महाराष्ट्रातील 10 सर्वोत्तम स्ट्रीट फूड!

10 minute
Read

Highlights खालील ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध स्ट्रीट फूड जे प्रत्येक माणसाने किमान एकदा तरी चाखून पहावे. काही तिखट, काही गोड तर काही आंबट गोड असलेले हे पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील!

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा तर महाराष्ट्राला लाभला आहेच पण खाद्य पदार्थांमध्ये सुद्धा महाराष्ट्र काही कोणापेक्षा कमी नाही. अगदी महाराष्ट्रात पहिल्यांदा तयार झालेल्या पदार्थांपासून तर भारतात प्रसिद्ध असलेले स्ट्रीट फूड सुद्धा महाराष्ट्रात मिळतात आणि लोकं अगदी चवीने त्याचा आस्वाद घेतात. खालील ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध स्ट्रीट फूड जे प्रत्येक माणसाने किमान एकदा तरी चाखून पहावे. काही तिखट, काही गोड तर काही आंबट गोड असलेले हे पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील. चला तर मग, सुरु करूया मुंबईच्या प्रसिद्ध वडा पाव पासून!

• वडा पाव

वडा पाव

Source:veggierecipehouse

मुंबई मधील लोकल ट्रेन्स नंतर जर अजून कुठल्या गोष्टीला मुंबईची लाईफ लाईन म्हटल्या गेलं असेल तर ते म्हणजे 'वडा पावला.' दररोज जवळ जवळ २ लाख वडा पाव मुंबईकर खातात. अगदी चालतांना सुद्धा तुम्ही खाऊ शकता असा हा पदार्थ आहे.

मुंबई सारख्या धावपळीच्या शहरात वेळेला प्रचंड महत्व आहे आणि मुंबईकरांचा हाच अमूल्य वेळ वाचवण्यासाठी वडा पाव मदतगार ठरतो. कीर्ती कॉलेज वडा पाव स्टॉल, प्रभादेवी, आराम वडा पाव, मुंबई सीएसटी , पार्लेश्वर वडा पाव सम्राट, विले पार्ले, रोहित वडेवाला, पुणे आणि असे आणखी अगणित वडा पाव वाले संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

• मिसळ पाव

मिसळ पाव

Source:pingpot

पुणं हे शहर म्हणजे महाराष्ट्रची शान आणि याच पुण्याची शान म्हणजे मिसळ पाव. पुण्यातून प्रसिद्ध झालेला हा पदार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र भर पसरला आहे. जसा मुंबईचा वडा पाव प्रसिद्ध आहे त्याच प्रमाणे पुण्याच्या मिसळ पावाला तोड नाही.

त्यात ही जर तुम्हाला सर्वोत्तम मिसळ खायची असेल तर ती काटाकिर आणि बेडेकरची. एकाच वर्गात दोन अव्वल येणाऱ्या विदार्थ्यांमध्ये जशी चढाओढ चालू असते त्याच प्रकारे बेडेकर उत्तम की काटाकिर उत्तम ही चर्चा पुणेकरांमध्ये रंगत राहते. परंतु पुणे सोडून संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे अगदी कोल्हापूर आणि नागपूरमध्ये सुद्धा मिसळीचा आस्वाद घेऊ शकता.

• कांदा पोहा

कांदा पोहा

Source: istock

विदर्भ आणि तिखट हे दोन शब्द कधीच एकट्याने उद्गारल्या नाही जाऊ शकत. विदर्भ आलं म्हणजे तिखट यायलाच हवं आणि त्याच प्रमाणे तिखट म्हटलं की विदर्भाचं नाव यायलाच हवं. कांदा पोहा हा पदार्थ जरी संपूर्ण महाराष्ट्रात मिळत असला तरी तर्री पोह्याची खरी मजा ही विदर्भातल्या नागपूरातच आहे.

आजही लग्न म्हंटलं की आपल्या डोळ्यसमोर सगळ्यात आधी काही येत असेल तर ते म्हणजे कांद्या पोह्याचा कार्यक्रम. संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पोहे खायला मिळतील. नागपूरला आलात तर तुम्हाला तर्री पोहा मिळेल, पुण्या मुंबईकडे कांदा पोहे मिळतील ज्यावर तर्री किंवा रस्सा असेलच असं नाही.

• पाव भाजी

पाव भाजी

Source: cdnparenting

वडा पाव नंतर किंबहुना वडा पावाच्या बरोबरीत मुंबईकरांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची भूक मिटवण्यात पाव भाजीचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातच जन्म घेतलेला हा पदार्थ नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर सगळीच कडे मिळतो आणि लोकं त्याला अगदी चवीने खातात. पण त्यातला त्यात जर काही नावं सांगायची झाली तर मुंबई मधील सरदार पाव भाजी, नागपूर मधील श्रीनाथ पाव भाजी, एमएच १२ पाव भाजी, पुणे आणि असे अगणित स्टॉल संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला मिळतील.

• बोंबील फ्राय

बोंबील फ्राय

Source: global

सोने पे सुहागा म्हणता येणारं मांसाहारी लोकांसाठी हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. हे बोंबील मास्यापासून बनलेलं असल्याने, मुंबईतील अतिशय प्रसिद्ध समुद्री खाद्यामध्ये मोडल्या जातं. बहुतेक वेळा बेसनाचे जाड मिश्रणात टाकून त्याला तळले जाते. महाराष्ट्रात बोंबील फ्राय हे प्रसिद्ध आहेच पण प्रामुख्याने कोकण आणि मुंबई हे बॉम्बिल फ्रायसाठी प्रसिद्ध असलेली शहरं आहेत. वांद्रे मध्ये स्थित वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जवळील हॉटेल गोमंतक हे अनेक खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे जे मुख्यतः त्याच्या मेनूमधील विविध प्रकारच्या सीफूडमुळे, विशेषतः बोंबील फ्रायमुळे मुंबईकरांच्या मनावर अधिराज्य गाजवतं.

• रगडा पॅटिस

रगडा पॅटिस

Source: rukmis

'रगडा पॅटिस' हा पदार्थ भारताच्या उत्तर भागात आलू टिक्की किंवा टिक्की चाट म्हणूनही ओळखला जातो. हे मसालेदार ग्रेव्ही आणि टिक्कीसह दिले जाते आणि चवीला सुद्धा एकदम गरम आणि झणझणीत तिखट आहे. कोल्हापूर हे रग्डा पॅटिससाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे, परंतु महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये देखील त्याच्या मोहक चवीचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

• साबुदाणा वडा

साबुदाणा वडा

Source: wikimedia

श्रावण सोमवार, महाशिवरात्री, एकादशी, नवरात्र किंवा चतुर्थी कुठलाही सण-वार असो उपवास म्हंटलं की महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्या समोर एकच पदार्थ येतो तो म्हणजे साबुदाणा वडा. मुख्य म्हणजे ज्याला उपवास नसेल, हा साबुदाणा वडा बघितल्यावर त्याच्या तोंडात सुद्धा पाणी येतं. महाराष्ट्रात, साबुदाणा वडा हा सर्वात पारंपारिक उपवासाचा पदार्थ आहे. पण फक्त पारंपरिक नसून आजच्या नवीन युगात सुद्धा हा प्रसिद्ध असलेला अगदी गरम आणि कुरकुरीत पदार्थ आहे . या पदार्थाच्या चवदार पणामुळे लोक अगदी चालता फिरताना सुद्धा खाणं पसंत करतात आणि केवळ उपवास असतानाच नाही.

• भेळ

भेळ

Source: blogspot

पुण्यातील सारसबाग असो, मुंबईचा जुहू बीच असो किंवा नागपुरातील लोकमत चौक या सगळ्यामध्ये फक्त दोनच गोष्टी कॉमन आहेत. एक म्हणजे हे तिन्ही शहरं महाराष्ट्रात येतात आणि दुसरं म्हणजे या तिन्ही जागेवरची भेळ जगात भारी आहे. महाराष्ट्रातील पाणीपुरीच्या बरोबरीनेच जर काही प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे भेळ. चिवडा, चिरलेला कांदा, चिरलेले टमाटर, मुरमुरे आणि प्रत्येक स्टॉल वाल्यांचा एक खास मसाला आणि अजून बरेच काही प्रकार एकत्र कालवून भेळ तयार होते. भेळच्या लोकप्रियतेचे सगळ्यात प्रमुख कारण आहे की पचायला हलकं पण तेवढाच चवदार.

• खिमा पाव

खिमा पाव

Source:ytimg

आणखी एक मसालेदार मांसाहारी पदार्थ ज्याला पाहून कोणाच्या ही तोंडात पाणी येईल तो म्हणजे खिमा पाव, एक अतिशय मोहक आणि रुचकर स्ट्रीट स्नॅक. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री सुद्धा, लोकांना खिमा पाव खायला आवडतो. खिमा पाव समोर आला की त्याची चव आठवून आणि त्यांचा गंध येताच कुठल्याही माणसाला स्वतःला थांबवणं शक्य होणार नाही.

• चाट

चाट

Source: tasteofhome

हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचे स्ट्रीट स्नॅक्स आहे. चाट म्हणजे हे काही एका खाद्य प्रकारापर्यंत सीमित असलेली वस्तू नाही नाही. पाणी पुरी, सेव्ह पुरी, भेळ पुरी, कचोरी, चटणी पुरी आणि अजून असे बरेच काही पदार्थ येतात यामध्ये येतात.

या सगळ्यांसोबतच सामोसा, कचोरी, राज कचोरी, पुण्यातील मस्तानी, मोमोज आणि अजून असे बरेच पदार्थ आहे जे इथे नमूद करणं शक्य नाही. कारण सगळेच पदार्थ जर आपण नमूद करत बसलो तर अख्खा दिवस कमी पडेल. वरील दिलेल्या यादीतील तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो किंवा तुम्हाला कुठला पदार्थ चाखून पहिल्या आवडेल हे आम्हाला खालील दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा!

Banner Pic source: saibabatravels

Logged in user's profile picture

महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्ट्रीट फूड कोणते आहेत?
खालील ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध स्ट्रीट फूड जे प्रत्येक माणसाने किमान एकदा तरी चाखून पहावे. काही तिखट, काही गोड तर काही आंबट गोड असलेले हे पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील

वडा पाव

मिसळ पाव

कांदा पोहा

पाव भाजी

बोंबील फ्राय

रगडा पॅटिस

साबुदाणा वडा

भेळ

खिमा पाव

चाट

मुंबईची प्रसिद्ध डिश कोणती आहे?
मुंबई मधील लोकल ट्रेन्स नंतर जर अजून कुठल्या गोष्टीला मुंबईची लाईफ लाईन म्हटल्या गेलं असेल तर ते म्हणजे 'वडा पावला.
पुण्याची प्रसिद्ध डिश कोणती?
पुणं हे शहर म्हणजे महाराष्ट्रची शान आणि याच पुण्याची शान म्हणजे मिसळ पाव. पुण्यातून प्रसिद्ध झालेला हा पदार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र भर पसरला आहे