Nine Rasa: जगातील पाहिलं नाटकांसाठीचं स्वतंत्र OTT प्लॅटफॉर्म

12 minute
Read

Highlights अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता श्रेयस तळपदे याने याच वर्षी एप्रिल महिन्यात "Nine Rasa" या OTT प्लॅटफॉर्मचा श्रीगणेशा केला. "Nine Rasa" हे नाटकांसाठीचं जगातील सगळ्यात पाहिलं OTT प्लॅटफॉर्म आहे. हिंदी, मराठी आणि गुजराती या भाषांमधील बरीच नाटकं यावर उपलब्ध आहे.

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

आपल्या महाराष्ट्रात मराठी कला क्षेत्राला दैवी देणगी लाभली आहे. बालगंधर्व, अण्णासाहेब किर्लोस्कर, विजया मेहता, पु. ल. देशपांडे, वसंतराव आणि अजून नावं घेऊ तितकी कमी पडतील. या पैकी काही हयात आहेत आणि काही कालवश, पण प्रत्येकांनी त्यांचा काळ हा गाजवलाच. आज आपण सिनेमा बघू शकतो ही सुद्धा एका मराठी माणसाची कृपा. पण सगळ्यात पहिले लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं तर रंगभूमीवर सादर केलेल्या नाटकांनी. बालगंधर्वांपासून तर बालगंधर्वांची भूमिका करण्याऱ्या सुबोध भावे पर्यंत नाटकाप्रती लोकांचं प्रेम हे एखाद्या चंद्रकोरासारखं वाढतच गेलं आहे.

 

परंतु कोरोना आला आणि ज्या नाट्यगृयहासमोर "housefull" अशी पाटी लागायची, तिथेच आता "house closed" अशी पाटी दिसते. कलाकार आणि रसिकप्रेक्षक सगळेच घरी बंधिस्त झाले. सिनेमा, वेब सिरीज हे सगळं जरी प्रेक्षकांसाठी OTT प्लेटफ्रॉम्स द्वारे उपलब्ध होते तरी नाटयगृह बंद असल्यामुळे नाटकवेड्यांना असली मुभा नव्हती. असाच एक नाटकवेडा आणि मराठी कलाकार ज्याने हिंदी सिनेसृष्टीत देखील आपलं नाव गाजवलं, असा एकमेव अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता श्रेयस तळपदे याने याच वर्षी एप्रिल महिन्यात "Nine Rasa" या OTT प्लॅटफॉर्मचा श्रीगणेशा केला.

 

"Nine Rasa" हे नाटकांसाठीचं जगातील सगळ्यात पाहिलं OTT प्लॅटफॉर्म आहे. हिंदी, मराठी आणि गुजराती या भाषांमधील बरीच नाटकं यावर उपलब्ध आहे. यापैकीच काही नाटकांबद्दलची माहिती आणि त्यावर उपलब्ध असलेल्या कन्टेन्ट बाबत आपण खालील ब्लॉग मध्ये सविस्तर पणे बघणार आहोत.

 

  • पश्मिना

पश्मिना

Source: ninerasa

दिग्दर्शक रसिका आगाशे यांच्या नेतृत्वाखाली मनीष चौधरी यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर पाउल ठेवलं. त्यांच्या या कमबॅकच्या बाबतीत सांगत असतांना, मनीष म्हणाले, "लेखिका मृणाल माथूर नाटकाच्या माध्यमातून संवेदनशील नात्याच्या गुंतागुंतीच्या भावना विणल्या आणि दिग्दर्शक रसिका आगाशे तिच्या दिग्दर्शन कौशल्याने या नाटकाला अक्षरशः रंगभूमीवर जिवंत केलं. 

मनीष यांनी एका वडिलांची आणि नवऱ्याची भूमिका साकारली आहे आणि मनात दडलेल्या काही जुन्या आठवणींभोवती हे नाटक फिरतं. हे नाटक मृणाल ठाकूर यांनी हिंदी मध्ये लिहिलं असून यात मनीष चौधरी, आकांशा विश्वकर्मा, अनामिका तिवारी, शौर्य शंकर, परमवीर सिंग, मनजीत यादव आणि यासिर खान या सारख्या कलाकारांची मांदियाळी आहे.

 

  • कफन

कफन

Source: ninerasa

कफन म्हणजे प्रत्येक जीवनाचा शेवट किंबहुना मृत्यू याचा नाट्यमय प्रतिशब्द म्हणजे कफन. विधी पद्धतीने दफन किंवा अंत्यसंस्कार करणे ही सर्वांची स्वाभाविक इच्छा असते, परंतु न पचवता येणारं वास्तव हे आहे की काही लोक इतके भाग्यवान नाहीत. प्रेमचंद यांनी लिहिलेली, रसिका आगाशे यांचं दिग्दर्शन आणि राजेंद्र गुप्ता यांनी कथन केलेली एक अश्रू अनावर करणारी कथा म्हणजे कफन. 

हे नाटक दाखवतं की माणूस किती निर्दयी असू शकतो आणि स्वत: च्या समाधानासाठी आपली सचोटी कशी विकू शकतो. अशा अमानुष वागणुकीच्या परिणामामुळे प्राणघातक जखमा होतात ज्या आयुष्यभर काळजावर कोरल्या जातात अश्याच काही जखमांची ही कथा आहे.

 

  • युरेका युरेका

युरेका युरेका

Source: ninerasa

साधारणतः कोणी जर तुम्हाला प्रश्न केला की तू वेडा आहेस का? आणि जर तुम्ही हो म्हणालात, तर समजून घ्या तुम्ही वेडे नाही आहात आणि त्याच प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही नाही असं दिलं, तर समजून घ्या तुम्ही आहात. कोणालाही वेडा होऊ इच्छित नसतं परंतु दुर्दैवाने प्रत्येकजण त्यांच्या स्वत: च्या मार्गाने वेडा असतो. वेडेपणा मानसिक किंवा शारीरिक असू शकतो. 

प्रत्येक माणूस वेडा आहे आणि काही आपल्या प्रियजनांना इजा करण्यापूर्वी क्षणाचा विचारही करत नाहीत. युरेका युरेका ही एक एकांकिका आहे जी पूर्णवेळ, वेडेपणा या विषयाच्या भोवती फिरते. प्रदीप राणे यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे नाटक. पुष्कर श्रोत्री सुलेखा तळवलकर आणि विजय केंकरे हे प्रमुख भूमिकेत आहेत. असं हे नाटक बघणाऱ्याला डोळ्याची पापणी लवण्याची सुद्धा संधी देत नाही.

 

  • पीएल का एसआरके

पीएल का एसआरके

Source: ninerasa

लहानपणापासून आपल्याला एक कायमच शिकवण्यात आली आहे, ती म्हणजे "सर्व भारतीय माझे भाऊ आणि बहिणी आहेत". या वाक्याचा बऱ्याच जणांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर कायमचा प्रभाव पडला आहे. पण काही विसंगती आहेत. राजकीय असो किंवा इतर कोणतेही कारण असो, स्थलांतराला अनेक अडथळ्यांमधून जावे लागते. हे नाटक साध्या परंतु प्रभावी विनोदाच्या पद्धतीने त्याच गोष्टींचा शोध घेते. पांडुरंग लुकटुके (पीएल) हा एक मध्यमवर्गीय, स्वभावाने अगदी शांत, स्थानिक विद्यार्थी आहे ज्याने स्वत: साठी एक साधा आणि वास्तविक प्रवासाचा आराखडा तयार केला आहे तर राघव खन्ना (एसआरके) हा महत्वाकांक्षी विद्यार्थी आहे जो मूळचा झाशीचा आहे. हे नाटक आपल्याला पांडुरंग आणि राघवच्या दृष्टिकोनातून “मराठी विरुद्ध भैया” च्या भांडणांमधून घेऊन जातं.

त्याच्या संगोपनामुळे पांडुरंगला मोठी स्वप्ने पाहणे अवघड वाटते तर राघव ही अशी व्यक्ती आहे जी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी राघव मराठी शिकतो तर पांडुरंगला साधे जीवन रक्षण कौशल्य शिकणे कठीण वाटते. स्थलांतरित विरुद्ध स्थलांतरित हा संवेदनशील विषय या नाटकात विनोदी पद्धतीने शोधला गेला आहे. पीएल का एसआरके च्या वादविवादात उत्प्रेरक म्हणून काम करणाऱ्या पात्रांना अदिती आणि बंडू सपोर्ट करत आहेत.

 

  • साहेबजी डार्लिंग

साहेबजी डार्लिंग

Source: ninerasa

गुलुबाई आणि फेरुबाई, दोन पारशी बहिणी ज्या सगळ्याच गोष्टी अगदी निर्दोषपणे आणि निरागसतेने करतात आणि आपल्या वडिलोपार्जित घराचा तळघर लहान कब्रस्तानात बदलतात! त्यांचा हा नम्र, मोहक आणि निगरागस स्वभाव असल्यामुळे ते सर्वांना आवडतात. त्यांच्या हद्दीतील पोलिसांना सुद्धा त्यांचा निरागस नम्र स्वभाव आवडतो त्यामुळे अगदी [पोलिसांच्या देखील त्या आवडत्या असतात. 

पण एक दिवस अचानक त्यांच्या बराच काळ हरवलेला कुख्यात पुतण्या बेहराम त्या घरात मृतदेह लपवण्याच्या हेतूने दिसतो. त्या नंतर नेमकं काय होतं यावर हे नाटक आधारित आहे. ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी लिखित आणि विशाखा सुभेदार, संदीप पाठक, वैष्णवी प्रशांत, पद्मनाभ बिंद, कौशिक कुळकर्णी, महेंद्र वाळुंज, विक्रांत ठाकर, आलोक राजवाडे, जितेंद्र लाड आणि शार्दुल सराफ अश्या विद्वान आणि उत्तम नटांनी सजलेलं हे नाटक साहेबजी डार्लिंगच तुमच्या डोळ्यात पाणी येईस्तोवर तुम्हाला हसवल्याशिवाय राहणार नाही.

 

  • प्रेम छे के गेम छे

प्रेम छे के गेम छे

Source: ninerasa

"Nine Rasa" या OTT प्लॅटफॉमर वर मराठी आणि हिंदी सोबतच गुजराती नाटकांचा सुद्धा आनंद तुम्हाला घेता येईल आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे "प्रेम छे के गेम छे" हे नाटक आहे. ही गुजराती एकांकिका "प्रेम छे के गेम छे" आयुष्याच्या दोन ही बाजूंचा शोध घेते-प्रेम आणि आयुष्य. हे नाटक अप्रत्यक्षरित्या विनंती करतं की सध्याच्या काळात खऱ्या प्रेमाचे काही मूल्य नाही आणि फक्त पैशाचे महत्त्व आहे. रोहन श्रद्धाच्या प्रेमात आहे आणि तिला प्रपोज करण्यासाठी त्याने तिला एका बागेत आमंत्रित केले आहे. ती येताच रोहनने तिला प्रपोज केले.

श्रद्धा तिचे मत स्पष्ट करते आणि तिचा भूतकाळातील अनुभव आणि एक आदर्श प्रियकराची संकल्पना शेअर करते. रोहन श्रद्धाला राजी करतो आणि शेवटी तिला तिच्याबद्दलच्या भावना सांगतो. श्रद्धा तिचा वेळ घेते आणि त्याचा प्रस्ताव स्वीकारते. पण त्यानंतर काय श्रद्धाला धक्का बसतो. हे सर्व असताना रोहनच्या मनात एक वेगळा हेतू होता आणि श्रद्धाला प्रपोज करणे हा त्या बाह्य हेतूचाच एक भाग होता आणि इथून या नाटकाला अचानक एक वेगळं वळण येतं रसिकप्रेक्षकांना त्यांच्या खुर्चीत खिळवून ठेवणारं हे नाटक आहे.

 

  • हारुस मारुस

हारुस मारुस

Source: ninerasa

हारूस मारुसच्या माध्यमातून मानवाच्या विचित्र स्वभावाचे अनावरण झाले आहे. आपण अशा काळात जगत आहोत जिथे मानवी जीवनाला किंमत नाही. आपला अस्तित्वाचा दैनंदिन संघर्ष उंदीरांच्या जीवनापेक्षा अगदी कनिष्ठ आहे. आपल्या समाजातील वाढती असमानता लोकसंख्येच्या मोठ्या भागाला उपासमारीच्या मूक महामारीकडे भाग पाडते. दुःख केवळ अन्नापुरते मर्यादित नाही तर मोकळेपणाने जगण्याचा अधिकार देखील आहे.

हे म्युझिकल हिंदी नाटक एक व्यंग आहे जेथे लेखक मुकेश नेमा अक्षरशः अन्नाच्या शोधात उंदरांचा जमाव तयार करतात आणि मानवी भाषा बोलणारे दोन उंदीर असतात. विनोदी उपहासात्मक पद्धतीने, हे नाटक आपल्याला गरिबीच्या क्षेत्रात घेऊन जाते जिथे गरीबीने ग्रस्त माणसाला उंदीरांचे जीवन निवडण्यास भाग पाडले जाते. संयोगात, उंदीर गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यात मदत करतात.

 

  • अतिथी देवो भव

अतिथी देवो भव

Source: ninerasa

अतिथी देवो भवाचा शाब्दिक अर्थ आहे "अतिथी देवाच्या समतुल्य आहेत". परंतु या प्रकरणात यजमानाने हे गांभीर्याने घेतलं आहे आणि त्याच्या पाहुण्याला देवाला भेटवण्याची सर्व योजना झाली आहे. पळशीकर, एक मध्यमवयीन, प्रस्थापित आणि श्रीमंत लेखक जेव्हा त्याच्या पत्नीच्या प्रियकराला जो एक प्रवासी व्यवसायाचा तरुण मालक आहे, ज्याचं नाव आहे शेलार.

पळशीकर शेलारला त्याच्या घरी आमंत्रित करतो जेव्हा त्याची पत्नी आसपास नसते, त्यावेळी असे दिसून येते की यामागे त्याचे काही छुपे अजेंडे आहेत. पळशीकर ज्याचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे तो शेलारला बुद्धीच्या खेळात हाताळण्याचा प्रयत्न करतो आणि एक निष्पाप शेलार श्रीमंत होण्याच्या प्रलोभनाला बळी पडतो. हे नाटक अनुभवी दिग्दर्शक विजय केंकरे  यांनी दिग्दर्शित केलं आहे. जर तुम्हाला तर थ्रिलर विषय आवडतो तर या 1980 च्या सस्पेन्स थ्रिलर मराठी नाटकाचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्यायला हवा.

 

याच सोबत, ए लाडकी, The two of us आणि Pause ही नाटकं सुद्धा "Nine Rasa" या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त विविध प्रकारचे पॉडकास्टस सुद्धा या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे ज्याचा आस्वाद तुम्ही सगळेच घेऊ शकता फक्त Nine Rasa या OTT प्लॅटफॉर्मचं प्रीमियम सब्स्क्रिप्टिव घेऊन.नाट्यवेड्यांसाठी तर हे अप्रतिम प्लॅटफॉर्म आहेच पण ज्यांना नाटक काय आहे हे समजायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा प्लॅटफॉर्म म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. सध्या आपण सगळे आपापल्या घरी आहोत आणि घरी तुमच्या मनोरंजना करिता ही नाटकांची यादी आणि या प्लॅटफॉर्म बद्दलची माहिती तुमच्या कामात येईल आणि यात नमूद केलेली सगळी नाटकं तुम्हाला आवडतील ही आशा!

 

Logged in user's profile picture




जगातील पाहिलं नाटकांसाठीचं स्वतंत्र OTT प्लॅटफॉर्म कोणते आहे?
"Nine Rasa" हे नाटकांसाठीचं जगातील सगळ्यात पाहिलं OTT प्लॅटफॉर्म आहे
Nine Rasa OTT प्लॅटफॉर्म मध्ये कोणते भाषेची नाटकं उपलब्ध आहे.
हिंदी, मराठी आणि गुजराती या भाषांमधील बरीच नाटकं यावर उपलब्ध आहे.