चॉकलेट रेसिपींनी गोड करा व्हेलेंटाईन डे

6 minute
Read

Highlights 'व्हेलेंटाईन डे' निमित्त तुम्ही नक्की काहीतरी खास करणार असे ठरवले असेल. व्हेलेंटाईन डे आणि चॉकलेट यांचे अतूट नाते आहे. अगदी एका नाण्याच्या दोन बाजू असंही म्हटलं तरी चालेल. आता आपल्या प्रेमाच्या आणि लाडक्या व्यक्तीला फक्त चॉकलेट देण्याऐवजी तुम्ही स्वतः काही खास रेसिपी तयार केली तर ? अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात या रेसिपी तयार होतात. चला तर मग विचार कसला करताय चॉकलेटपासून भन्नाट रेसिपी तयार करुया.

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

व्हेलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस.आपल्या आवडीच्या व्यक्तीसाठी काय खरेदी करु किंवा तिच्यासाठी काय करु असे आपल्याला सारखे वाटत असते.खरेदी तर आपण करत असतो पण धावपळ करुन घेण्यापेक्षा काहीतरी वेगळा बेत  आणण्यासाठी  आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. अगदी झटपट असा प्लॅन होऊ शकतो आणि त्यात एक वेगळी मजाही येऊ शकते. हा प्लॅन म्हणजे काय तर तुमच्या हाताने काही हटके रेसिपीज बनवायच्या आहेत. लक्षात ठेवा लोकांच्या हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो असे म्हटले जाते.आता रेसिपी म्हटल्यावर तुम्हाला टेन्शन यायला नको.आपण करणार आहोत चॉकलेट सँण्डवीच, जॅम सँण्डवीच आणि होममेड चॉकलेट ! तुम्ही म्हणाल तीन रेसिपी बाप रे ! ! किती वेळ लागेल? तुम्हाला सांगते अगदी पटकन या रेसिपी तयार होतात.

चॉकलेट आणि प्रेमाचे खूप जवळचे नाते आहे हे सर्वांनाच माहिती आहेच. चॉकलेट  प्रेमाचे  स्मृतिचिन्ह बनलंय असं म्हटल तरी चालेल.चॉकलेटमध्ये आनंदाची भावना निर्माण करणारे अनेक घटक असतात. म्हणून तर लहानमोठे सगळेजण आवडीने चॉकलेट खातात. चला आता रेसिपी करूया आधी होममेड चॉकलेट आधी करुन, नंतर चॉकलेट सँण्डवीच करुया.

होममेड चॉकलेटसाठी साहित्य

होममेड चॉकलेटसाठी साहित्य

• डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट

(डार्क चॉकलेटचे ३ तुकडे तर एक तुकडा मिल्क चॉकलेट)

• वाटीभर बदाम
• हार्ट आकाराचा साचा

बदाम भाजणे

कृती

1. चॉकलेटमध्ये जे बदाम घालणार आहोत ते थोडेसे भाजून घ्या. भाजलेले बदाम खायला खूप छान लागतात. कढई गॅसवर ठेवा. गॅसची आच मंद हवी आणि मंद आचेवर अगदी पाच ते सात मिनीटात बदाम भाजून घ्या.

वितळलेले चॉकलेट

2. आता डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट वितळवून घ्या. लक्षात ठेवा चॉकलेट कधी ही गॅसवर ठेवून वितळवू नका. एक भांड्यात पाणी घेवून त्यावर अजून एक भांडे ठेवा त्यात चॉकलेट घालून वितवळा.

3. वितळलेले चॉकलेट आता साच्यामध्ये घाला. सुरुवातीला अगदी थोडे चॉकलेट घाला. आता त्यात बदाम घाला आणि त्यावर पुन्हा चॉकलेट घाला. साचा भरुन घ्या. साचा फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी तो टॅप करुन घ्या म्हणजे एअर बबल असेल तर निघून जाईल. साचा १५ मिनिटे फ्रिजरमध्ये ठेवा आणि त्यानंतर फ्रिजमध्ये १५ मिनिटे ठेवा.

हार्टशेपमध्ये चॉकलेट

4. आता फ्रिजमधून साचा बाहेर काढा आणि आपले चॉकलेट काढून घ्या. पाहा हार्टशेपमध्ये किती मस्त चॉकलेट तयार झाले आहेत.

चॉकलेट आणि जॅम सँण्डवीच

ब्रेड, चॉकलेट सिरीप, मिक्स फ्रूट जॅम

साहित्य - ब्रेड, चॉकलेट सिरीप, मिक्स फ्रूट जॅम, हार्ट आकाराचे कटर,किसलेले चॉकलेट (सजावटीसाठी)

कृती

1. आपल्याला गोल आकाराचा ब्रेड हवा आहे. ब्रेडला गोल आकारात करण्यासाठी वाटीचा उपयोग करा. जर तुमच्याकडे गोल आकाराचा कटर असले तर त्याचा वापर तुम्ही करु शकता.

ब्रेडला गोल आकारात करत आहे

2. आता त्या गोल आकाराच्या ब्रेडवर हार्टशेपच्या कटरने हार्टचा आकार करून घ्या. आपल्याला जॅम आणि चॉकलेट असे दोन प्रकार करायचे आहेत म्हणून २ गोल आणि २ हार्ट शेपच्या आकाराचे स्लाईस घ्या. ब्रेडचे जे छोटे हार्ट आहेत त्याचा उपयोग सजावटीसाठी करता येवू शकतो.

3. गोल स्लाईसवर चॉकलेट सिरीप लावा आणि त्यावर हार्टच्या आकाराचा ब्रेड ठेवा. आता किसलेले चॉकलेट हार्ट शेपवर घालून सजावट करा यामुळे जास्त चॉकलेटचा आनंद घेता येईल.

4. अशा प्रकारे झटपट होणारे हार्टशेपच्या आकारातील चॉकलेट सँण्डवीच तयार आहे.

चॉकलेट सँण्डवीच

5. दुसऱ्या गोल ब्रेडला जॅम लावा आणि त्यावर हार्ट शेपचा ब्रेड ठेवा. जसे आपण चॉकलेट सँण्डविचसाठी केले आहे अगदी तसेच करायचे आहे. फक्त चॉकलेट सिरीप ऐवजी तुम्ही मिक्स फ्रुट जामचा वापर करणार आहात.तुम्हाला आवडत असेल तर त्यावरही जास्त जाम लावू शकता.

चॉकलेट सँण्डवीच

अशा प्रकारे आपले चॉकलेट आणि जॅम सँण्डवीच तयार झालेले आहेत.आता फ्रिजमधून चॉकलेट साचा बाहेर काढा. आपले चॉकलेट सुद्धा तयार आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे याची सजावट तुम्ही करु शकता. मग काय व्हेलेंटाईन डेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तयारीला लागा. झटपट चॉकलेट आणि जॅम सँण्डवीच तसेच होममेड चॉकलेट तयार करा. तुमच्या रेसिपी कशा झाल्या ते आम्हाला नक्की कळवा.

अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture

चॉकलेट रेसिपीसाठी साहित्यकाय आहे?

डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट

वाटीभर बदाम

हार्ट आकाराचा साचा

चॉकलेट आणि जॅम सॅण्डवीच साठी साहित्य काय आहे?

ब्रेड

चॉकलेट सिरीप

मिक्स फ्रूट जॅम

हार्ट आकाराचे कटर

हार्ट आकाराचे

कटर,किसलेले चॉकलेट (सजावटीसाठी)