फक्त ३ पदार्थ वापरून बनवा चॉकलेट फज

3 minute
Read
WhatsApp Image 2021-08-21 at 12.49.10 AM.jpeg

(You can read this recipe in English here.)

'चॉकलेट' हा एक असा पदार्थ आहे जो सगळ्यांना आवडतो. फक्त 'चॉकलेट' असं नाव जरी घेतलं तरी तुमचा मूड एकदम फ्रेश होतो आणि हे सगळ्यांच्या बाबतीत खरं आहे. मग या सुपर अमेंझिंग चॉकलेटचा वापर करून आपण त्यातून काहीतरी क्रिमी, स्वीट आणि टेस्टी असं काही बनवलं तर? अगदी बरोबर, तुम्ही अचूक अंदाज लावलेला आहे. आपण 'चॉकलेट फज' बनवणार आहोत आणि ते सुद्धा फक्त ३ पदार्थ वापरून अगदी झटपट आणि पटपट !!  

एकदम  भन्नाट आयडीया आहे ना ?

मला माहित आहे माझी बडबड जरा जास्तच होतेय आणि तुमचं पूर्ण लक्ष लागलंय, की कधी एकदा आम्ही त्या चॉकलेटी मिठाईची पाककृती तुम्हाला सांगतो आहोत. जिची चव तुम्हाला स्वर्गीय आनंद देईल.

चला तर मग !

पाककृतीसाठी लागणारा वेळ - १५ मिनिटे

साहित्य -

 • डार्क चॉकलेट - १ मोठे पॅकेट
 • लोणी - २ मोठे चमचे
 • कन्डेन्स मिल्क - ४०० ग्रॅम

कृती

 • सर्वात आधी डार्क चॉकलेटचे लहान तुकडे करून घ्या म्हणजे चॉकलेट वितळण्याची प्रक्रिया सोपी होते.
 • आता डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट वितळवून घ्या.
 • मग वितळलेल्या चॉकलेटमध्ये चमचाभर लोणी घाला यामुळे चॉकलेट अधिक क्रिमी आणि चमकदार होतं.
 • आता ४०० ग्रॅम कन्डेन्स मिल्क घाला आणि मिश्रण छान एकत्र करून घ्या.
 • मिश्रण एकत्र करताना त्यात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या.
 • त्याला मस्त असा क्रिमी टेक्स्चर आलाय असं दिसून लागलं की गॅस बंद करा.
 • आता एखादं स्टिलचं किंवा तुमच्या घरात जे उपलब्ध आहे ते भांड घेवून, त्यात फॉईल पेपर किंवा पार्चमेंट पेपर ठेवा.
 • या फॉईल पेपरला ब्रशने वितळलेलं लोणी लावा.
 • आता आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते मिश्रण घालून भांडं ३ ते ४ वेळा टॅप करा म्हणजे हवा निघून जाईल.
 • आता आपल्या आवडीनूसार सुखा मेवा, मगज किंवा बेरी घालून हे मिश्रण सजवा.
 • रात्रभर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा आणि दुसऱ्यादिवशी त्याच्या छान वड्या पाडा.

आणि झालं !

आपलं यमी 'चॉकलेट फज' तय्यार आहे जे तयार करायला आपल्या फक्त ३ पदार्थ आणि १५ मिनिटं लागलेली आहेत.

तेव्हा आता या स्वादिष्ट चवदार चॉकलेटचा आनंद घ्या आणि हो तुम्ही हे नक्की तयार करून बघा आणि ते कसं झालंय हे आम्हाला न विसरता कळवा.

सहजपणे बनविण्याची प्रक्रिया शिकण्यासाठी याकडे एक नजर टाका.

image-description
report Report this post