महिलांनी त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी या गोष्टी केल्या पाहिजेत…

8 minute
Read

Highlights आपली आर्थिक सुरक्षा कशी तयार करावी.....

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

महिलांनी नेहमीच एमोशनल किंवा इम्प्रॅक्टिकल किंवा डिपेंडेंट असतात, असच म्हटलं जात. पण आजची महिला हि काही ‘रडू बाई’ नाही. ती नौकरी किंवा बिझनेस करते आणि स्वतः कमावते. शिवाय, ती सेविंग्स, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स या सारख्या महत्वपूर्ण गोष्टींची प्लांनिंग सुद्धा करते.👩‍💻

कितीतरी महिला आज यशस्वी उद्योजक आहेत. त्याचबरोबर कोविडच्या काळात महिलांनी घराला हातभार देऊन सांभाळले आहे.

तर महिलांनी आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी काही गोष्टी चेक कराव्या व शिकाव्यात. 💰आज आपण हि सर्व माहिती देणार आहोत.

१. आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हा

a woman learning finance

अशी काही पदवी घेण्याची गरज नाही. पण तुम्हाला माहिती असायला हवी. त्यासाठी मनी-रिलेटेड पुस्तके वाचावी - द साइकोलॉजी ऑफ मनी, यू आर ए बॅडएस ट मेकिंग मनी हि काही पुस्तके नक्की वाचा. त्याचबरोबर तुम्ही इंटरनेट वर पर्सनल फिनान्स संबंधित ब्लॉग्स व व्हिडिओस बघू शकता.

म्युच्युअल फंडस् म्हणजे काय, कुठली इन्शुरन्स पोलिसी फायदेशीर ठरेल, बॉण्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी, व यासारख्या विषयांमध्ये आवड निर्माण करा आणि माहिती मिळवा.

तुमच्या कडे कॉमर्स ची डिग्री असण्याची गरज नाही. आजकाल आर्थिक माहिती सहज उपलब्ध आहे. फक्त तुम्ही वाचायला व शिकायला तयार पाहिजे.

२. स्वतंत्र बँक खाते

आम्हाला माहीत आहे कि तुमचे तुमच्या पार्टनर वर खूप प्रेम आहे. तुम्ही त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवत नाही, सगळं शेर करता आणि कोणताही निर्णय डिसकस करूनच करता.

स्वतःचा बँक अकाउंट ओपन करायला थोडंसं ऑड वाटतंय का? आम्हाला एक सांगा. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत जॉईंट फेसबुक अकाउंट किंवा इंस्टाग्राम अकाउंट ओपन करता का? नाही ना!

तसच, तुम्ही गृहिणी असाल किंवा वर्किंग वूमन, तुम्ही स्वतंत्र बँक अकाउंट उघडले पाहिजे. तुमच्या पार्टनर शी नक्की आर्थिक बाबी डिसकस करा, पण आपले अकाउंट वेगळे ठेवा. याने तुम्ही स्वतंत्र होता, आणि आपल्या पैशांची जबाबदारी घेता.

३. आरोग्य विमा

a woman getting her insurance done

तुम्हाला आरोग्य विमाची गरज आहे का? हो, नक्कीच आहे. स्त्रियांना बऱ्याच आजारांच्या सामोरं जावं लागतं. डायबेटिस, पी सी ओ एस, हैपेरटेंशन हे सर्व आजार आलेच. आजकाल औषधे, ट्रीटमेंट यांचा खर्च खूप वाढत चाललाय. त्यामुळे आपले सेविंग्सचे पैसे महागड्या ट्रीटमेंट्सवर खर्च करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून सर्व स्त्रियांनी हेल्थ इन्शुरन्स पोलिसी काढून घ्यावी. म्हणजे भविष्यामध्ये कधी मेडिकल अडचण आली, तर तुमच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम दिसून येत नाही.

तुमची इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च सांभाळेल आणि तुम्हला टेन्शन-फ्री राहता येईल. त्याचबरोबर, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजीसुद्धा घेता येईल.

परंतु, हेल्थ इन्शुरन्स पोलिसी हि लवकरात लवकर घेतलेली बरी नाहीतर तुम्हाला जास्त लांबीचा वेटिंग पिरियड लागू शकतो.

४. सेविंग्स व इन्व्हेस्टमेंट मधील फरक समजून घ्या

सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही शब्दांचा वापर खूप केला जातो पण पण यातील फरक माहीत असायचा महत्वाचा आहे. आज आपण थोडक्यात समजून घेऊया.

भविष्यातील मोठे खर्च आणि अडचणींचा सामना करण्यासाठी सेविंग्सचा वापर केला जातो. सेविंग्समध्ये तुमचे पैसे साठले जातात, पण वाढत नाही. सेविंग्स उत्तम आहेत, पण फक्त सेविंग्सवर अवलंबून राहून चालणार नाही, इन्व्हेस्टमेंटची जोड दिली पाहिजे.

आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला रिटर्न्स मिळतात, ज्याने तुम्ही डिपॉझिट केलेली रक्कम वाढते. गोल्ड बॉण्ड्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, स्टोकस, शेर्स यांचा समावेश झाला.

सेविंग्समध्ये रिस्क नसते, पण इन्व्हेस्टमेंट मध्ये जरूर असते. आपण सेविंग्स केले पाहिजे, पण स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ची गरज सुद्धा सर्व स्त्रियांना असते. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आणि रिस्कनुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पहिले इन्व्हेस्टमेंट चे सर्व ऑपशन्स समजून घ्यायला हवेत आणी एखाद्या कंसल्टंट च्या सल्लेनुसार इन्व्हेस्टमेंट करावी.

५. कर्ज व्यवस्थापन करावे

कर्ज वाईट नसतं, पण त्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. म्हणजे तुमच्या क्रेडिट स्कोर वर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येत नाही. सर्वात पहिले, तुमची हाय-इंटरेस्ट कर्ज आधी फेडा. तुमचे इएमआई तुमच्या पगारापेक्षा जास्त नाही याचा विचार करा. नवीन वस्तू घेण्याआधी तुम्ही ते कर्ज चुकवू शकणार का, याचा विचार करा. घर किंवा गाडी कर्जावर घेण्याआधी दोन-तीन बॅंक्स चे इंटरेस्ट रेट्स आधी तपासून पहा आणि तुलना करा.

क्रेडिट कार्डचा वापर हुशारीने करा. काही स्त्रिया क्रेडिट कार्ड चा वापर अतिरिक्त प्रमाणात करतात. क्रेडिट कार्ड वापरणे चुकीचे अजिबात नाही, तुम्ही ते फक्त योग्य ठिकाणीच वापरा आणि तुम्ही ते वेळेत फेडता हे सुनिश्चित करा.

६. आपत्कालीन निधी

सेविंग्स चा वापर तुम्ही इमेरजन्सी च्या वेळी नक्की करू शकता, पण आम्ही तुम्हाला सुचवू कि तुम्ही आपत्कालीन निधी साठवून ठेवा. याला 'रेनी-डे फंड' असे सुद्धा म्हणतात.

आयुष्य हे अनिश्चित असते. आपण काहीच अंदाज लावू शकत नाही कि आपल्याला एवढाच खर्च होईल किंवा इतकी कमाई होईलच. कोविडच्या काळात आपण पाहिले कि अडचण कधीही येऊ शकते. यासाठी फक्त स्ट्रेस घेऊन चालत नाही तर आर्थिकदृष्ट्या तयारी करून ठेवली पाहिजे. म्हणून आपत्कालीन निधी आपल्या जवळ असायला हवी.

आता ती किती साठवून ठेवावी हे प्रत्येक स्त्रीवर किंवा कुटुंबावर अवलंबून आहे. पण एक्सपर्ट्सचा सल्ल्यानुसार ३ किंवा ६ महिन्याचा जेवढा तुमचा खर्च असेल तेवढा आपत्कालीन निधीमध्ये साठवलेला पाहिजे.

७. सहभागी व्हा

तुम्ही घरातल्या आर्थिक परिस्थितीमध्ये किंवा चर्चेमध्ये किती सहभागी होता? जर या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असेल, तर तुम्ही नक्की सहभागी झालं पाहिजे. आपले पासबुक, क्रेडिट कार्ड्स, इ-वॉल्लेट्स आणि डेबिट कार्ड स्टेटमेंट्स वारंवार तपासून पहा. तुमचे खर्च कुठे होतात आणि तुम्ही ते आटोक्यात कसे आणू शकता, याचा विचार करा. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पार्टनरशी संवाद पण करू शकता कि तुम्ही दोघे मिळून पैसे कसे वाचवू शकता आणि कर्ज परतफेड करू शकता. जर तुम्ही संवाद साधला, तर नक्कीच वाद टाळू शकता आणि तुमची घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःहून सहभाग घ्यावा लागेल आणि घरची परिस्थिती जाणून घावी लागेल.

मग मैत्रिणींनो, ‘घरच्या लक्ष्मी’ 💸चा हक्क गाजवा आणि वरील गोष्टी आम्लात आणा.

Logged in user's profile picture