ब्रेकफास्टसाठी सोपे, मजेदार, 'चीझी' पोहा कटलेट!

3 minute
Read

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this blog in English here)

मित्रमैत्रिणींनो, तो ऋतू पुन्हा आला आहे! मान्सूनने आपले दार ठोठावले आहे आणि चहाच्या गरमागरम कपसोबत पकोडे, भजी आणि कटलेटचा आस्वाद घेण्यासाठी हा उत्तम काळ आहे!

गरमागरम कुरकुरीत कटलेट, मागे वाजणारे मंद संगीत आणि पावसाच्या थेंबांनी भिजलेल्या मातीचा मंद, मोहक मृद्गंध असला की आपली सकाळ कशी खुलून जाते नाही? म्हणूनच तुमच्यासाठी आणली आहे ही अत्यंत सोपी रेसिपी जी बनवण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि अगदी काही मिनिटांत, झटपट ती तयार होईल. पारंपरिक पद्धतीने पोहे बनवण्यात अगदी तोचतोचपणा येतो, मग पोह्यांचा एखादा नवीन पदार्थ बनवून पाहून तुमच्या जिभेला चवीची आणि चीझची मेजवानी का देऊ नये?

आता फार अघळपघळ न करता, रेसिपी कशी बनवायची ते पाहूया!

तयारीसाठी वेळ - १५ मिनिटे

बनवण्यासाठी लागणारा वेळ - १५ मिनिटे

साहित्य –

पोहे साहित्य

• पोहे - १ कप
• उकडलेले बटाटे - ७-८
• हिरव्या मिरच्या - २
• किसलेले चीझ - २ क्यूब
• लाल तिखट
• आमचूर पावडर
• मीठ
• खाद्यतेल

कृती -

• पाण्याखाली पोहे २-३ वेळा चांगले धुवून घ्या आणि त्यातले सगळे पाणी निथळावे म्हणून ते एका भांड्यात काढून घ्या.
• उकडलेल्या बटाट्यांचा लगदा करून घ्या. पोहे आणि बटाटे एकत्र करून त्याचे पीठ बनवा.
• त्यात लाल तिखट, हिरव्या मिरच्या, आमचूर पावडर आणि मीठ घाला.

मिश्रण

• हे सगळे मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि त्यात किसलेले चीझ घाला.
• चीझसुद्धा त्यात चांगले एकजीव झाले पाहिजे आणि मग आता तुमचे कटलेटचे पीठ तयार आहे.

• तवा घ्या आणि त्यात तेल गरम करा.
• आंच मंद ठेवा. तेल गरम होत असतानाच पिठाच्या सपाट अशा टिक्क्या बनवायला घ्या.

पिठाच्या  टिक्क्या

• तेल पुरेसे गरम झाले, की तव्यावर एकेक करून टिक्की सोडा आणि मंद ज्योत’ करून घ्या.

• अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी ह्या टिक्क्या किचन नॅपकिन/ पेपर टॉवेलवर काढून घ्या.
• तुमच्या आवडीच्या कोणत्याही सॉस किंवा चटणीसोबत गरमागरम वाढा.

हे होते सोपे आणि ‘चीझी’ पोहा कटलेट!

पोहा कटलेट

अगदी २० मिनिटांच्या आतच तुमचे पोहा कटलेट झटपट तयार झाले की नाही! थोडे सॉस, मेयॉनीझ आणि चटणी आणि वाफाळणाऱ्या गरम चहासोबत ह्या कटलेटचा आस्वाद घ्या!

ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते खालील कॉमेंट्स सेक्शनमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. तोपर्यंत, आमचे ब्लॉग्ज वाचत राहा आणि आम्ही तुमच्यासाठी अशा आणखी उत्तमोत्तम रेसिपीज घेऊन येऊच!

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture

चीझी' पोहा कटलेटचे साहित्य काय आहे?

पोहे

उकडलेले बटाटे

हिरव्या मिरच्या

किसलेले चीझ

लाल तिखट

आमचूर पावडर

मीठ

खाद्यतेल

चीझी' पोहा कटलेटचे साहित्य काय आहे?

पोहे

उकडलेले बटाटे

हिरव्या मिरच्या

किसलेले चीझ

लाल तिखट

आमचूर पावडर

मीठ

खाद्यतेल