मस्त चमचमीत घरगुती पिझ्झा सॉस रेसिपी

9 minute
Read

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this blog in English here)

घरच्या घरी अगदी परफेक्ट पिझ्झा सॉस बनवणे कठीण आहे? नाही, अजिबात नाही! घरच्या घरी अगदी परफेक्ट पिझ्झा बनवता यावा म्हणून जे टेक्श्चर असेलेले पिझ्झा सॉस आवश्यक असते ते ही मजेदार रेसिपी वापरून तुम्ही सहज बनवू शकता!

सॉससाठी लागणारे साहित्य

• ४ मध्यम आकाराचे टोमॅटो
• १८-२० लसणीच्या पाकळ्या
• १ बारीक चिरलेला कांदा
• २ डाव तेल
• चिली फ्लेक्स
• कोरडा (ड्राय) ओरेगॅनो (किंवा इटालियन सिझनिंग)
• कोरडी बेझिल
• २ मोठे चमचे टोमॅटो केचप
• १ लहान चमचा लाल तिखट/ ‘पाप्रिका’ पावडर
• चवीनुसार मीठ
• पाणी (आवश्यक असेल तेवढे)

सॉस बनवण्याची कृती

• आपण आधी सगळी तयारी करून घेऊ. लसूण चिरून घ्यायची किंवा पेस्ट करण्याची गरज नाही. फक्त पाकळ्या सोलून घ्या आणि त्या तशाच वापरा. कांदा एकतर बारीक चिरून किंवा मग मोठेमोठे तुकडे करून घ्यावा. टोमॅटो सुद्धा अगदी मोठेमोठे तुकडे ठेवून ओबडधोबड चिरून घ्या.
• आता पॅनमध्ये २-३ मोठे चमचे रिफाईंड तेल गरम करा. मी इथे 'एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल' वापरते पण तुम्ही सनफ्लॉवर, सोया किंवा इतर कोणतेही सौम्य स्वरूपाचे तेल वापरू शकता.

कापलेला कांदा आणि लसूण

• तेल गरम होऊ लागले, की त्यात बारीक चिरलेल्या कांद्यासोबत सोललेल्या लसणीच्या पाकळ्या टाका.
• कांदा नरम, गुलाबी होईपर्यंत किंवा २ मिनिटे परतून घ्या.

कापलेला कांदा आणि लसूण

• आता त्यात एक लहान चमचा कोरडी (ड्राय) बेझिल, एक लहान चमचा ड्राय ओरेगॅनो आणि एक लहान चमचा चिली फ्लेक्स टाका. हे सगळे मिश्रण नीट ढवळून घ्या आणि या सर्व साहित्याची चव तेलात मिसळावी म्हणून अंदाजे १ मिनिट शिजू द्या.

बेझिल, ड्राय ओरेगॅनो आणि  चिली फ्लेक्स  मिश्रण

• अंदाजे एक मिनिटानंतर त्यात टोमॅटोचे तुकडे घाला. टोमॅटोचा प्रत्येक तुकडा या तेलाने कव्हर होईल असे पाहा.
• नंतर लगेच चवीनुसार मीठ घाला. मी इथे एक लहान चमचा मीठ आणि चिमूटभर लाल तिखट घातले आहे.
• सगळे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून त्यावर झाकण ठेवा. मध्यम आचेवर ५ मिनिटे शिजवा आणि भांड्याच्या तळाला सॉस लागू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा.

बेझिल, ड्राय ओरेगॅनो आणि  चिली फ्लेक्स  मिश्रण

• अधूनमधून ढवळत असताना जर मिश्रण खूप कोरडे होत चालले आहे असे वाटले तर काही चमचे पाणी त्यात घालून वरून झाकण ठेवा.
• ५ मिनिटे झाली की झाकण काढा आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टोमॅटोवरची साले काढून टाकू शकता. आम्ही इथे ती साले तशीच ठेवली आहेत. त्याने आपल्या घरगुती पिझ्झा सॉसला एक वेगळीच भारतीय थाटाची चव येईल.

• तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ही साले काढण्याची स्टेप वगळून, टोमॅटो अगदी नरम होईपर्यंत शिजवू शकता. आता काविलथ्याने टोमॅटो दाबा आणि अगदी गुळगुळीत असे टेक्श्चर सॉसला येऊ द्या. आणखी १० मिनिटे हा सॉस शिजू द्या.
• आता, सॉसमध्ये पाणी जास्त वाटले तर झाकण काढून मोठ्या आचेवर सॉस २-३ मिनिटे शिजवू शकता.
• सॉसचे टेक्श्चर अगदी छान मनासारखे झाले की त्यात टोमॅटो केचप घालून आणखी एखादे मिनिट शिजवा.

• गॅस बंद करा आणि सॉस थंड होऊ द्या कारण आपण आणखी गुळगुळीत टेक्शचर मिळावे म्हणून हा सॉस मिक्सर-ग्राइंडर मध्ये आपण वाटून घेणार आहोत.
• तुम्हाला हवे असेल तर हा सॉस तुम्ही अगदी बारीक पेस्टसारखा वाटून घेऊ शकता पण मी तो थोडा जाडाभरडाच ठेवला आहे कारण त्यात लसणीचे आणि कांद्याचे तुकडेतुकडे राहिलेले मला आवडतात.

पिझ्झा सॉस

तुमचे मस्त चमचमीत घरच्याघरी बनवलेले पिझ्झा सॉस तयार आहे. आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे हे सॉस तुम्ही रेड सॉस किंवा पिंक सॉस पास्ता  मध्ये, सँडविच स्प्रेड, सॅलड टॉपिंग म्हणून किंवा अगदी स्नॅक्स सोबत तोंडीलावणे म्हणून देखील वापरू शकता.

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture

पिझ्झा सॉस रेसिपी साहित्य काय आहे?

४ मध्यम आकाराचे टोमॅटो

१८-२० लसणीच्या पाकळ्या

१ बारीक चिरलेला कांदा

२ डाव तेल

चिली फ्लेक्स

कोरडा (ड्राय) ओरेगॅनो (किंवा इटालियन सिझनिंग)

कोरडी बेझिल

२ मोठे चमचे टोमॅटो केचप

१ लहान चमचा लाल तिखट/ ‘पाप्रिका’ पावडर

चवीनुसार मीठ

पाणी (आवश्यक असेल तेवढे)