पीसीओएस आणि गर्भधारणापीसीओएस म्हणजे काय आणि त्याचा गर्भधारणेवर कसा परिणाम होतो?

9 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this blog in English here)

पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) हा एक हार्मोनल आजार आहे जो बाळंतपणाच्या वयाच्या महिलांमध्ये अत्यंत सामान्य बनला आहे. हा आजार अत्यंत सामान्य आहे कारण 5 पैकी 1 भारतीय महिलांमध्ये तो दिसून येतो. ही अशी स्थिती आहे ज्यात एखाद्या महिलेचे अंडाशय जास्त प्रमाणात पुरुष हार्मोन्स तयार करतात. जास्त पुरुष संप्रेरक स्रावामुळे अंडी परिपक्व होत नाहीत म्हणून ओव्हुलेशन होत नाही. अंडी पूर्णपणे परिपक्व न होण्याचे आणखी एक कारण म्हणजे इन्सुलिन प्रतिरोध. तसेच, पॉलीसिस्टिक म्हणजे एकापेक्षा अधिक सिस्ट (गाठी), पीसीओएस ही अशी स्थिती आहे जिथे महिलेच्या अंडाशयात एकापेक्षा अधिक ‘सिस्ट’ विकसित होतात. ओव्हुलेशन नियमितपणे होत नसल्यामुळे, पीसीओएस बऱ्याचदा काही स्त्रियांच्या मासिक पाळीत व्यत्यय आणतो ज्यामुळे गर्भवती होण्यास अडचण येते आणि कधीकधी वंध्यत्व येते.

पीसीओएसची लक्षणे:

पीसीओएसची लक्षणे सहज कळण्याजोगी असली तरी, कधीकधी पीसीओएस असलेल्या स्त्रियांना गर्भधारणेचा प्रयत्न करेपर्यंत हे लक्षात येत नाही की त्यांना पीसीओएस आहे.

पीसीओएसची सामान्य लक्षणे अशी आहेत:

  1. अनियमित मासिक पाळी
  2. मासिक पाळीचा अभाव
  3. मासिक पाळीदरम्यान खूप जास्त रक्तस्राव
  4. हिर्सुटिझम किंवा चेहरा, छाती, पोट आणि पाठीवर केसांची जास्त वाढ.
  5. हार्मोनल अॅक्ने
  6. टाळूवर केस पातळ होणे
  7. ओबेसिटी
  8. डायबिटीज
  9. थायरॉइड
  10. वंध्यत्व
  11. थकवा
  12. अँगझायटी आणि डिप्रेशन
  13. मानसिक अवस्थेतील चढउतार
  14. हायपरपिग्मेंटेशन
  15. शरीराच्या ‘पेल्विक’ या भागात वेदना

पीसीओएसची ही सर्वात सामान्य लक्षणे आहेत. काही स्त्रियांना हे समजत नाही की त्यांना पीसीओएस आहे कारण त्यांच्यात छुपी लक्षणे असू शकतात.

पीसीओएस आणि गर्भधारणा

"मी पीसीओएस असताना गर्भवती होऊ शकते का" हा पीसीओएस असलेल्या महिलांनी इंटरनेटवर विचारलेल्या सर्वात सामान्य प्रश्नांपैकी एक आहे. आणि या प्रश्नाचे एक सोपे उत्तर -होय, पीसीओएस असणे आणि तरीही गर्भवती होणे नक्कीच शक्य आहे. पण हे खरे आहे की पीसीओएस सह गर्भवती होणे अन्यथा गर्भवती होण्यापेक्षा अधिक कठीण आहे. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये ओव्हुलेशन नियमितपणे होत नसल्यामुळे, त्यांची मासिक पाळी बऱ्याचदा चुकते ज्यामुळे नैसर्गिकरीत्या गर्भवती होण्यास त्रास होतो. तसेच, पीसीओएस अंड्याच्या गुणवत्तेवर देखील परिणाम करते, जे पीसीओएस सह गर्भधारणा होणे कठीण असण्याचे आणखी एक कारण आहे. परंतु सुदैवाने, वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीमुळे पीसीओएस आणि नैसर्गिकरीत्या गर्भवती होणे तुमच्यासाठी शक्य नसल्यास तुम्ही बरेच पर्याय शोधू शकता.

पीसीओएस सह गर्भवती कसे व्हावे:

आपल्या मासिक पाळीची नोंद करून ठेवा:

हा पर्याय त्या महिलांसाठी आहे ज्यांना नियमितपणे मासिक पाळी येते. काही स्त्रियांना जरी पीसीओएस असला, तरी त्यांना कोणत्याही त्रासाशिवाय दरमहा मासिक मासिक पाळी वेळेवर येते. त्यांच्यात पीसीओएसकडे घेऊन जाणारी इतर लक्षणे असू शकतात परंतु ‘अनियमित मासिक पाळी’ हे त्यापैकी एक लक्षण नसते. अशा प्रकारच्या केसेसमध्य गर्भवती होण्याची शक्यता जास्त असते कारण गर्भवती होणे हे मुख्यतः आपल्या ओव्हुलेशनच्या तारखांवर अवलंबून असल्याने स्त्रिया कधी ओव्हुलेट होतात याची नोंद ठेवणे त्यांच्यासाठी सोपे असते. आपल्या प्रजननाच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर अशा महिन्यातील काळावर लक्ष ठेवा आणि आपल्या ओव्हुलेशनच्या दिवसात समागम करण्याचा प्रयत्न करा.

औषधे:

डॉक्टर बहुतेकदा ओव्हुलेशनसाठी औषधे लिहून देतात. जेव्हा गर्भधारणेचा विचार केला जातो तेव्हा जन्म नियंत्रणांव्यतिरिक्त इतर ओव्हुलेशन संबंधित औषधे खरोखर प्रभावी असतात. जन्म नियंत्रण करणारी औषधे तुमची मासिक पाळी नियमितपणे सुरु करण्यात मदत करू शकतात पण गर्भवती होण्यास मदत करणार नाहीत. एक अशी प्रक्रिया आहे जी तुम्ही गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत असल्यास तुमचे डॉक्टर तुम्हाला सुचवू शकतात.

आयव्हीएफ:

पीसीओएस आणि आयव्हीएफ गर्भधारणा हा बऱ्याच स्त्रियांच्या जीवनात आशेचा किरण असतो. आयव्हीएफमुळे तुमची गर्भवती होण्याची शक्यता वाढते आणि ही पद्धत दिवसेंदिवस अधिकाधिक सामान्य होत आहे. आयव्हीएफ म्हणजे ‘इन्व्हिट्रो फर्टिलायझेशन’आणि जेव्हा गर्भधारणेत अडचण येते तेव्हा ते खूप प्रभावी असते. आयव्हीएफ ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे एखाद्या महिलेच्या अंडाशयातील परिपक्व अंडी गोळा केली जातात आणि नंतर तिच्या शरीराबाहेर शुक्राणूंनी फलित केली जातात.

आय यू आय:

आपण पीसीओएस सह गर्भवती होण्याचा विचार करत असल्यास ज्याचा विचार करू शकता असा ‘आय यू आय’ हा आणखी एक यशस्वी पर्याय आहे. ‘आय यू आय’ म्हणजे इंट्रा यूटरिन इनसेमिनेशन ज्यासाठी शुक्राणूंचा संग्रह करणे आवश्यक असते आणि थेट तुमच्या गर्भाशयात अंड्यांच्या जवळ तुमच्या ओव्हुलेशनच्या दिवसात हे शुक्राणू सोडले जातात. ही पद्धत प्रभावी आहे कारण शुक्राणू अंड्यांच्या शक्य तितक्या जवळ सोडले जातात ज्यामुळे फलन होण्याची शक्यता वाढते.

आपण गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपण इतरही अनेक वैद्यकीय मार्गांचा अवलंब करू शकता.

पीसीओएस सह गर्भवती होण्याचे नैसर्गिक मार्ग:

पीसीओएस सह नैसर्गिकरीत्या गर्भवती होणे हे एक मिथक नाही. बऱ्याच स्त्रिया पीसीओएस असतानाही नैसर्गिकरीत्या गर्भवती झाल्या आहेत आणि त्यांची निरोगी गर्भधारणा आणि प्रसूती झाली आहे. तुम्ही गर्भवती होण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यासाठी बरेच नैसर्गिक मार्ग शोधू शकता:

वजन कमी करणे:

आपण गर्भवती होऊ इच्छित असल्यास वजन कमी करणे हा पीसीओएस आणि गर्भधारणा यातील सर्वात प्रभावी आणि उपयुक्त मार्ग आहे. जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे गर्भवती होण्याची शक्यता कमी होऊ शकते. वजन कमी करणे हे तुमच्या इन्सुलिन प्रतिरोध आणि पुरुष संप्रेरकांची अत्यधिक उपस्थिती या लक्षणांमध्ये देखील मदत करू शकते.

चांगला आहार घेणे:

चांगला आहार आणि योग्य पोषण घेतल्यास पीसीओएस सह गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत असलेल्या स्त्रियांना खरोखर मदत होऊ शकते. सर्व पोषक द्रव्यांसह संतुलित आहार घेतल्यास इन्सुलिन प्रतिरोध यात मदत होते. प्रक्रिया केलेले आणि साखरयुक्त अन्न शक्य तितके टाळण्याचा प्रयत्न करा. अँटी- इनफ्लेमेटरी (दाह निर्माण न करणारा आहार) आहाराचे अनुसरण करणे देखील पीसीओएससाठी खरोखर उपयुक्त ठरू शकते.

ताणतणावाचे व्यवस्थापन करणे:

ताणतणावाचे व्यवस्थापन करणे हा पीसीओएस सह गर्भवती होण्याचा आणखी एक मार्ग आहे. हे पुन्हा इन्सुलिन प्रतिरोध आणि हार्मोन असंतुलनाशी जोडले गेले आहे. ताणतणाव व्यवस्थापित केल्याने पुरुष संप्रेरक कमी होऊ शकते आणि इन्सुलिनचा प्रतिकार चांगला होऊ शकतो.

नियमित व्यायाम करणे :

नियमितपणे व्यायाम करणे हा जीवनशैलीतील एक सोपा बदल आहे जो तुमची गर्भधारणा-प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात घडवून आणू शकता. नियमित व्यायाम केल्याने वजन कमी होऊ शकते जे मग गर्भधारणेस मदत करते.

पुरेशी झोप घेणे :

झोपेचा थेट संबंध हार्मोन्सच्या संतुलनाशी जोडला जातो. पुरेशी झोप आणि रात्रीची चांगली झोप यामुळे गर्भवती होण्याची शक्यता वाढू शकते कारण यामुळे पुरुष हार्मोन्स कमी होण्यास आणि हार्मोनल असंतुलन सुधारण्यास मदत होऊ शकते.

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture