प्रजनन आरोग्य

8 minute
Read

Highlights या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहे की नेमक्या कुठल्या प्रकारे आपण प्रजनन आरोग्याची काळजी घेऊ शकतो, किंबहुना ती काळजी घेणं किती आवश्यक आहे या विषयी जाणून घेणार आहोत.

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळे आपल्या आरोग्याकडे बरेचदा दुर्लक्ष करताना दिसतात. आपण जसं शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती लक्ष देतो तसंच प्रजनन आरोग्यावरही लक्ष देणं तेवढच गरजेचं आहे. एका सुदृढ मनुष्याचा प्रजनन आरोग्य, मानसिक व शारीरिक आरोग्य तिन्ही सशक्त असते. मुद्दा आपल्या प्रजनन आरोग्याचा.  याबाबतीत जाणीवपूर्वक बोलणे आणि लिहिणं खूप गरजेचे आहे. प्रजनन आरोग्य म्हणजे स्त्री व पुरुषाच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात असलेल्या प्रजनन प्रणालीची काळजी.  याबाबतीत बोलणं बऱ्याचदा लोक टाळतात. अर्थात त्याची काही कारणेही आहेत.

मुलीची मासिक पाळी ही तिच्या प्रजनन क्षमतेची पहिली पायरी आहे. प्रत्येक स्त्री या अवस्थेतून जाते कारण हे नैसर्गिक आहे. दर महिन्यात तीन ते पाच दिवसात स्त्रीच्या गर्भाशयातून रक्तस्त्राव होतो.  या दिवसात मुलींना अतिरक्तस्त्राव, चिडचिडेपणा,  अंगावरून पांढरे जाणे  आणि ओटी पोटात दुखणे या सगळ्या तक्रारी उद्भवतात. मासिक पाळीत आरोग्याची काळजी हा महत्त्वाचा मुद्दा. सकस आहार पुरेशी विश्रांती गरजेची आहे.  अंतर्भागाची स्वच्छता अतिशय गरजेचे आहे. सुती कपडा सॅनिटरी नॅपकिन मेंस्त्रुवाल कप चा वापर अर्थात आपल्याला योग्य असा पर्याय निवडावा.  अंतर्भागांची स्वच्छता नीट न राखल्यास  इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते ज्यामुळे आपल्या प्रजनन आरोग्यास धोका येऊ शकतो. दैनंदिन जीवनात सकस आहार आणि पुरेसा व्यायाम न केल्यास ही प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

a doctor and a patient discussing reproductive health

Source: pixabay.com

पुरुषांचे प्रजनन आरोग्य ही तेवढेच महत्त्वाचा आहे कारण बीज तयार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते.  व्यसनांमुळे पुरुषांच्या वीर्य उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.  त्यामुळे सकस आहार नियमित व्यायामास बरोबर व्यसनांपासून लांब राहणंही तेवढेच महत्त्वाचं आहे.  शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य ही तेवढाच महत्त्वाचा आहे सकारात्मक जीवनशैली आत्मसात करण्याने  माणूस निरोगी राहतो हे संशोधनातून आढळून आलेले आहे.

आता हे तर स्त्री आणि पुरुषाचे वेगवेगळे प्रजनन आरोग्य प्रणाली झाले. पण जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतात तेव्हा सुरक्षित संभोग ही तेवढाच महत्त्वाचा आहे.  संभोग जितका गरजेचा आहे  तितकच ते सुरक्षितपणे करणे ही गरजेचे आहे.  बाजारात वेगवेगळे गर्भनिरोधक उपलब्ध आहेत  ज्याचा नक्कीच वापर केला जाऊ शकतो.  नको असलेले गर्भधारणा टाळण्यास  कॉन्डोम्स कॉपर टी आईपीएल या वेगवेगळ्या गर्भनिरोधक वापरू शकतो.  फक्त हेच नाही तर संभोगातून निर्माण झालेले आजार सुद्धा याने टाळले जाऊ शकतात. एच आय व्ही(HIV) एड्स(AIDS) हरपिस गोनोरिया ह्या सगळ्या आजारांनी  वंध्यत्वाची शक्यता वाढू शकते आणि त्याबरोबरच कॅन्सरही होऊ शकतो.

गर्भधारणेनंतर येते गर्भावस्था जी नऊ महिन्यांची असते. ह्या नऊ महिन्यांमध्ये आई व आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे.  या काळामध्ये आईला सकस आहार, झेपेल असा व्यायाम आणि पुरेपूर विश्रांती मिळणं खूप गरजेचे आहे. मानसिक तणावापासून लांब राहिल्याने होणारं बाळ हे सुदृढ आणि निरोगी जनमत.  गर्भवती स्त्रीच्या आहारामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे असली पाहिजेत. 

a sanitary napkin and a tampoon

Source: pixabay.com

 बाळ जन्मल्यानंतरही बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते.  बाळ आणि बाळंतीनी दोघेही नाजूक अवस्थेत असल्यामुळे काही दिवस त्यांना जपावे लागते. ते राहत असलेली जागा स्वच्छ आणि पुरेपूर हवेशीर असली पाहिजे.  बाळ हे सुरुवातीच्या सहा महिन्यात आईचा दुधावरच वाढतं त्यामुळे आईचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. आईचा आहार संतुलित असावा याची काळजी घ्यावी.

प्रजनन आरोग्याबद्दल फारशी चर्चा का नाही होत?

याला अनेक कारणं आहेत जी काही लोकांना पटू शकतात व काहींना नाही. सर्वात जास्त पाहिलं गेलेलं कारण म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा.  लोकांसमोर आपल्या प्रजनन आरोग्य बाबतीत बोलणं हे प्रत्येकाला काही पटत नाही.  काहींना या गोष्टीची लाज वाटत असेल किंवा काहींना ते पर्सनल ठेवणं जास्त साजेस वाटतं. याबाबतीत प्रत्येकाचं वैयक्तिक मत असेल.

 प्रजनन आरोग्याबद्दल का चर्चा झाली पाहिजे?

वर वाचलेला प्रत्येक टप्पा हा माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. गर्भधारणा, बाळाचा जन्म किंवा अबॉर्शन  हा एका स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि संवेदनशील टप्पा आहे. आणि तसंच त्या स्त्रीच्या आयुष्यातल्या पुरुषाचा ही.  प्रजनन आरोग्य हे एक चक्र आहे.  जमिनीत बी पेरताना त्या बियाची गुणवत्ता तपासली जाते आणि बि पेरल्यानंतर  जमिनीची ही काळजी घेतली जाते आणि त्याला पुरेपूर पाणी दिलं जातं. याने उगवणार  रोप हे सुंदर आणि स्वस्थ राहतं. आणि त्या रोपेतून येणारी फुलं फळ आणि बिया ही पोषणमूल्य असतात. म्हणजे यासाठी बियाची गुणवत्ता आणि जमिनीची काळजी दोन्ही गरजेचे आहे.

a lady holding a menstrual cup

Source: pixabay.com

तसंच पुरुषाकडून येणार वीर्य आणि बाईचं गर्भाशय दोन्हीही स्वस्थ असणं गरजेचं आहे.  यामुळेच होणारा बाळ निरोगी आणि सुदृढ असेल. आणि यासाठी दोन्ही स्त्री आणि पुरुषाने आपल्या प्रजनन आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याहून महत्त्वाचं आहे याबद्दल जागरूकता असणे. प्रजनन आरोग्य किती महत्त्वाचा आहे हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचे आहे.  आजकाल आपण सोशल मीडियाच्या आधी गेलो आहोत तर या मीडियाचा चांगला उपयोग का नाही करू शकत? आपण असे प्लॅटफॉर्म्स बनवू शकतो ज्यावर लोक आपल्या प्रजनन आरोग्या संबंधित प्रश्न मी संकोचपणे विचारू शकतात आपण. 

या प्लॅटफॉर्मय वरती क्वालिफाईड डॉक्टर्स गायनॅकॉलॉजिस्ट ना आपण आणू शकतो. आणि यासाठी दोन्ही स्त्री आणि पुरुषाने आपल्या प्रजनन आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याहून महत्त्वाचं आहे याबद्दल जागरूकता असणे. प्रजनन आरोग्य किती महत्त्वाचा आहे हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचे आहे.  आजकाल आपण सोशल मीडियाच्या आधी गेलो आहोत तर या मीडियाचा चांगला उपयोग का नाही करू शकत? आपण असे प्लॅटफॉर्म्स बनवू शकतो ज्यावर लोक आपल्या प्रजनन आरोग्या संबंधित प्रश्न मी संकोचपणे विचारू शकतात आपण.  या प्लॅटफॉर्मय वरती क्वालिफाईड डॉक्टर्स गायनॅकॉलॉजिस्ट ना आपण आणू शकतो.

जसं शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती आजकाल चर्चा होत आहे तसंच प्रजनन आरोग्यावरती हीच चर्चा झाली पाहिजे याबाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे का गरजेचे आहे हे आपण वाचला आहे.  यात आपणही आपला हातभार लावू शकतो. आपल्याकडे असलेली माहिती देणं किंवा दुसऱ्यांकडून ती माहिती मी संकोच घेणं हे निव्वळ आपण करू शकतो. अशा अनेक संवाद वाढतील, आणि जागरूकता पसरेल.

 

Logged in user's profile picture