चमचमीत आणि टेस्टी तवा मसाला चाप रेसिपी!

4 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

'चाप' हा एक असा पदार्थ आहे ज्याला कोणीही कधीही नाही म्हणू शकत नाही आणि 'तवा मसाला चाप' ही एक अशी रेसिपी आहे जी नक्कीच आपल्या तोंडाला पाणी येणारी आहे! साध्या साहित्याने बनणारी ही अमेझिंग रेसिपी बनवा आणि स्वत: ला आणि तुमच्या फॅमिलीला एक मस्त ट्रीट द्या!

साहित्य:

  • ४-५ चाप स्टिक्स (अर्धा किलो)
  • कोथिंबीर - मूठभर
  • पुदिन्याची पाने - 8-12 पाने
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • आले- २ छोटे तुकडे
  • लसूण (आलं-लसूण पेस्ट)
  • एका लिंबाचा रस
  • २ मोठे चमचे बेसण
  • २ मध्यम आकाराचे कांदे
  • ३-४ मध्यम आकाराचे टोमॅटो
  • १ मोठा चमचा टोमॅटो केचप (गरज असल्यास)
  • चवीनुसार मीठ
  • तिखटपणासाठी लाल मिरची पावडर
  • काश्मिरी लाल मिरची पावडर रंगासाठी
  • हळद
  • गरम मसाला
  • किचन किंग मसाला
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • चाट मसाला
  • धणेपूड
  • अर्धा ते एक कप पाणी
  • २-३ मोठे चमचे तेल

प्रक्रिया:

भिजवून ठेवण्यासाठी:

  • चाप स्टिक्स मऊ आणि चावायला सोप्या होईपर्यंत प्रेशर कुकरमध्ये चिमूटभर मिठासह उकळून घ्या (१ शिट्टी झाली की पुढे ५-६ मिनिटे उकळत ठेवा)

  • चाप उकळत असताना एका ब्लेंडरमध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पाने, आल्याचा एक छोटा तुकडा, २-३ लसूण पाकळ्या, १-२ हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि ३-४ चमचे पाणी घाला.

  • त्याची अगदी बारीक पेस्ट बनवून घ्या आणि ती मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्या.
  • या पेस्टमध्ये २ चमचे बेसण आणि सर्व मसाले घाला.

  • चांगले मिसळून घ्या आणि आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला.

  • उकडलेल्या चापचे लहान तुकडे करा आणि ते या मसाल्या मध्ये भिजवा.

रस्सासाठी:

  • एका पॅनमध्ये २-३ चमचे तेल घालून ते गरम होऊ द्या.
  • तोपर्यंत आले, लसूण आणि कांदे बारीक चिरून घ्या.
  • गरम तेलात चिरलेला कांदा, आले आणि लसूण घाला.

  • हे सर्व गुलाबी-तपकिरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या.
  • ३ मध्यम आकाराचे टोमॅटो किसून किंवा ब्लेंड करून त्याची प्यूरी बनवून घ्या.
  • पॅनमध्ये हळूहळू ही टोमॅटो प्यूरी घाला.
  • चवीसाठी १ चमचा टोमॅटो केचप घाला.
  • चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, धणेपूड आणि हळद घाला.

  • या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत ते चांगले परतून घ्या.

  • चांगले शिजले की त्यात अर्धा-एक कप पाणी घालून एक उकळी आणा आणि मग मंद आचेवर उकळत ठेवा.
  • ते सुमारे ४-५ मिनिटे शिजू द्या

तवा चापसाठी:

  • एक नॉन-स्टिक पॅन घ्या आणि त्यावर थोडे तेल घाला.
  • बाहेरून तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत चाप शॅलो फ्राय करून घ्या.

  • झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्या.

शेवटच्या स्टेप्स:

  • ग्रेव्हीमध्ये हे तळलेले चाप घाला आणि पुढे २-३ मिनिटे आणखी शिजवा.

  • उरलेला मसाला पण यात टाका
  • बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवा.

तोंडाला पाणी सुटेल असे तवा चाप तयार! लच्छा पराठा / रुमाली रोटी, कांदे आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरमच सर्व्ह करा.

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture