इंडियन आयडॉल मराठी मध्ये पण दिसला स्त्रियांचा "जलवा!"

7 minute
Read

Highlights जगमान्य आणि संपूर्ण जगामध्ये ज्या कार्यक्रमाने लोकांची मनं जिंकली असा कार्यक्रम पहिल्यांदाच कुठल्या तरी प्रादेशिक भाषेत होणार आहे आणि ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आणि मराठी भाषेत. त्या कार्यक्रमाचं नाव आहे, "इंडियन आयडॉल मराठी."

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

जगमान्य आणि संपूर्ण जगामध्ये ज्या कार्यक्रमाने लोकांची मनं जिंकली असा कार्यक्रम पहिल्यांदाच कुठल्या तरी प्रादेशिक भाषेत होणार आहे आणि ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आणि मराठी भाषेत. त्या कार्यक्रमाचं नाव आहे, "इंडियन आयडॉल मराठी." पण गाण्याची आवड असलेल्या रसिकप्रेक्षकांसाठी अजून एक आनंदाची बाब म्हणजे या रिऍलिटी शोचे जजेस.

नटरंग, सैराट, जाऊ द्या न बाळासाहेब, अग्नीपथ, झिरो आणि या सारख्या कित्येक अजरामर आणि हिट चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक, नॅशनल अवॉर्ड विजेते अजय-अतुल. ज्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण भारतवर्षात आणि अवघ्या जगात त्यांच्या स्वरांची आणि संगीताची जादू दाखवली, ती जोडी पुन्हा एकदा इंडियन आयडॉल मराठी या कार्यक्रमाचे जजेस या नात्याने आपल्या समोर येणार आहे.

अजय-अतुल या जोडी सोबत साथ द्यायला असणार आहे दिल दोस्ती दुनियादारी फेम आणि सिंगिंग स्टार २०२० या सोनी मराठीवरच्या रिऍलिटी शोची विजेती स्वानंदी टिकेकर. स्वानंदी या शोची होस्ट आहे. त्यामुळे अजय-अतुल आणि स्वानंदी हे त्रिकुट मिळून नक्कीच धमाल करतील यात काहीच वावगं नाही. त्याच सोबत रसिकाप्रक्षकांचं देखील तुफान मनोरंजन होणार आहे.

२२ नोव्हेंबर २०२१ रोजी या रिऍलिटी शोचा पहिला ऑडिशनिंग एपिसोड टेलिकास्ट झाला. ऑडिशनिंग राऊंडला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे अजय-अतुल सोबतच नॅशनल अवॉर्ड विजेती बेला शेंडेला देखील परीक्षक म्हणून बोलावलं होतं. कोव्हिड - १९ च्या महामारीमुळे सगळ्या प्रार्थमिक ऑडिशन्स या virtual पदधतीने घेतल्या गेल्या आणि मग त्यातून काही निवडक लोकांना physical ऑडिशन्स साठी बोलवण्यात आलं. 

त्यात सर्वप्रथम आपलं दर्जेदार गाणं सादर करायला आली होती नालासोपारा येथून श्वेता संजय दांडेकर. इयत्ता दहावीत असलेल्या या मुलीने जजेसला हक्काबक्का करून सोडलं. या मुलीची विशेष बाब म्हणजे, ऑडिशन देताना ती शालेय वेशात आली होती ज्यावर जजेस ने देखील तिची गम्मत केली. श्वेता हिने काठी न घोंगडं हे गाणं गायलं ज्यासाठी तिला गोल्डन तिकीट देखील मिळालं. खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही पाहू शकता याची एक झलक!

त्यानंतर आपल्या स्वराभिषेकानी जजेसला देखील जिने मंत्रमुग्ध केलं, ती म्हणजे अवघी १४ वर्षांची आम्रपाली पगारे. तिच्या बरोबर तिचे वडील गौतम पगारे जे नांदूर या गावात शेत मजुरीचं काम करतात ते देखील आले होते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमुळे तिला गाण्याचं कधी शिक्षण देखील नाही घेता आलं. पण संगीतवारचं अफाट प्रेम आणि गाणं शिकण्याची जिद्द याच्या भरवश्यावर ती मोबाईल मधून गाणं शिकली आणि ऐकून ऐकूनच रियाझ ही केला. तिचं स्वप्न आहे कि ती बाकी मोठ्या गायिकांसारखी प्लेबॅक सिंगर व्हावी. या कार्क्रमाच्या ऑडिशनसाठी देखील तिच्या शाळेतल्या सरांनी त्यांना आर्थिक मदत केली, ज्यामुळे ती आणि तिचे वडील गावावरून ऑडिशनसाठी येऊ शकले. आम्रपाली हिने सख्या रे घायाळ मी हे गाणं गाऊन जजेसला आणि रसिकप्रेक्षकांना खऱ्या अर्थाने घायाळ केलं. खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही पाहू शकता याची एक झलक!

हा रिऍलिटी शो मराठी सारख्या प्रादेशिक भाषेत जरी येत असला तरी यात फक्त मराठी बोली भाषेतल्या लोकांनीच उपस्थिती लावली असं नाही. लॅरीसा रॉक अल्मेडा या मुलीने देखील ऑडिशनला हजेरी लावली आणि ते सुद्धा अगदी मराठमोळ्या साडी वेशात. तिने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटलं गोऱ्या गोऱ्या गालावरी हे गाणं गायलं. ज्याचं संगीत दिग्दर्शन अजय-अतुल यांनी केलं होतं आणि ते सुमधुर आवाजात गायलं होतं योगिता गोडबोले आणि प्राजक्ता रानडे यांनी.

वकील मंडळी फक्त बोलण्यातच तरबेज नसतात तर गायन क्षेत्रात देखील त्यांचा हात कोणी धरू नाही शकत हे सिद्ध करून दाखवलं अद्वैता लोणकर पेठे हिने. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या अकल्पनीय संगीत दिग्दर्शनातून अस्तित्वात आलेलं आणि The Queen of Indipop या पदवीने प्रसिद्ध आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजाने अजर अमर झालेलं गाणं म्हणजे तरुण आहे रात्र अजुनी हे गाणं अद्वैता गायलं.

या नंतर जिच्या गाण्याला स्वयं अजय गोगावले यांची साथ लाभली, ती स्पर्धक म्हणजे अश्विनी लक्ष्मण मिठे. अश्विनी ही मूळची जालन्याची परंतु गाण्याच्या तालमी करीत ती तिच्या संपूर्ण परिवारा सोबत आळंदीला स्थायिक झाली. अश्विनीचे वडील हे कीर्तनकार, त्यामुळे संगीताचे संस्कार हे तिच्यावर अगदी कोवळ्या वयापासूनच झाले. तिने छबीदार छबी हे गाणं गायलं. या गाण्यामध्ये बऱ्याच जागी मेल व्हॉइस आहे जो ती गात असतांना खुद्द अजय गोगावले यांनी दिला आणि ते गात असतांना त्यांना मजा देखील फार येत होती. खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही पाहू शकता याची एक झलक!

स्त्रियांबरोबरच पुरुष मंडळी देखील ऑडिशन्स साठी आली होती. परंतु इंडियन आयडॉल मराठी या सारख्या मोठ्या मंचावर इतक्या प्रचंड संख्येने स्त्रियांचा समावेश पाहून तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही जर आधीचे एपिसोडस मिस केले असतील तरी काळजी करू नका. सोनी लिव्ह या अँप वर हे सगळे एपिसोडस उपलब्ध आहेत. तुम्ही कधी पण जाऊ त्यांचा आस्वाद घेऊ शकता. त्याच सोबत दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वाजता हाच कार्यंक्रम तुम्ही सोनी मराठी या चॅनेल वर लाईव्ह देखील बघू शकता!

 

Logged in user's profile picture




इंडियन आयडॉल मराठीचे जज कोण आहेत?
इंडियन आयडॉल मराठीचे जज नटरंग, सैराट, जाऊ द्या न बाळासाहेब, अग्नीपथ, झिरो आणि या सारख्या कित्येक अजरामर आणि हिट चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक, नॅशनल अवॉर्ड विजेते अजय-अतुल आहेत
इंडियन आयडॉल मराठीचे जज कोण आहेत?
इंडियन आयडॉल मराठीचे जज नटरंग, सैराट, जाऊ द्या न बाळासाहेब, अग्नीपथ, झिरो आणि या सारख्या कित्येक अजरामर आणि हिट चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक, नॅशनल अवॉर्ड विजेते अजय-अतुल आहेत