पब्लिक प्रॉव्हिडंट फंड विषयी संपूर्ण मार्गदर्शन

9 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

आढावा

‘द नॅशनल सेव्हिंग्ज इन्स्टिटयूट ऑफ द फायनान्स मिनिस्ट्री’ने ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ची १९६८ मध्ये स्थापना केली. त्यांचे मुख्य ध्येय होते लहान बचती गुंतवणुकीच्या स्वरूपात गतिमान करणे आणि त्या बचतीवर परतावा मिळवून देणे. ‘पीपीएफ’ स्कीम्स ह्या अत्यंत आकर्षक असे व्याजदर पुरवतात आणि तुम्हाला व्याजदरावर मिळालेल्या परताव्यावर कुठलाही कर भरण्याची गरज नसते.

त्याला “बचत आणि करावर बचत” अशा स्वरूपाच्या गुंतवणुकीचे साधन असेही म्हटले जाते कारण त्यामुळे तुम्हाला सेक्शन 80C अंतर्गत असलेल्या वार्षिक करांवर बचत करता येते आणि त्यासोबतच निवृत्तीचा निधी उभा करता येतो.

तुम्हाला जर करात बचत करतानाच सुरक्षित पद्धतीने गुंतवणूक करायची असेल तर हा उत्तम उपाय आहे. एक पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी लागणारी किमान रक्कम आहे रु. ५००, आणि एका आर्थिक वर्षात ज्याची परवानगी दिली जाते अशी कमाल रक्कम आहे रु. १,५०,०००. तुम्ही ही रक्कम दर महिन्याला १२ इंस्टॉलमेंट्समध्ये (हप्त्यांमध्ये) भरू शकता. त्याचा मॅच्युरिटी पिरियड १५ वर्षांचा असतो पण मॅच्युरिटीच्या एक वर्षाच्या आत तो आणखी ५ वर्षेपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम

 

पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि अकाउंट उघडण्यासाठी तुमची पात्रता आहे की नाही हे खालील निकषांवरून ठरवता येते:

  • पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही भारतीय निवासी असणे अनिवार्य आहे.
  • तुम्हाला एकच पीपीएफ अकाउंट उघडता येऊ शकते.
  • NRI व्यक्ती भारतात राहत असताना त्यांनी जे अकाउंट उघडले असेल त्याला १५ वर्षांची वैधतेची कालमर्यादा आहे. त्यापुढे ही मर्यादा वाढवण्याचा पर्याय उपलब्ध नाही.
  • कायदेशीर वयाचा दाखला असेल तर १८ वर्षांखालील व्यक्ती देखील पीपीएफ अकाउंट उघडू शकते.
  • मे १३, २००५ मध्ये पास झालेल्या एका विशिष्ट कायद्यानुसार ‘हिंदू अनडिव्हायडेड फॅमिलीज’ (HUF) ना पीपीएफ अकाउंट उघडण्याची परवानगी नाही. या तारखेच्याआधी उघडली गेलेली अकाऊंट्स १५ वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियड पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली गेली.

पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी आवश्यक असेलली डॉक्युमेंट्स

याआधी फक्त राष्ट्रीयीकृत किंवा सरकारी बॅंकांमध्येच पीपीएफ अकाउंट उघडण्याची परवानगी होती. पण आता खाजगी बँकांनी पीपीएफ स्कीम देणे सुरु केले आहे.

तुम्ही जेव्हा पीपीएफ अकाउंट उघडता, तेव्हा तुम्ही काही आवश्यक डॉक्युमेंट्स (दस्तावेज) पुरवणे आवश्यक असते. खाली दिलेली डॉक्युमेंट्स सुपुर्द करणे अनिवार्य असते:

  • पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी आवश्यक असलेला फॉर्म तुम्ही एकतर ऑनलाईन किंवा संबंधित बँकेच्या शाखेतून मिळवू शकता. इथे तुम्हाला अकाउंट उघडणे, विदड्रॉअल (पैसे काढणे), कर्ज यासाठीच्या पीपीएफ फॉर्मची यादी दिसून येईल.
  • निवासी पत्त्याच्या पुराव्यासाठी टेलिफोन बिल, वीजबिल, रेशन कार्ड किंवा आधार कार्ड. पॅन कार्ड, व्होटर आयडी कार्ड (मतदार ओळखपत्र), आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट नॉमिनेशन फॉर्म अकाउंट उघडणाऱ्याचे २ पासपोर्ट साईझ फोटो

सूचना: १८ वर्षाखालील व्यक्तींसाठी वयाचा दाखला म्हणून जन्माचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

पीपीएफ स्कीम्सची ही खालील मुख्य वैशिष्ट्ये आहेत:

  • अकाउंटची मुदत - अकाउंटची मुदत ज्याला ‘मॅच्युरिटी पिरियड’ असे देखील म्हणतात ती १५ वर्षे आहे. असे असले तरी अकाउंटची मुदत आणखी फक्त ५ वर्षांसाठी वाढवला जाऊ शकते.
  • डिपॉझिट करण्याच्या पद्धती - पीपीएफ अकाउंटमध्ये पैसे हे नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड अशा ऑनलाईन पद्धतींनी किंवा मग डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा रोख रक्कम भरून टाकता येतात.
  • पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम - पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी किमान रक्कम जी आवश्यक असते ती आहे रु. १००, आणि कमाल रक्कम रु. १.५ लाख एवढी असू शकते. जर वार्षिक गुंतवणूक रु. १.५ लाख पेक्षा जास्त झाली, तर करामध्ये कपातीचा दावा केला जाऊ शकत नाही आणि व्याजसुद्धा मिळू शकत नाही.
  • किमान आणि कमाल रक्कम - एका आर्थिक वर्षात, किमान ते कमाल गुंतवणुकीची रेंज रु. ५०० ते रु. १.५ लाख एवढी असते. एका वर्षात १२ एवढ्याच इंस्टॉलमेंट्सची परवानगी असते.
  • डिपॉझिट करण्याची फ्रिक्वेन्सी - १५ वर्षाच्या कालावधीत प्रत्येक वर्षी किमान एकतरी डिपॉझिट करायलाच हवे असते.
  • पीपीएफ अकाउंटच्या अगेन्स्ट कर्ज - अकाउंट उघडल्याच्या तारखेपासून तिसऱ्या आणि पाचव्या वर्षाच्या मधल्या काळात पीपीएफ अकाउंटच्या अगेन्स्ट कर्ज उपलब्ध असते. दुसऱ्या आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत जेवढी गुंतवणूक केलेली असेल त्याच्या २५% पर्यंत कर्जाची रक्कम मिळू शकते. सहाव्या आर्थिक वर्षानंतर सुद्धा कर्ज मिळू शकते. पण जर तुम्हाला दुसरे कर्ज घ्यायचे असेल तर त्याआधी तुम्ही पहिल्या कर्जाची परतफेड करणे अनिवार्य असते.
  • पीपीएफ अकाउंट उघडणे हे सुरक्षित असते कारण सर्व पीपीएफ अकाउंट्सवर परतावा मिळण्याची हमी असते, भांडवल सुरक्षित राहते आणि त्यात जोखीम नसते कारण पीपीएफ पॉलिसीज ह्या भारत सरकारकडून व्यवस्थापित केल्या जातात. त्यामुळे पीपीएफ अकाउंट उघडण्यात कमी जोखीम असते.

 

पीपीएफ अकाउंटचे फायदे

पीपीएफ अकाउंट उघडल्याने तुम्हाला काही विशिष्ट फायदे मिळतात. ते खालीलप्रमाणे आहेत:

  • पीपीएफ अकाउंटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पीपीएफ अकाउंटमध्ये रु. १.५ लाखपर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर सेक्शन 80C अंतर्गत तुम्ही करात कपातीचा दावा करू शकता.
  • जोखीम-मुक्त व्याजदर - तुम्हाला ८% पर्यंत व्याजदर मिळतो, जो इतर स्कीम्सच्या तुलनेत बऱ्यापैकी चांगला आहे. १५ वर्षे चालणारी ही एक चांगली दीर्घकालीन गुंतवणूक आहे हे सिद्ध झाले आहे.
  • एकत्र मिळणारा व्याजदर - आर्थिक वर्षाच्या अखेरीला तुम्हाला व्याज दिले जाते, म्हणजे दरवर्षी ३१ मार्च या दिवशी. या अकाउंटमध्ये, व्याजदर हा वार्षिकरीत्या मिळतो.
  • गुंतवणूक खूप जास्त असणे आवश्यक नसते - दरवर्षी तुम्ही तुमच्या पीपीएफ अकाउंटमध्ये खूप जास्त रकमेची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नसते.
  • विदड्रॉअलची (पैसे काढण्याची) सुविधा - पीपीएफ स्कीममध्ये ७ आर्थिक वर्षे पूर्ण केल्यावर, तुम्ही आंशिक स्वरूपाच्या विदड्रॉअल सुविधेचा लाभ घेऊ शकता.

 

पीपीएफ विदड्रॉअलची प्रक्रिया

पहिल्या वर्षाच्या शेवटी केलेली सदस्यता ते पाचवे आर्थिक वर्ष एवढ्या काळात पीपीएफ अकाउंटमध्ये जेवढा बॅलन्स असेल त्याच्या ५०% विदड्रॉअल करण्याची परवानगी आहे. त्याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षात फक्त एकच आंशिक स्वरूपाचे विदड्रॉअल करता येऊ शकते. आता आपण हे एका उदाहरणासह पाहूया: एका व्यक्तीने जानेवारी २५, २०१२ या दिवशी पीपीएफ अकाउंट उघडले. इथे त्या व्यक्तीला २०१७-२०१८ या आर्थिक वर्षातल्या पैशातूनच फक्त काही भाग विदड्रॉ करता येऊ शकतो.

 

विदड्रॉअलसाठी पात्र असलेली रक्कम

खालील गोष्टींच्या एकूण बेरजेपेक्षा कमी एवढी एकूण रक्कम विदड्रॉअलसाठी उपलब्ध असते-

  • चालू वर्षाच्या आधी, मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी जेवढा पीएफ अकाउंट बॅलन्स असेल त्याच्या ५० टक्के किंवा अर्धी रक्कम
  • चालू वर्षाच्या आधी, मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी जेवढा पीपीएफ अकाउंट बॅलन्स असेल त्याच्या ५० टक्के किंवा अर्धी रक्कम

 

असे असले तरी, अकाउंट होल्डरला (खातेधारकाला) प्रत्येक वर्षी फक्त एकदाच पैसे काढता येतात. जेव्हा १५ वर्षांची मुदत संपते, तेव्हा खातेधारकाकडे संपूर्ण रक्कम आणि त्यावर कमावलेले व्याज काढून घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture




प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय?
‘द नॅशनल सेव्हिंग्ज इन्स्टिटयूट ऑफ द फायनान्स मिनिस्ट्री’ने ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ची १९६८ मध्ये स्थापना केली. त्यांचे मुख्य ध्येय होते लहान बचती गुंतवणुकीच्या स्वरूपात गतिमान करणे आणि त्या बचतीवर परतावा मिळवून देणे. ‘पीपीएफ’ स्कीम्स ह्या अत्यंत आकर्षक असे व्याजदर पुरवतात आणि तुम्हाला व्याजदरावर मिळालेल्या परताव्यावर कुठलाही कर भरण्याची गरज नसते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसाठी कोणती योजना आहे?
पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि अकाउंट उघडण्यासाठी तुमची पात्रता आहे की नाही हे खालील निकषांवरून ठरवता येते: <ol> <li>पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही भारतीय निवासी असणे अनिवार्य आहे. </li> <li>तुम्हाला एकच पीपीएफ अकाउंट उघडता येऊ शकते. </li> <li>NRI व्यक्ती भारतात राहत असताना त्यांनी जे अकाउंट उघडले असेल त्याला १५ वर्षांची वैधतेची कालमर्यादा आहे. त्यापुढे ही मर्यादा वाढवण्याचा पर्याय उपलब्ध नाही. </li> <li>कायदेशीर वयाचा दाखला असेल तर १८ वर्षांखालील व्यक्ती देखील पीपीएफ अकाउंट उघडू शकते. </li> </ol>