्यावे. आता हे पदार्थ मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर तयार करावी. 

२.कुकुरमध्ये चण्याची डाळ वाफवून घ्यावी. डाळ चांगली घोटून घ्यावी म्हणजे आमटी छान एकजीव होते. 

3. आता एका पातेल्यात दोन ते तीन चमचे तेल घालावे. जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. आता फोडणीत लाल सुकी मिरची, कडीपत्ता आणि तयार केलेला मसाला घालून खमंग फोडणी करा. आता या फोडणीत वाफवलेली आणि घोटलेली डाळ घालावी. त्यात आवडीनुसार गुळ आणि चवीनुसार मीठ घालावे. ही आमटी थोडी पातळ असते पुरळपोळीसोबत तिचा आस्वाद आपण घेवू शकतो. 

4. आमटीला उकळी आली की त्यात वरुन कोथिंबीर घालावी. खडे मसाला आणि गोडा मसाला यामुळे आमटीचा घमघमाट घरभर पसरतो आणि खाताना जाणवतो सुद्धा. 

मग यंदाच्या होळीला फुणके, चिंचेचे पन्हे आणि येळवणीची आमटी नक्की करा आणि कुटुंबाकडून वाह वाह मिळवायला विसरु नका !

अनिता किंदळेकर

 

 

Logged in user's profile picture
Response(s) (1)