सौंर्दय आणि फिटनेसाठी 'काजू' सर्वोत्तम !!

8 minute
Read

Highlights भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये सुकामेव्याला फार महत्व आहे. या सुकामेव्यामध्ये काजू, बदाम, बेदाणे, अक्रोड, मनुका,पिस्ता यांचा समावेश होतो. या सगळ्यांमध्ये ''काजू'ला ड्रायफ्रूट्सचा राजा मानले जाते. 'काजू' हा स्वादामध्येसर्वोत्तम आहेच तसेच त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. आपल्या मिठाईचा स्वाद वाढविणारा काजू एक सुपरफुड असून आरोग्यवर्धक आहे. 'काजू' खाण्यामुळे काय होतात फायदे यासाठी वाचा 'सौंर्दय आणि फिटनेससाठी सर्वोत्तम काजू' !

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

सुका मेवा म्हटलं की डोळ्यासमोर येतो 'काजू' ! सगळ्यांना आवडणारा, आपला पुलाव, बिर्याणी, ग्रेव्हीचा स्वाद द्विगुणीत करणारा असा हा 'काजूगर'. काजू हा अगदी कोणत्याही डिशमध्ये परफेक्ट फिट होणारा असा प्रकार आहे. त्यामुळे काजू  प्रत्येक घरात असतो. डॉक्टर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना काजू खायला सांगतात कारण काजू आरोग्यवर्धक आहे. काजूचे सेवन हृदयापासून केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.महाराष्ट्रातील कोकणात काजूचे पीक घेतले जाते. त्यामुळे कोकणात गेल्यानंतर अगदी खरेदी करण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘काजू’. योग्यपद्धतीने काजू साठवून ठेवला तर तो वर्षभर चांगला टिकतो. थंडीच्या दिवसात तर आवर्जून काजू खायला हवा कारण त्यातील पोषकता आणि उष्णता आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम मानली जाते.

वैज्ञानिक नाव:  Anacardium occidentale

प्रमाण:  100 ग्रॅम

एकूण कॅलरिज: 157 कॅलरिज

कार्बोदक: 8.56 ग्रॅम

साखर: 1.68 ग्रॅम

फायबर: 0.9 ग्रॅम

एकूण फॅट: 12.43 ग्रॅम

कॅल्शिअम: 10 मिलिग्रॅम

प्रोटीन: 5.17 ग्रॅम

कॅल्शिअम: 10 मिलिग्रॅम

आर्यन: 1.89 मिली ग्रॅम

मॅग्नेशीअम: 83 मिली ग्रॅम

फॉस्फरस: 168 मिली ग्रॅम

पोटॅशिअम: 187 मिली ग्रॅम

सोडियम: 3 मिली ग्रॅम

झिंक: 1.64 मिली ग्रॅम

या शिवाय काजूमध्ये व्हिटॅमिन C,B असेही काही घटक असतात.

काजू

समुद्रकिनाऱ्यावर काजूचे उत्पादन घेतले जाते. काजूचे फळ दिसायला पेरूसारखे असते. त्याच्या खाली आलेला कोंब म्हणजे आपण खातो तो काजू. काजूच्या बिया वाळून त्या भाजल्या जातात. त्यानंतर त्याचा पांढरा गर मिळतो. हल्ली काजूचे अनेक प्रकार बाजारात मिळतात. सालंवाले काजू हे कोकणात हमखास मिळतात. पण काजू सोलण्याचे कष्ट नको म्हणून सोललेले काजू याशिवाय वेगवेगळ्या फ्लेवरमध्येही काजू मिळतात. कोकणासह आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि ओरीसामध्ये काजूचं उत्पादन घेतलं जातं. घरात बासुंदीपासून शिऱ्यापर्यंतच्या जेवणात चव आणणाऱ्या काजूचे आरोग्यवर्धक फायदे काय आहेत ते पाहूया.

काजूचे फळ

• हृदयविकाराचा धोका कमी होतो

काजूमध्ये बायोऍक्टिव्ह मायक्रोन्यूट्रिएंट असल्यामुळे हे हृदयासाठी फार चांगले मानले जाते. हार्ट पेशंट व्यक्तींसाठी काजू खाण्याचा सल्ला दिला जातो. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट असते. या फॅटमुळे शरीरासाठी खराब असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे ह्रदयविकाराच्या आजारापासून तुम्ही दूर राहता. मात्र यासाठी काजूचे सेवन योग्य प्रमाणात होणे गरजेचे आहे. प्रामख्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो म्हणून डॉक्टर काजुचं सेवन करायला सांगतात.

• केस आणि त्वचेसाठी सर्वोत्तम

काजूमध्ये झिंक,आर्यन,फॉस्फरस आहे तसेच प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट सारखे घटक असतात. जे त्वचा आणि केसांच्या वाढींना चालना देण्याचे काम करतात. त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी काजूच्या बियांचं तेल वापरायला सुरु करा.काजूगर आणि काजूचे तेल या दोन्हीचा वापर केल्यामुळे केस आणि त्वचेला फायदा होतो. काजूमुळे मेलनिनची उत्पत्ती होण्यास मदत मिळते. काजूच्या सेवनामुळे किंवा त्याच्या वापरामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. केसांचा वाढ लवकर होते. लिनोलिक आणि ओलिक आम्लांमुळे  केसांचा रंग आणि सिल्की टेक्श्चर छान होतं.

• वजन राहते नियंत्रणात

काजू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक असणारे फॅट मिळतात. काजूमध्ये असणारे फायबर शरीराचे वजन नियंत्रण करण्यासाठी मदत करतात. काजूच्या सेवनामुळे पोट भरते. काहीही खाण्याची इच्छा होत नाही. याशिवाय काजूमध्ये असलेले मॅग्नेशीअम पचनशक्ती वाढवते. यामध्ये असलेली कर्बोदके वजन कमी करण्यास मदत करतात. याशिवाय काजूमध्ये प्रोटीन असतात. ज्यामुळेही शरीराला आवश्यक घटक मिळून वजन नियंत्रणात राहते. काजू योग्य प्रमाणात खाल्ला तर वजन कमी करण्यास मदत मिळते.

• डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

काजूमध्ये ओमेगा 3 नावाचे फॅटी ऍसिड आहे. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. याशिवाय काजूमध्ये व्हिटॅमिन E देखील असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. डोळ्यांना इतर त्रासापासून दूर ठेवण्याचे कामही काजूगर करतात. त्यामुळे चांगल्या डोळ्यांसाठी काजूचे सेवन करावे.

• हाडांच्या वाढीसाठी काजूचा उपयोग

काजूमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांच्या विकासासाठी तसेच त्यांना मजबूत करण्यासाठी काम करतात. काजूमध्ये असलेले आणखी एक मिनरल्स म्हणजे मॅग्नीझ, त्यामुळेही हाडांची बळकटी मिळण्यास मदत होते. हाडांशी निगडीत आजारांना दूर ठेवायचे असेल तर आहारात काजू असायला हवे.

• रक्तदोषांपासून संरक्षण

योग्य प्रमाणात काजूचा आहारात समावेश केला तर रक्तदोष होत नाहीत. काजूमध्ये आर्यन (लोह) मुबलक प्रमाणात असते. आर्यन शरीरातील अशुद्ध गोष्टी बाहेर फेकण्याचे काम करते.जर शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऍनिमियाचा धोका निर्माण होतो. लोहाचं रक्तातील प्रमाण नेहमी पुरेसं असावं आणि त्यासाठी काजू नक्कीच सोपा मार्ग आहे.

• गर्भवती महिलांसाठी उपयोगी

काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी याचे सेवन केल्यास त्यांचे आरोग्य उत्तम राहते.तसेच बाळाला देखील याचा फायदा होतो बाळाची हाडे काजूमुळे मजबूत होतात.

गर्भवती महिलां

• बुद्धी तल्लख होते

काजूमध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट असते. मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी ते मदत करतात.काजूच्या सेवनामुळे बुद्धी तल्लख होते. स्मरणशक्ती चांगली होते.

काजू

काजू आरोग्यासाठी चांगला आहे पण त्याचे अतिसेवन शरीरास अपाय करू शकतं. काजूमध्ये फायबर आहे. तसे पाहिले तर फायबर आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते पण जर जास्त प्रमाणात फायबर शरीरात गेले तर पचनक्रिया बिघडते. पोट फुगणे आणि गॅसेसचा त्रास होतो. अति काजू खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते. तुम्हाला तुमचे शरीर सुटल्यासारखे आणि वागण्यात थोडासा आळशीपणाही नक्की जाणवेल म्हणून योग्य प्रमाणात काजू खायला हवेत. काजूमुळे बद्धकोष्ठता होवू शकते.शरीरात उष्णता वाढल्यामुळे पोटदुखी, शौच्यास कडक होणे असे त्रास होवू शकतात. जर तुम्हाला पित्ताशयाचा त्रास असेल किंवा मुतखडा होत असेल तर काजू खाणे टाळावे. काजूचे दुष्परीणाम जरी असेल तरी त्याचे फायदे अनेक आहेत. काजूचे योग्य प्रमाणात सेवन केले तर तो आरोग्यवर्धक आहे. तुमच्या आहारात योग्य प्रमाणात सुपरफूड काजूचा समावेश करा. स्वस्थ राहा आणि निरोगी राहा.

अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture

काजूचे आरोग्यवर्धक फायदे काय आहेत?

हृदयविकाराचा धोका कमी होतो

केस आणि त्वचेसाठी सर्वोत्तम

वजन राहते नियंत्रणात

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

हाडांच्या वाढीसाठी काजूचा उपयोग

रक्तदोषांपासून संरक्षण

गर्भवती महिलांसाठी उपयोगी

बुद्धी तल्लख होते