दिवाळीसाठी मराठी शैलीतील सणांकरिता सजावटीचे विविध प्रकार!

8 minute
Read
Diwali.jpg

Highlights
या दिवाळीत तुमचे घर अगदी प्रसन्न आणि सुशोभित बनवण्याचे काही सोपे आणि फार महाग नसलेल्या कल्पना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत!

स्वच्छ, साफ आणि सुशोभित सजवलेली घरं सणांच्या दिवशी घरच्या सदस्यांना प्रसन्नतेचा आणि आनंदाचा अविस्मरणीय अनुभव देतात. आणि त्यात दिवाळी म्हंटलं तर मग विचारायलाच नको! अगदी दिवाळीच्या आठवड्याभरा आधी पासून आपण दिवाळीच्या तयारीला लागतो. काही जण तर अक्षरशः महिन्याभरा आधी पासून दिवाळीच्या तयारीला लागतात. दिवाळी या शब्दातच दिव्यांचा उल्लेख असला आणि दिवाळी ही निश्चितपणे दिव्यांबद्दल जरी असली तरी, ती साजरी करण्याचे अनेक साधे पण सुंदर मार्ग आहेत. हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आपल्या घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करून त्याला उत्सवाचे स्वरूप देतो. या सणाला तुमच्या घराच्या आतील आणि बाहेरील भागामध्ये स्वच्छता आणि सुधारण्या करण्यासाठी अनेक कल्पना आहेत.

या दिवाळीत तुमचे घर अगदी प्रसन्न आणि सुशोभित बनवण्याचे काही सोपे आणि फार महाग नसलेल्या कल्पना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. अर्थात दर वर्षी जर तुम्ही काही नवीन सजावट करू शकत असाल, मग तर काय बघायचं! पण दर वर्षी काही तरी नवीन सजावटीच केल्या पाहिजे असं मुळीच नाही परंतु दर वर्षीच्या सजावटीत काही तरी नावीण्य असलं पाहिजे हे मात्र खरं. दिवे, मेणबत्त्या, फुलांची सजावट, तोरण, स्ट्रिंग लाइट, रांगोळी, गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मुर्त्या या सगळ्यांनी यंदा दिवाळीत सजावट करण्याचा प्रयत्न करा आणि ही खात्री बाळगा की तुमच्या घराचे स्वरूप अगदी बदलून जाईल. 

 

  • मेणबत्त्या आणि दिवे

Source: unsplash

 

सजावटीच्या मेणबत्त्या आणि दिवे ही दिवाळीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही तुमच्या घरी सजावटीच्या मेणबत्त्या आणि दिवे बनवू शकता. मेणबत्त्या होल्डर बनवण्यासाठी तुम्ही वापरलेले (यूज्ड) कॅन वापरू शकता, या कॅनला तुम्ही रंगरंगोटी सुद्धा करून किंवा कॅनला रंगीत कागद गुंडाळून त्यात मेणबत्त्या ठेवू शकता. तुमच्या लिव्हिंग रूममध्ये किंवा बाहेरील भिंतीवर या मेणबत्त्या ठेवल्याने तुमच्या घराची शोभा नक्कीच वाढेल. 

तुमच्या घरात जर बाग असेल, तर तुमचं अंगण दिव्यांनी आणि मेणबत्त्यांनी सजवू शकता. परंतु त्यांना ठेवतांना काळजी घ्या की ते झाडांना इजा करणार नाहीत. तुम्ही बागे मध्ये, कॅन्डल हँडलर च्या सहाय्याने मेणबत्ती लटकवू शकता; हे हँगिंग लाइट्सचा तुमच्या डोळयांचे पारणे नक्की फेडतील . दिवे आणि मेणबत्त्य वेगवेगळ्या डिझाइनमध्ये सुद्धा उपलबध आहेत. त्यातल्या तुम्ही सुगंधी मेणबत्त्यांचा वापर करू शकता. याचा वापर केल्याने तुमचे घर अगदी सुवासिक होऊन जाईल. पाण्यावर तरंगणारे दिवे देखील बाजारात वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. याच तरंगत्या मेणबत्त्या आणि दिवे तुम्ही काचेच्या बाउल मध्ये ठेवू शकता जिथे ते अगदी सौंदर्यपूर्ण दिसतील.

 

  • फुलांची सजावट

Source: cloudfront

 

फुलांमुळे तुमचे घर सुवासिक आणि सुंदर बनते. आपले घर सजवण्यासाठी फुलं अगदी उत्तम सजावटी प्रकारांमधील एक आहे. काही फुले घेऊन तुम्ही त्याचा हार बनवा आणि हाच हार तुम्ही जिन्याच्या रेलिंगवर आणि घराच्या प्रवेशद्वारावर सजवू शकता. 

तुमच्या घराच्या सजावटीत सौंदर्य वाढवण्यासाठी या फुलांच्या हारासोबत तुम्ही स्ट्रिंग लाइट्स देखील जोडू शकता. पाण्याने भरलेल्या काचेच्या भांड्यात गुलाबाची फुले ठेऊन, डायनिंग टेबल किंवा लिव्हिंग रूम टेबलवर तुम्ही हे ठेवू शकता जेणेकरून ती जागा अगदी सुशोभित आणि सुंदर दिसेल. एक विशेष फुलदाणी घेऊन, त्यात सुगंधी फुलांची सजावट करू शकता. ज्याला प्रामुख्याने तुम्ही घराच्या मध्ये भागी ठेवले जाते.

 

  • रांगोळी

Source: zeenews

 

भारतीय संस्कृतीत आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात रांगोळी हा प्रकार काही नवीन नाही. फार पुर्विपार चालत आलेली ही परंपरा आहे. रांगोळी ही देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी खडू, रंगीबेरंगी भुसा (रांगोळी) आणि पिठाच्या दाण्याने जमिनीवर प्रतिमा आणि आकृत्या काढण्याची एक कला आहे. दिवाळीसाठी सामान्य रांगोळी थीम म्हणजे मंगल कलश, घराच्या प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पाऊलखुणा, ओम, स्वस्तिक, प्रज्वलित दीपक, श्री इत्यादी पवित्र चिन्ह रांगोळीच्या स्वरूपात तुम्ही काढू शकता. 

तुमच्या रांगोळीचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही रांगोळीच्या मध्यभागी एक दिवा किंवा एक समयी देखील लावू शकता. रांगोळीचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही फुलांच्या पाकळ्या आणि पानांचाही वापर करू शकता. दिवाळीच्या सजावटीत तुम्हाला जर चमकदार पणा आणि लखलखाट आणायचा असेल तर तुम्ही रांगोळी वर काही सोन्या-चांदीची चमकी सुद्धा टाकू शकता, जी तुम्हाला बाजारात अगदी कमी दरात आणि सहज उपलब्ध होऊ शकते.

 

  • फर्निशिंग

Source: pinimg

तुमच्या घरात नावीन्य आणि नवीन ऊर्जा आणण्यासाठी नवीन बेडशीट, नवीन उशा, फर्निचरवरील कव्हर्स, फरशीवरील कार्पेट आणि घरातील पडदे यासारख्या नवीन गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी नवीन घेतल्यामुळे आपलं बजेट बिगडू शकतं तर काही काळजी करू नका. नवीन विकत घेण्याऐवजी, आपल्याकडे असलेले आधीचे पडदे, बेडशीट वगैरे फक्तं कोमट पाण्यात चांगल्या डिटर्जंटने धुवा आणि त्यामध्ये नवीन चमक येण्यासाठी त्यांना व्यवस्थित इस्त्री करा.

जर तुमच्या बेडरूममध्ये पुरेसा उजेड नसेल आणि तुम्हाला दिवाळीपूर्वी ती खोली पुन्हा रंगवायला वेळ नसेल किंवा तितकं बजेट नसेल, तर काही चमकदार रंगाच्या चादरी त्या खोलीत तुम्ही टाकू शकता. त्याच बरोबरीने त्या खोलीत तुम्ही चमकदार पडदे सुद्धा लावू शकता, जेणेकरून त्या खोलीत पुरेसा उजेड होईल. तुमच्या पडद्याला सुती सजावटीची साडी गुंडाळा ज्यामुळे खोली वेगळी आणि उजळ दिसेल ते सुद्धा जास्त वेळ न घालवता.

 

  • तोरण

Source: blogspot

 

आपल्या घराच्या दरवाज्याला तोरण लागलं की कळत नकळत घरात प्रवेश करतांना अगदी प्रसन्न वाटतं. पारंपरिक दृष्ट्या बघायचं झालं तर आंब्याची पानं अर्थातच तुमच्या कामाची ठरतील आणि पारंपरिक दृष्ट्या लक्षात घेऊन सुद्धा जर तुम्हाला घराला मॉडर्न लुक द्यायचा असेल तर तुम्ही कृत्रिम तोरणं देखील विकत घेऊन दरवाज्यात लावू शकता जे बाजारात अगदी कमी दरात उपलब्ध आहेत.

 

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, दिवाळी म्हणजे उत्साहाचा सण. दिवाळी म्हणजे आपुलकीचा, आपल्या माणसांचा सण. असा हा दिवाळीचा सण तुमच्या व तुमच्या परिवाराच्या आयुष्यात आनंद, सुख व समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्हाला वरील दिलेले कुठले सजावटीचे प्रकार आपल्याला घरी करायला आवडतील हे आम्हाला खालील दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा!
image-description
report Report this post